"अकोल्याची 'आदर्श' शाळा! हिवरगाव आंबरे येथे विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ; यशाची १००% निपुण मोहोर!अकोले - अहिल्यानगरअकोले- हिवरगाव

“अकोल्याची ‘आदर्श’ शाळा! हिवरगाव आंबरे येथे विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ; यशाची १००% निपुण मोहोर!” “सुट्टीच्या दिवशीही ज्ञानदान! ठुबे मॅडमच्या कार्याचा पालकांकडून गौरव; चौथीच्या विद्यार्थ्यांना भावूक निरोप.”प्रतिनिधी-महेश ठुबे

"प्रशासकीय कामाचा डोंगर असतानाही, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून श्रीमती ठुबे मॅडम यांनी सुट्टीच्या दिवशीही 'ज्ञानमंदिर' उघडे ठेवले. त्यांच्या या त्यागामुळेच आज हिवरगाव आंबरे शाळेचा टक्का उंचावला आहे."

हिवरगाव आंबरे(अकोले): प्रतिनिधी-महेश ठुबे (संपादकीय)
        जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवरगाव आंब्रे येथे इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ नुकताच अत्यंत भावूक आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. केवळ निरोपच नव्हे, तर शाळेने मिळवलेल्या देदीप्यमान यशाचा गौरव सोहळा म्हणून या कार्यक्रमाची ओळख ठरली.शाळेने शैक्षणिक वर्षात मिळवलेल्या ऐतिहासिक यशाचा उत्सव ठरला.
दिनांक २८ एप्रिल २०२६, मंगळवार रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवरगाव आंब्रे येथे इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ अत्यंत दिमाखात आणि भावूक वातावरणात पार पडला. गुणवत्ता आणि संस्कारांची शिदोरी घेऊन पुढील वाटचालीस सज्ज झालेल्या विद्यार्थ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवरगाव आंब्रे, तालुका अकोले, जिल्हा अहिल्यानगर या गुणवंत व प्रगतिशील शाळेतील इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ दिनांक २८ एप्रिल २०२६ रोजी अत्यंत उत्साहपूर्ण, खेळीमेळीच्या आणि भावनिक वातावरणात मोठ्या दिमाखात संपन्न झाला.

कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या मुख्याध्यापिका तसेच इयत्ता चौथीच्या वर्गशिक्षिका आदरणीय श्रीमती ठुबे मॅडम यांच्या प्रभावी प्रास्ताविकाने झाली. त्यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व संस्कारमूल्य प्रवासाचा आढावा घेत त्यांच्या यशस्वी वाटचालीचे कौतुक केले.

    या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख मा. श्री घुले साहेब विराजमान होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून मंडळ अधिकारी सौ. प्रीतीताई आंब्रे यांची उपस्थिती लाभली. त्यांच्या मार्गदर्शनामुळे कार्यक्रमाला विशेष उंची प्राप्त झाली.

 

 

WhatsApp Unknown 2026-04-29 at 4.22.45 PM

कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष नाईकवाडी, उपाध्यक्ष अश्विनी वाकचौरे व सर्व सदस्य, गावचे सरपंच, विद्यमान उपसरपंच श्री अमोल ठुबे, तसेच साखर कारखान्याचे संचालक श्री बादशहा बोंबले यांची विशेष भाऊसाहेब नाईकवाडी उपस्थिती लाभली. याशिवाय पालक, ग्रामस्थ, अंगणवाडी सेविका व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते, त्यामुळे कार्यक्रमाला समाजाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या प्रसंगी पालकांतर्फे इयत्ता चौथीच्या वर्गशिक्षिका श्रीमती ठुबे मॅडम यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. तसेच शाळेतील श्री वाकचौरे सर, श्री मुठे सर व श्री गिऱ्हे सर यांचाही यथोचित गौरव करण्यात आला. या सन्मान सोहळ्यामुळे शिक्षकांविषयी कृतज्ञतेची भावना प्रकर्षाने व्यक्त झाली.

कार्यक्रमात अध्यक्ष मा. श्री घुले साहेब यांनी शाळेच्या गुणवत्तेचा वस्तुनिष्ठ आढावा मांडत बौद्धिक, क्रियात्मक आणि भावात्मक या तिन्ही क्षेत्रांत शाळा निपुण असल्याचे गौरवोद्गार काढले. शाळा १००% निपुण झाली असून येथील सर्व विद्यार्थी वाचन, लेखन व गणितात प्रावीण्य मिळवत असल्याचे त्यांनी अभिमानाने नमूद केले.

