अहिल्यानगर ✍️ अहमदनगरनिघोजमहाराष्ट्र

८४ व्या जयंतीनिमित्त स्व. बाबासाहेब कवाद यांना कृतज्ञ अभिवादन निघोजच्या सर्वांगीण विकासाला आयुष्य वेचणाऱ्या नेतृत्वाची भावपूर्ण आठवण

८४ व्या जयंतीनिमित्त स्व. बाबासाहेब कवाद यांना कृतज्ञ अभिवादन निघोजच्या सर्वांगीण विकासाला आयुष्य वेचणाऱ्या नेतृत्वाची भावपूर्ण आठवण

८४ व्या जयंतीनिमित्त स्व. बाबासाहेब कवाद यांना कृतज्ञ अभिवादन
निघोजच्या सर्वांगीण विकासाला आयुष्य वेचणाऱ्या नेतृत्वाची भावपूर्ण आठवण
निघोज  दिनाक 1 मे
निघोज ग्रामीण संस्था परिवाराचे संस्थापक अध्यक्ष, ज्येष्ठ मार्गदर्शक स्व. बाबासाहेब कवाद यांच्या ८४ व्या जयंतीनिमित्त शुक्रवार (दि. १ मे) रोजी निघोज व परिसरात विविध कार्यक्रमांद्वारे त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. गावाच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व धार्मिक उन्नतीसाठी आयुष्यभर झटलेल्या या दूरदर्शी नेतृत्वाच्या कार्याची यावेळी भावपूर्ण उजळणी करण्यात आली.
स्व. कवाद यांचा निघोज ते मुंबई असा प्रवास हा जिद्द, कष्ट आणि समाजाभिमुख दृष्टीकोनाचा आदर्श नमुना मानला जातो. मुंबईतील जी. एस. महानगर बँकेच्या स्थापनेत त्यांनी मोलाची भूमिका बजावत संस्थापक संचालक ते उपाध्यक्ष अशी जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. त्यांच्या कार्यकाळात पारनेर तालुक्यातील मुंबईत स्थायिक नागरिकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कर्जसहाय्य व उद्योगधंद्यांना चालना देण्यात आली. परिणामी, अनेक कुटुंबांच्या आर्थिक प्रगतीचा मार्ग सुकर झाला.
ग्रामीण भागाच्या विकासाची तळमळ जपत त्यांनी निघोजमध्ये परतल्यानंतर विविध संस्थांची स्थापना केली. निघोज नागरी सहकारी पतसंस्था, मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट, निघोज परिसर कृषी फलोद्यान सहकारी संस्था तसेच बाबासाहेब कवाद ग्रामविकास सेवाभावी संस्था यांच्या माध्यमातून त्यांनी शेतकरी, उद्योजक, युवक व सर्वसामान्य नागरिकांना भक्कम आधार दिला. संस्थात्मक बांधणीच्या माध्यमातून विकासाचा मार्ग खुला करण्याचे त्यांचे कार्य आजही आदर्श मानले जाते.
धार्मिक, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान विशेष उल्लेखनीय ठरले आहे. गावाच्या प्रगतीसाठी एकजुटीने काम करत निघोजचा लौकिक जिल्हा व राज्य स्तरावर वाढविण्यात त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मोलाची भूमिका बजावली. समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन विकास साधण्याचा त्यांचा दृष्टिकोन प्रेरणादायी ठरला आहे.
जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमांमध्ये ग्रामस्थ, कार्यकर्ते, विविध संस्थांचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. उपस्थितांनी स्व. कवाद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्याचा गौरव केला.
निघोज ते मुंबई असा प्रेरणादायी प्रवास
जी. एस. महानगर बँकेच्या स्थापनेत मोलाचा सहभाग
पारनेर तालुक्यातील नागरिकांच्या आर्थिक उन्नतीसाठी भरीव योगदान
ग्रामीण भागात विविध संस्थांची उभारणी करून विकासाला चालना
सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य
“समाजाच्या उन्नतीसाठी आयुष्य वेचणारे नेतृत्व म्हणजे स्व. बाबासाहेब कवाद,” अशा शब्दांत उपस्थितांनी आपल्या भावना व्यक्त करत त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली.

योगेश खाडे

योगेश खाडे पाटील हे स्टार वन न्युज मराठी चे जुन्नर तालुक्यातील एक अनुभवी पत्रकार आहे ✨ जिथे अन्याय होत असेल तिथे त्यांना मदत करण्याचे काम योगेश खाडे करताना दिसतात

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!