अकोले तालुक्यातील समशेरपूर येथील महावितरणचे कर्तव्यदक्ष सहायक अभियंता परिहार साहेब यांची जळगाव येथे बदली. त्यांना अकोले कार्यालयाच्या वतीने अत्यंत भावुक आणि उत्साही वातावरणात निरोप
या प्रसंगी महावितरणचे वरिष्ठ अधिकारी, श्री नामदेव शेळके, उपकार्यकारी अभियंता भूषण भोगे, सहाय्यक अभियंता भारती रणबावळे, सहाय्यक अभियंता तसेच सहकारी कर्मचारी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

+919623968773
समशेरपूर (अकोले):
अकोले तालुक्यातील समशेरपूर येथील महावितरण उपकेंद्रात सहायक अभियंता म्हणून कार्यरत असलेले श्री. परिहार साहेब यांची जळगाव येथे बदली झाली आहे. त्यानिमित्त अकोले कार्यालयात त्यांच्या सन्मानार्थ एका विशेष निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी महावितरणचे वरिष्ठ अधिकारी, श्री नामदेव शेळके साहेब , उपकार्यकारी अभियंता भूषण भोगे,साहेब सहाय्यक अभियंता
भारती रणबावळे, सहाय्यक अभियंता तसेच
सहकारी कर्मचारी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समशेरपूरचे कर्तव्यदक्ष सहायक अभियंता परिहार साहेब यांना जळगाव बदलीनिमित्त भावपूर्ण निरोप!

अकोले येथील महावितरण कार्यालयात नुकताच एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा बदली निमित्त निरोप समारंभ अत्यंत उत्साहात पार पडला. सदर अधिकाऱ्याची जळगाव परिमंडळात त्यांच्या इच्छित स्थळी बदली झाल्याने श्री नामदेव शेळके, उपकार्यकारी अभियंता भूषण भोगे, सहाय्यक अभियंता भारती रणबावळे, सहाय्यक अभियंता तसेच कर्मचाऱ्यांनी नव्या जबाबदारीसाठी आणि पुढील उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या

परिहार साहेबांच्या कार्याशेली तसेच मनमिळाऊ स्वभावामुळे श्री नामदेव शेळके साहेब, उपकार्यकारी अभियंता निरोप देते वेळी भाऊक—- त्यांनी बोलताना सांगितले कि
या अधिकाऱ्याने महावितरण मध्ये विविध पदांवर काम केले असून, त्यांनी समशेरपूर’ शाखेत दोन वेळा एकूण १२ वर्षांपेक्षा जास्त काळ उत्तम सेवा दिली आहे.
त्यांचा अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात एकूण १४ वर्षांचा प्रदीर्घ कार्यकाळ राहिला आहे. तसेच त्यांची अजून २० वर्षे सेवा बाकी आहे.


निरोप प्रसंगी बोलताना श्री नामदेव शेळके साहेबांनी सांगितले की, “प्रशासनात काम करताना कर्मचाऱ्यांवर योग्य नियंत्रण ठेवणे गरजेचे असते. ते नियंत्रण परिहार साहेबांनी ठेवले होते आपले ‘फर्स्ट इम्प्रेशन’ हेच ‘लास्ट इम्प्रेशन‘ ठरते, त्यानुसार कामाचे नियोजन केल्याने महावितरण कंपनी ला त्यांनी
चांगला आउटपुट मिळून दिला परिहार साहेबांची इच्छित स्थळी बदली झाली हि आनंदाची गोष्ट
आहे पण आमच्यातून एक चांगला सहकारी जात आहे त्यांची पोकळी भरून निघणार नाही अशी खंत शेळके साहेबांनी आपल्या बोलण्यातून मांडली.
आपल्या कर्मचाऱ्यांना सल्ला देताना शेळके साहेब म्हणाले की कर्मचाऱ्यांनी कंपनीचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि जास्तीत जास्त चांगला महसूल मिळवून देण्यासाठी एकत्र येऊन काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.
कंपनीच्या हिताला प्राधान्य वर भर दिली तरच महावितरण कंपनी चे उत्पन्न वाढेल त्यावरभर देणे गरजेचे आहे असे हि त्यांनी सांगितले
“महावितरण मधील पुढील वाटचालीसाठी आणि नवीन जबाबदारीसाठी सर्व सहकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांचे हार्दिक स्वागत केले आणि त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.”
या निरोप समारंभादरम्यान अकोले येथील सहायक अभियंता भूषण भोगे यांनी परिहार साहेब यांच्यासोबत काम करतानाचे अनुभव सांगत त्यांच्या कार्यशैलीचा गौरव केला.
आपल्या भाषणात भूषण भोगे म्हणाले, “परिहार साहेबांचा जळगावचा पुढील प्रवास मोठा आणि लांबचा असल्याने आपण हा कार्यक्रम वेळेत आयोजित केला आहे. समशेरपूर आणि अकोले परिसरातील महावितरणचा हा भाग कामाच्या दृष्टीने अत्यंत आव्हानात्मक आणि ‘चॅलेंजिंग एरिया’ म्हणून ओळखला जातो. अशा कठीण भागात वीज वाहिन्यांचे (लाईन्स) व इतर तांत्रिक कामांचे महिन्याचे योग्य नियोजन करणे खूप गरजेचे असते.”
ते पुढे म्हणाले, “गेल्या दीड वर्षात परिहार साहेबांसोबत काम करताना वेळ कशी निघून गेली, हे समजलेच नाही. या काळात वीज ग्राहकांच्या समस्या सोडवणे, लाईन दुरुस्ती आणि तातधीने सेवा देणे ही सर्व कामे आम्ही सर्वांनी मिळून यशस्वीपणे पूर्ण केली. वादळी व पावसाळी हवामानात जेव्हा कधी वीज पुरवठा खंडित व्हायचा, तेव्हा रात्र असो वा दिवस, वेळेचा विचार न करता परिहार साहेब स्वतः टीमसोबत खंबीरपणे उभे असायचे. त्यांच्या या तत्परतेमुळे आमच्यावर कामाचा कधीच ताण जाणवला नाही.”



