वीरगाव (वार्ताहर): -२३-०४-२०२६
अकोले तालुक्यातील वीरगाव येथे अज्ञात व्यक्तींनी हैदोस घालत एका शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान केल्याची संतापजनक घटना घडली आहे. वीरगाव येथील शेतकरी विठ्ठल श्रीपत कुमकर यांच्या देवठाण रोडवरील राहत्या घरासमोर असलेल्या डाळिंब बागेची नासधूस करून, बांबूच्या डेपोला आग लावल्याने सुमारे ३ ते ४ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
नेमकी घटना काय? सविस्तर ✍️
मिळालेल्या माहितीनुसार, सध्या वीरगाव येथे ग्रामदैवत अंबिका मातेचा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात सुरू आहे. यात्रोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी रात्री कुमकर कुटुंबातील सर्व सदस्य ‘आखडी’च्या कार्यक्रमासाठी वीरगावमध्ये गेले होते. घर आणि शेतात कोणीही नसल्याचा फायदा घेत अज्ञात इसमांनी कुमकर यांच्या घरासमोर असलेल्या डाळिंब बागेवर कुऱ्हाड चालवली. फळधारणेवर आलेल्या डाळिंबाची फळे तोडून फेकून दिली, तसेच घराजवळ असलेले शेडनेट फाडून मोठ्या प्रमाणात नुकसान केले.
ते नराधम एवढ्यावरच न थांबता, समाजकंटकांनी घरासमोर उभ्या असलेल्या बांबूच्या डेपोला आग लावून दिली. या आगीत मोठ्या प्रमाणात बांबू जळून खाक झाले असून, एकूण ३ ते ४ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे
जगन्नाथ कानवडे आत्महत्या करणे पूर्वी ची कॉल रेकॉर्डिंग 👇
.
‘नतद्रष्ट’ समाजकंटकांचा बंदोबस्त कोण करणार? असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे.

शेतकऱ्याचा आक्रोश

हक्काचे पीक डोळ्यादेखत उद्ध्वस्त झाल्याने आणि साठवून ठेवलेला माल आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने कुमकर कुटुंबीय हवालदील झाले आहे. वर्षभर कष्ट करून उभे केलेले पीक अशा प्रकारे नष्ट झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
ज्या डाळिंब पिकाला मुलासारखे जपले, त्या एका रात्रीच्या क्रूर कृत्याने कुमकर कुटुंबाचे कंबरडे मोडले आहे. गाव यात्रेच्या आनंदात दंग असताना, अज्ञातांनी कुमकर यांच्या श्रमाची राखरांगोळी केली. आता न्याय कोणाकडे मागायचा, हाच प्रश्न विठ्ठल कुमकर यांच्यासमोर उभा आहे.”

-
पोलिस तपासाची मागणी
यात्रोत्सवाच्या गर्दीचा फायदा घेऊन गावातील शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या अशा समाजकंटकांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी शेतकरी विठ्ठल कुमकर यांनी केली आहे.
व्हिडिओ 👇 [/highlight]
कष्टाने पिकवलेल्या फळांची अशी दुरवस्था पाहून कोणाचेही काळीज पिळवटून निघेल. वीरगावच्या यात्रेत कुटुंब आनंदाने सहभागी झाले असताना पाठीमागून हा ‘डाव’ साधण्यात आला. ही चोरी नाही, तर केवळ द्वेषापोटी केलेले नुकसान असल्याचे दिसून येत आहे. पोलिसांनी या अज्ञात शत्रूंचा तत्काळ छडा लावावा! –✍️ग्रामस्थ
TV 9 MARATHI LIVE ✍️👇
