मुंबई- १२ मे २०२६ – स्टार वन न्यूज मराठी
केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांच्या दिल्लीतील ‘संविधान’ या शासकीय निवासस्थानाचे नुकतेच नूतनीकरण करण्यात आले. या नूतनीकरणानंतर आयोजित करण्यात आलेल्या गृहप्रवेश सोहळ्याप्रसंगी ‘छावा ब्रिगेड’ च्या वतीने आठवले साहेब यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
या मंगलप्रसंगी छावा ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी ना. रामदास आठवले यांना छत्रपती शिवाजी महाराज यांची अत्यंत देखणी आणि भव्य मूर्ती भेट देऊन त्यांचा सन्मान केला. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी “जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम” च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता.

छत्रपती संभाजी महाराज जयंतीचे निमंत्रण

यावेळी बोलताना छावा ब्रिगेडच्या प्रतिनिधींनी सांगितले की, महापुरुषांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि सामाजिक ऐक्य टिकवून ठेवण्यासाठी रामदास आठवले यांचे मार्गदर्शन नेहमीच प्रेरणादायी ठरते. ना. आठवले यांनी देखील या प्रेमाबद्दल आणि सन्मानाबद्दल छावा ब्रिगेडचे आभार मानले. यावेळी छावा ब्रिगेड संस्थापक अध्यक्ष विश्वनाथ

वाघ साहेब RPI जिल्हा उप अध्यक्ष योगेश बनसोडे ,राजू शिंदे आदि मोठ्या संखेने छावा ब्रिगेड कार्यकर्ते उपस्थित होते
🚩 जय जिजाऊ | जय शिवराय | जय शंभुराजे | जय छावा ब्रिगेड | जय भीम 🚩