“परिहार साहेबांची कार्यपद्धती आणि त्यांचा स्वभाव सर्वांना सोबत घेऊन जाणारा होता. महावितरणमध्ये ते आमच्यासाठी एका सावलीसारखे होते. त्यांची जळगाव येथे झालेली बदली आणि पुढील प्रवास हा त्यांच्यासाठी आनंदाचा आणि प्रगतीचा असो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना,” अशा शब्दांत भोगे यांनी त्यांना पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

भूषण भोगे, सहाय्यक अभियंता यांनी हि आपल्या भाषणात सांगितले कि मी जेव्हा अकोलेत आलो तेव्हा माझ्यासाठी सगळे नविंन होते तसेच परिहार साहेब माझ्यासाठी नवीनच होते .त्यांचा आणि माझा मोबाईल वरूनच जास्त संपर्क असायचा ते समशेरपूर ला असत मी अकोलेला पण लवकर आमची भेट झाली नाही पण नविंन माणसाला जास्त काही माहित नसत अनुभव नसतो पण परिहार साहेबांनी मला खुफ सपोर्ट केला.

माझ्या कामात खुफ मदत केली आणि रात्री किवा जास्त पाउसअसेल आणि कुठे पोल पडलेले असतील लाईनब्रेक झाली असेल काही तांत्रिक अडचण असेल तेव्हा भर पावसात परिहार साहेब आमच्या मदतीला येत केव्हा मी येणार नाही असे शब्द वापरले नाही.. त्यांच्या सोबत काम करण्यचा अनुभव चांगला होता त्यांनी खुफ काही शिकवले . असा सहकारी अधिकारी होणे नाही .पुढील वाटचालीस आणि भावी आयुष्यासाठी आमच्या सर्व टिम कडून शुभेच्छा
साहेबांच्या कामाचा अनोखा ठसा: ‘समशेरपूरची जनता नेहमीच ऋणी राहील’
परिहार साहेब यांनी आपल्या कार्यकाळात समशेरपूर आणि परिसरातील वीज ग्राहकांना अविरत व दर्जेदार सेवा दिली. वीज गळती रोखणे, तांत्रिक बिघाड त्वरित दुरुस्त करणे आणि शेतकऱ्यांना वेळेवर वीजपुरवठा करणे या बाबतीत त्यांनी नेहमीच तत्परता दाखवली. त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे आणि कामावरील निष्ठेमुळे त्यांनी अत्यंत कमी वेळात सर्वसामान्यांच्या मनात आदराचे स्थान निर्माण केले होते .
“अधिकारी असावा तर परिहार साहेबांसारखा!” निरोप समारंभादरम्यान सहकाऱ्यांनी साहेबांच्या कामाची प्रशंसा करताना सांगितले की, “साहेबांनी नेहमीच संपूर्ण टीमला एकत्र घेऊन काम केले. संकट काळात स्वतः आघाडीवर राहून त्यांनी प्रत्येक समस्येचे निवारण केले.
त्यांची बदली ही समशेरपूर आणि अकोले
कार्यालयासाठी एक मोठी पोकळी निर्माण करणारी आहे.”
समारंभातील प्रमुख
क्षण
कार्यक्रमाची सुरुवात साहेबांच्या सत्काराने झाली. कार्यालयाच्या वतीने त्यांना पुष्पगुच्छ, शाल आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
भावनिक निरोप: निरोप घेताना परिहार साहेब स्वतः भावुक झाले होते. त्यांनी अकोले -समशेरपूर येथील जनता आणि सर्व सहकारी कर्मचाऱ्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल मनापासून आभार मानले.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी साहेबांना त्यांच्या जळगाव येथील पुढील प्रवासासाठी आणि भावी वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या.

परिहार साहेब, तुम्हाला जळगाव येथील नव्या
जबाबदारीसाठी आणि पुढील उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा
-अकोले महावितरण अधिकारी तथा कर्मचारी
या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित इतर सहकाऱ्यांनीही परिहार साहेब यांच्या कामाचे कौतुक केले.
परिहार साहेब यांनी आपल्या मनोगतात अकोले आणि समशेरपूर परिसरातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार मानले. कार्यक्रमाचा शेवट अत्यंत भावूक वातावरणात आणि टाळ्यांच्या गजरात परिहार साहेबांना सन्मानपूर्वक निरोप देऊन झाला.




