अकोलेअहिल्यानगर-अकोले - पिंपळगाव निपाणीफक्त धूळ दिसते... पिंपळगाव निपाणी ते धांबोडी फाटा रस्त्याची हीच खरी शोकांतिका!"✍️ संपादकीय सचिन रेवगडे 📱 +919623968773

धुळीचं साम्राज्य, प्रशासनाचं मौन!’ – पिंपळगाव निपाणी-धांबोडी फाटा रस्ता की नरकयातना? इथं विकास दिसत नाही, फक्त धूळ दिसते… पिंपळगाव निपाणी ते धांबोडी फाटा रस्त्याची हीच खरी शोकांतिका!”✍️ संपादकीय

तेव्हा साहेब ,थोडी धूळ तुम्हीही फासा! अर्धवट रस्त्यामुळे पिंपळगाव निपाणीकरांचा श्वास कोंडला आहे.वरिष्ठ अधिकारी एकदा या AC मधून बाहेर आणि एकदा पिंपळगाव निपाणी ते धांबोडी फाटा या रस्त्याने एकदा मोटरसायकल ने प्रवास करून दाखवावा.. तेव्हा येथील नागरिकांना कोणता कोणता त्रास सहन करावा लागतो याचा प्रत्यय येईल.

Updated by  -स्टार वन न्युज मराठी वृत्तसेवा ™ अकोले 

१७ एप्रिल २०२६

✴️अकोले (संपादकीय विशेष)🔻🔸🔸🔸🔺

अहिल्यानगर – सरकारी कागदावर रस्ते चकाचक होत असताना, प्रत्यक्षात मात्र पिंपळगाव निपाणी ते धांबोडी फाटा रस्त्याने प्रवासाच्या नावाखाली नागरिकांच्या नशिबी ‘धूळफेक’ आली आहे. विकासाच्या गप्पा मारणारे प्रशासन आणि कंत्राटदाराचे साटंलोटं यामुळे पिंपळगाव निपाणी ते धांबोडी फाटा रस्ता सध्या मृत्यूचा सापळा बनला असून, सामान्य जनतेच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा संताप व्यक्त होत आहे.

या कडे तालुक्याचे आमदार साहेब यांनी ही लक्ष घालण्याची गरज आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून रस्ते विकासाचे दावे केले जात असले तरी, ग्रामीण भागातील वास्तव मात्र काही वेगळेच असल्याचे पाहायला मिळत आहे. परिसरातील पिंपळगाव निपाणी ते धांबोडी फाटा या महत्त्वाच्या रस्त्याचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून अर्धवट अवस्थेत असल्याने वाहनधारकांना आणि ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

    प्रशासनाचा निष्काळजीपणा! रस्ता अर्ध्यावरच रखडला; ग्रामस्थांचे अतोनात हाल 

   रस्त्याचे काम की कसरतीचा मार्ग? प्रशासनाचे  मात्र दुर्लक्ष! प्रशासनाची ही दिरंगाई असून आणि कंत्राटदारा च्या मनमानी कारभारामुळे पिंपळगाव च्या नागरिकांचे अतोनात हाल होत आहे.

 

शालेय मुले मुली तसेच रुग्ण शेतकरी ग्रामस्थ यांचे या रस्त्यामुळे जगणे मुश्किल करून टाकले असून या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करून देण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे आणि त्यांनी ती लवकरात लवकर पूर्ण करावी अन्यथा येथील नागरिकांची आंदोलन करण्याची तयारी आहे हे  प्रशासनाने लक्षात ठेवावे..

 

  रस्त्यामध्ये मोठमोठे उंचवटे आणि मोठ खड्डे तयार झाले आहेत. यामुळे दुचाकीस्वारांना अपघाताचा धोका निर्माण झाला असून, रात्रीच्या वेळी इथून प्रवास करणे म्हणजे जीव धोक्यात घालण्यासारखे आहे.

    पिंपळगाव निपाणी रस्त्याचे काम पूर्ण न झाल्यामुळे धुळीचे साम्राज्य वाढले आहे, ज्याचा परिणाम परिसरातील शेतीवर आणि नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. “रस्ता मंजूर झाला तेव्हा आनंद झाला होता, पण ठेकेदाराने काम अर्धवट सोडून दिल्याने आता आहे त्या रस्त्याने जाणेही कठीण झाले आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी दिली आहे.

पिंपळगाव निपाणी या रस्त्यावर अपघाताचा धोका वाढला आहे.उडणाऱ्या धुळीमुळे समोरून येणारे वाहन दिसत नाही, परिणामी दुचाकीस्वारांचे छोटे-मोठे अपघात होत आहेत.

    रस्त्याशेजारील घरांमध्ये आणि शेतात धूळ साचत असल्याने लहान मुले व वृद्धांना श्वसनाचे त्रास सुरू होण्याची शक्यता नाकारता येत नाही.. 

  यात प्रशासन फेल ठरल्याचे दिसत 
असून मोठा accident होण्याची वाट 
कॉन्ट्रॅक्टर तसेच अधिकारी बघताय का असा 
सवाल उपस्थित झाला आहे.

