
शनिवार, दि. ०२ मे २०२६
आता फुल टाइम मस्ती, मोबाईल, मित्र आणि झोप हा तुमचा प्लॅन असूच शकतो. गेले वर्षभर झपाटल्यासारखे अभ्यास करत होतात तुम्ही, ठरवलेल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी. एवढी मेहनत घेतली तर तुम्ही तुमच्या मनासारखं जगणं नक्कीच डीझर्व करता.पण खूप काळ विश्रांती घेतल्यानंतर तुम्हाला जे रिकामपण जाणवणार आहे, जो कंटाळा येतोय त्याचं करायचं तरी काय असा प्रश्न मनात येणारच. व्हिडिओ गेम्स, रिल्स, चॅट आणि बाकी सारंही करून करून किती वेळ करणार? मध्येच रिझल्टची आठवण येऊन पोटात फुलपाखरे उडणारच.
ही वेळ तुम्हाला स्वतःच्या पुढच्या वाटचालीसाठी देता येईल का याचा विचार करा मुलांनो. कारण नंतरच्या कॉलेजच्या धावपळीत असं निवांतपणे विचार करायला वेळ मिळणं थोडं कठीण जाणार आहे.
एक लक्षात ठेवा की तुम्ही आता मोठे होत आहे म्हणून फक्त शैक्षणिक प्रगती पुरेशी होत नाही. एज्युकेशनल क्वालिफिकेशनबरोबरच तुम्हाला करिअरच्या पुढच्या दृष्टिकोनातून प्रोफेशनल स्किल्स आणि या खुल्या जगामध्ये वावरताना लाइफ स्किल्स यांची नितांत गरज भासणार आहे. त्या दृष्टीने निदान कोणते सोर्सेस आहेत ज्यातून अशा प्रकारची स्किल्स ग्रहण आणि विकसित करायला संधी मिळू शकेल ते तुम्ही तपासू शकता, तसेच तुमचा माईंडसेट तयार करण्याच्या दृष्टीनेही विचार करू शकता.
१० वीची परीक्षा पूर्ण झाल्यानंतर तुम्हा विद्यार्थ्यांना थोडा मोकळा वेळ मिळतो. हा वेळ फक्त विश्रांतीसाठीच नाही, तर आपल्या भविष्यासाठी उपयोगी असतो. नवीन गोष्टी शिकण्यासाठीही खूप महत्त्वाचा असतो. योग्य प्रकारे हा वेळ वापरला तर तुम्हाला तुमच्या करिअरची दिशा मिळू शकते आणि जीवनातील महत्त्वाच्या कौशल्यांचाही विकास होऊ शकतो.
१)सर्वप्रथम चक्क एक कागद आणि पेन घ्या एक यादी तयार करा ज्यातून तुम्ही स्वतःला ओळखण्याचा प्रयत्न करू शकाल .
. मला काय आवडतं?
मी कोणत्या गोष्टीत चांगला/चांगली आहे?
हे लिहून काढा आणि समजून घ्या कारण ते खूप गरजेचं आहे. काहींना विज्ञान आवडतं, काहींना कला, तर काहींना व्यवसाय क्षेत्र. यासाठी इंटरनेटवर छोट्या छोट्या aptitude tests देऊन पाहू शकता किंवा शिक्षक व पालकांशी चर्चा करू शकता.
२)दुसरं महत्त्वाचं म्हणजे नवीन कौशल्यं (skills) शिकणं. आजच्या काळात फक्त पुस्तकातील ज्ञान पुरेसं नाही. कोडींगची सुरुवातही करू शकता. यूट्यूब किंवा फ्री ऑनलाइन कोर्सच्या मदतीने हे सहज शक्य आहे.
३)तिसरं म्हणजे संवाद कौशल्य (कम्युनिकेशन स्किल्स). इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषांमध्ये नीट बोलता येणं खूप महत्त्वाचं आहे. दररोज थोडं इंग्रजी वाचणं, बातम्या ऐकणं किंवा आरशासमोर बोलण्याचा सराव करणं यामुळे आत्मविश्वास वाढतो. मित्रांसोबत चर्चाही करा.
४)चौथं म्हणजे वाचनाची सवय लावा. चांगली पुस्तकं वाचल्याने ज्ञान वाढतं आणि विचार करण्याची क्षमता सुधारते. आत्मचरित्रं, प्रेरणादायी कथा, विज्ञानाशी संबंधित पुस्तकं वाचल्यास जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो.
५)पाचवं म्हणजे वेळेचं नियोजन ( टाईम मॅनेजमेंट) शिकणं. रोजचा एक छोटे टाईम टेबल तयार करा. त्यात अभ्यास, खेळ, वाचन आणि विश्रांती यासाठी वेळ ठेवा. हे कौशल्य पुढच्या आयुष्यात खूप उपयोगी पडतं.
६)सहावं म्हणजे लहान लहान प्रोजेक्ट्स करा. उदाहरणार्थ, एखादा सायन्स एक्सपरिमेंट छोटा व्यवसाय (जसे handmade वस्तू बनवून विकणे), किंवा बागकाम . यामुळे सृजनशीलता वाढते आणि प्रॅक्टिकल नॉलेज मिळते.
७)सातवं म्हणजे शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घ्या. दररोज व्यायाम करा, योगा करा किंवा खेळा. मोबाईलचा वापर कमी करा. मेडिटेशन केल्याने मन शांत राहतं आणि लक्ष केंद्रित होतं.