‘मुख्यमंत्री स्वच्छ शाळा – सुंदर शाळा’ या उपक्रमांतर्गत शाळेला केंद्रस्तरावर प्रथम क्रमांक मिळाला आहे. तसेच तालुका स्तरावर शाळा अव्वल स्थानावर असून विविध शैक्षणिक व क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी सातत्याने यश मिळवले आहे.वकृत्व, गायन, वेशभूषा, नाट्य, खो-खो, कबड्डी, धावणे, लांब उडी व उंच उडी अशा विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत प्रथम क्रमांक मिळवला आहे. जिल्हा परिषद अहिल्यानगर यांच्या ‘मिशन आरंभ’ स्पर्धा परीक्षेत शाळेतील १३ विद्यार्थी पात्र ठरले असून एक विद्यार्थी केंद्रात प्रथम आला आहे.

तसेच मंथन, ध्येय, लक्षवेध, सावित्रीबाई फुले ऑलिंपियाड आणि स्टुडन्ट टॅलेंट सर्च या विविध स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग असून ते राज्य, जिल्हा व तालुका स्तरावर अव्वल स्थान पटकावत आहेत. या सर्व उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत असल्याचे स्पष्ट दिसून येते.

कार्यक्रमादरम्यान पालक व विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त करताना शाळेबद्दलचे अपार प्रेम, जिव्हाळा आणि कृतज्ञता व्यक्त केली. शिक्षकांनी दिलेले ज्ञान व संस्कार यामुळे विद्यार्थ्यांमध्ये घडलेले सकारात्मक परिवर्तन सर्वांच्या मनोगतातून व्यक्त झाले. या क्षणी अनेक पालक व विद्यार्थी भावुक झाले होते.

इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनीही आपल्या भावना व्यक्त करत शाळेप्रती असलेले प्रेम, आठवणी आणि कृतज्ञता व्यक्त केली. निरोपाच्या या क्षणी वातावरणात एक वेगळीच भावनिक ओल जाणवत होती.

सर्व पालकांनी एकत्र येऊन या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले होते. वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचा ट्रॉफी व मेडल देऊन सत्कार करण्यात आला. तसेच शाळेच्या ग्रंथालयासाठी एक आकर्षक कपाट सप्रेम भेट म्हणून देण्यात आले, ज्यामुळे शाळेच्या शैक्षणिक साधनसंपत्तीमध्ये मोलाची भर पडली आहे.

समारोप प्रसंगी श्रीमती ठुबे मॅडम यांनी आपल्या विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक करत, त्यांनी भविष्यात मोठे होऊन शाळेचे व गावाचे नाव उज्ज्वल करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या तसेच सर्व पालक व मान्यवरांचे आभार मानले.

यानंतर नियोजनाप्रमाणे भोजनाचा कार्यक्रम पार पडला. सर्व विद्यार्थी, पालक व मान्यवरांनी एकत्र येऊन भोजनाचा आस्वाद घेतला.

अशा प्रकारे जि. प. प्राथमिक शाळा हिवरगाव आंब्रे येथील निरोप समारंभ हा उत्साह, आनंद, अभिमान आणि भावनिक क्षणांचा सुंदर संगम ठरला. कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून शाळेचा पट वाढविण्यासाठी केंद्रप्रमुखांनी पालकांना आवाहन केले.

 

खाली फोटो वर क्लिक करा


आयोजक व सहकार्य:
नितीन बोंबले, भास्कर शिंदे, गणेश आंबरे, बबन माशेरे, खंडू गिर्हे, संभाजी भांबुरे, संदीप रेवगडे, सूर्यभान आंबरे, महेश ठुबे, किरण आंबरे, संतोष नाईकवाडी, गणेश दराडे, अनिल गोरडे सर.
शालेय समिती: अध्यक्ष संतोष नाईकवाडी, उपाध्यक्ष अश्विनी वाकचौरे व समस्त पालक वर्ग.

मुख्य संपादक-सचिन रेवगडे +919623968773

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!