  ✴️तसेच वीरगाव फाटा ते मधून येणारा रस्ता जो पिंपळगाव ला जोडतो त्या रस्त्याची अवस्था गेली अनेक वर्षांपासून वाईट आहे.त्या ही रस्त्याचे काम लवकरात लवकर मार्गी लागावे. अशी नागरिकांची मागणी आहे 

थोड्याच दिवसात पिंपळगाव येथील संठुआई ची यात्रा आहे लाख च्या वर भाविक या देवीच्या यात्रेला येतात परंतु असा जीवघेणा रस्ता असेल तर नक्कीच लोक पुढील वर्षी यात्रेला पाठ फिरवतील हे नक्की. या प्रशासनाने वेळेवर लक्ष घालावे आणि लवकरात लवकर रस्त्यांची कामे मार्गी लावावे.

जेव्हा निवडणुका येतात तेव्हा मंत्री,नेते,आमदार,खासदार हे विकासाचा आणि योजनेचा भरपूर पाऊस पडतात वाडी वस्ती रहदारी रस्ते आम्ही करून देऊ आम्हाला निवडून द्या अशी विनवणी करतात मात्र निवडून आल्यावर त्या रस्त्याकडे डोकावूनही बघत नाही.

    पिंपळगाव निपाणी रस्त्याचे काम सुरू झाले तेव्हा ग्रामस्थांनी स्वागत केले होते, ज्या ठेकेदाराने हे काम घेतले होते त्या ठेकेदार आणि ही एक काम अर्धवट सोडून दिलेले आहे. हे काम अर्धवट सोडून देण्यामागचे नेमके कारण काय?

        पिंपळगाव निपाणी ते धांबोडी फाटा रस्ता हे काम म्हणजे ‘लोणी कमी आणि फेस जास्त’ असा प्रकार ठरला आहे. . डांबराचा पत्ता नसल्याने वाहनांच्या चाकांमुळे उडणारे धुळीचे लोट पाहून हा रस्ता आहे की एखादा धुळीचा कारखाना, असा प्रश्न पडतो.

धुळीचा थर पिकांवर साचत असल्याने पिकांच्या वाढीवरही विपरीत परिणाम होत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या आहेत

 

      प्रशासनाचे 'गांधारी' डोळे!

या मार्गावरून धुळीचा त्रास सहन करत शालेय विद्यार्थी, रुग्ण आणि शेतकरी दररोज प्रवास करतात. धुळीमुळे स्थानिकांना डोळ्यांचे आणि श्वसनाचे आजार जडण्याची शक्यता नाकारता येत नाही , पण संबंधित विभागाचे अधिकारी मात्र एसी केबिनमध्ये बसून ‘सर्व आलबेल’ असल्याचे रिपोर्ट पाहत आहेत.

     ✍️प्रशासनाला 'धुळीचे' अंजन कधी मिळणार? 

   तेव्हा साहेब ,थोडी धूळ तुम्हीही फासा! अर्धवट रस्त्यामुळे पिंपळगाव निपाणीकरांचा श्वास कोंडला आहे.वरिष्ठ अधिकारी एकदा या AC मधून बाहेर आणि एकदा पिंपळगाव निपाणी ते धांबोडी फाटा या रस्त्याने एकदा मोटरसायकल ने प्रवास करून दाखवावा.. तेव्हा येथील नागरिकांना कोणता कोणता त्रास सहन करावा लागतो याचा प्रत्यय येईल.

        अर्धवट रस्त्यामुळे अपघातांना निमंत्रण; 

   हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण करावा, अन्यथा ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. आता याकडे संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा स्थानिक प्रशासन कधी लक्ष देणार, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत

रस्त्यावर पसरलेल्या खडीमुळे आणि मोठमोठ्या खड्ड्यांमुळे दुचाकी घसरण्याचे प्रमाण वाढले असून, एखादा मोठा बळी गेल्यावरच प्रशासनाला जाग येईल का? असा जळजळीत सवाल पिंपळगाव चे ग्रामस्थ विचारत आहेत.

                   STAR ONE NEWS

     निष्पक्ष – निर्भीड – रोखठोक. स्टार वन न्युज -ग्राऊंड रिपोर्ट

Star One News Marathi

राज्य, जिल्हा, तालुका आणि गावपातळीवरील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्राइम, कृषी, क्रिडा, आरोग्य, अर्थ आदी क्षेत्रांतील घडणाऱ्या घटना, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय घडामोडी https://staronenewsmarathi.in/ या न्यूज पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाइन बातम्यांच्या स्वरूपात तुमच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही २४ तास कटिबद्ध आहोत. तुमची मतं किंवा प्रतिक्रिया द्या. त्याचबरोबर तुम्हाला काही सल्ला द्यायचा असल्यास staronenews7@gmail.com या ईमेलवर जरूर पाठवाव्यात. आमच्यासाठी ही बाब नेहमीच स्वागतार्ह आहे. ⭐ महत्वाची सूचना : या न्यूज वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक /संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो अकोले न्यायालया अंतर्गत मान्य राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!