कै.शांताराम (मामा) लंके यांच्या स्मरणार्थ कन्हैया केसरी’ कुस्त्यांचे जंगी मैदान; निघोजामध्ये रविवारी कुस्तीचा थरार रंगणार
कै.शांताराम (मामा) लंके यांच्या स्मरणार्थ कन्हैया केसरी’ कुस्त्यांचे जंगी मैदान; निघोजामध्ये रविवारी कुस्तीचा थरार रंगणार

कै.शांताराम (मामा) लंके यांच्या स्मरणार्थ कन्हैया केसरी’ कुस्त्यांचे जंगी मैदान; निघोजामध्ये रविवारी कुस्तीचा थरार रंगणार
निघोज- 29 एप्रिल
परंपरागत महाराष्ट्राच्या मातीतील कुस्ती संस्कृतीचा जागर साजरा करणारे कन्हैया केसरी’ कुस्त्यांचे भव्य जंगी मैदान रविवारी, दि. ०३ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता निघोज येथे मोठ्या दिमाखात रंगणार आहे. कन्हेर्या उद्योग समूहाचे संस्थापक कै. शांताराम (मामा) लंके यांच्या स्मरणार्थ कन्हैया उद्योग समूहाचे सर्वे सर्वां मच्छिंद्र शेठ लंके यांच्या मार्गदर्कशनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेमुळे संपूर्ण पारनेर तालुक्यात कुस्तीप्रेमींचा उत्साह शिगेला पोहोचला आहे.
शिरूर रोडवरील नायरा पेट्रोल पंपाशेजारी, कन्हैया डेअरी समोर उभारण्यात आलेल्या भव्य मैदानात नामांकित मल्लांच्या दमदार लढती पाहायला मिळणार आहेत. विशेष म्हणजे प्रमुख तीन कुस्त्यांसाठी प्रत्येकी तब्बल २ लाख ११ हजार रुपयांची आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली असून या लढती कुस्ती रसिकांसाठी पर्वणी ठरणार आहेत.
प्रमुख लढतींचा थरार :
पहिल्या मानाच्या कुस्तीत महाराष्ट्र केसरी किताब विजेते पै. पृथ्वीराज पाटील (कोल्हापूर) यांचा सामना पुण्याच्या दमदार मल्ल पै. माऊली कोकाटे यांच्याशी होणार असून ही लढत अत्यंत चुरशीची ठरणार आहे.
दुसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत पै. सुदर्शन कोकाटे (पुणे) व आर्मी सेंटरचे बलाढ्य मल्ल पै. सुमित चौधरी यांच्यात रोमहर्षक सामना रंगणार आहे.
तिसऱ्या मानाच्या कुस्तीत पै. प्रमोद सुंडे व पै. बालाजी खताव (पुणे) हे दोन ताकदवान मल्ल आमनेसामने येणार असून प्रेक्षकांना थरारक क्षण अनुभवायला मिळणार आहेत.
आकर्षक कुस्त्यांची रेलचेल :
मुख्य लढतींबरोबरच विविध वजनगटांतील अनेक आकर्षक कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले आहे. लहान गटांपासून ते अनुभवी मल्लांपर्यंत सर्वांसाठी स्वतंत्र सामने ठेवण्यात आले असून विजेत्या मल्लांना रोख पारितोषिके, मानचिन्हे व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. त्यामुळे संपूर्ण मैदानात दिवसभर कुस्तीचा उत्साह ओसंडून वाहणार आहे.