८)आठवं म्हणजे सामाजिक कामात भाग घ्या. आपल्या परिसरात स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण, किंवा गरजूंना मदत करणं अशा उपक्रमांमध्ये सहभागी व्हा. यामुळे समाजाबद्दलची जाणीव वाढते आणि आपल्यात चांगले गुण विकसित होतात.
९)नववं म्हणजे वेगवेगळ्या करिअर पर्यायांबद्दल माहिती घ्या. डॉक्टर, इंजिनिअर, CA, कलाकार, डिझायनर स्टार्टअप छोटे व्यवसाय अशा विविध क्षेत्रांबद्दल जाणून घ्या. युट्युब वरील व्हिडिओ पाहून किंवा मोठ्यांशी बोलून माहिती मिळवा. त्यामुळे ११ वीला कोणती शाखा निवडायची याचा निर्णय सोपा होईल.
आजच्या डिजिटल काळात मोबाईल फक्त मनोरंजनासाठी नाही, तर शिकण्यासाठी उत्तम साधन आहे. जर योग्य गोष्टी पाहिल्या तर तुमचं आयुष्य बदलू शकतं.
उदा. विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त TED Talks
TED Talks म्हणजे छोटे पण खूप प्रभावी व्हिडिओज असतात, ज्यात जगातील तज्ज्ञ लोक त्यांचे अनुभव आणि कल्पना शेअर करतात. हे व्हिडिओज साधारण 10–18 मिनिटांचे असतात आणि खूप प्रेरणा देणारे असतात
.
तुम्ही खालील TED Talks नक्की पाहा:
1. “Inside the Mind of a Master Procrastinator” – Tim Urban
वेळ वाया घालवण्याची सवय (procrastination) कसे कमी करावे हे समजते.
अभ्यासात लक्ष कसं द्यायचं यासाठी खूप useful.
2. “Do Schools Kill Creativity?” – Sir Ken Robinson
आपली creativity सृजनशीलता नवनिर्मिती क्षमता कशी वाढवायची हे शिकवते.
फक्त मार्क्स नाही तर स्किल्स महत्त्वाची आहेत हे समजते.
3. “The Power of Introverts” – Susan Cain
शांत (introvert) विद्यार्थ्यांनाही मोठं यश मिळू शकतं हे दाखवते.
4. “What Makes a Good Life?” – Robert Waldinger
आयुष्यात यशस्वी होणे म्हणजे फक्त पैसा नाही, तर नाती जपणे पण महत्त्वाच्या आहेत.
असे TED Talks विद्यार्थ्यांना नवीन विचार देतात आणि प्रेरणा motivation देतात.
University of the People
TED-Ed (छोटे शिकवणारे व्हिडिओ)
TED-Ed हा TED चा educational भाग आहे.
येथे 5–10 मिनिटांचे animated videos असतात.
यामुळे काय फायदे होतात मुलांनो तर
सोप्या भाषेत अवघड विषय समजतात
सायन्स, सायकॉलॉजी, लाइफ स्किल्स सगळं शिकता येतं
क्विझ आणि डिस्कशन्स साठी प्रश्न मिळतात
रोज 1 व्हिडिओ पाहिला तरी तुमचं ज्ञान खूप वाढेल.
विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त वेबसाईट
1. Coursera
जगातील मोठ्या युनिव्हर्सिटीचे कोर्सेस अवेलेबल आहेत.
स्किल डेव्हलपमेंटसाठी हे खूप उपयोगी आहे.
उदाहरणार्थ
कोडींग
बिजनेस
कम्युनिकेशन स्किल्स
2. Codecademy
कोडिंग शिकायचं असेल तर हा एक बेस्ट प्लॅटफॉर्म आहे आणि
नवीन मुलांसाठी खूप सोपे आहे.
3 .Harvard, MIT सारख्या युनिव्हर्सिटीचे कोर्सेस करिअर
साठी उपयुक्त ज्ञान मिळते.
4. YouTube
मोफत शिक्षणासाठी सर्वात मोठा प्लॅटफॉर्म.
काय शिकता येईल?
spoken English
computer skills
business ideas
motivation
योग्य चॅनेल निवडलेत तर YouTube म्हणजेमोफत शाळाच आहे जणू.
विद्यार्थ्यांसाठी छोटा प्लॅन
तुम्ही सुट्टीत हा सोपा दिनक्रम पाळू करू शकता:
दररोज 1 TED Talk
1 skill video (YouTube)
1 तास नवीन skill practice
30 मिनिटे वाचन
उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे फक्त आराम नाही, तर स्वतःला अपग्रेड करण्याची संधी आहे.
आजपासून जर तुम्ही TED Talks पाहायला आणि नवीन स्किल्स शिकायला सुरुवात केली, तर पुढील 2-3 वर्षांत तुम्ही इतरांपेक्षा खूप पुढे जाल.
10 वी नंतरची सुट्टी वाया घालवू नका!
शेवटी, स्वतःवर विश्वास ठेवा. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये काहीतरी खास असतं. इतरांशी तुलना करू नका. आपलं ध्येय ठरवा आणि त्यासाठी मेहनत करा.
उन्हाळ्याची सुट्टी ही फक्त वेळ घालवण्याची नाही, तर स्वतःला घडवण्याची संधी आहे. या वेळेत शिकलेली कौशल्यं आणि घेतलेले अनुभव आयुष्यभर उपयोगी पडतात. त्यामुळे या सुट्टीचा योग्य उपयोग करा आणि आपल्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करा.




