Ashok Kharat Rupali Chakankar sister case.. Pratibha Chakankar admitted to Shirdi police stationअशोक खरात-सिन्नर रुपाली Chakankarक्राइमदुनियादेशनाशिक

Ashok Kharat and Rupali Chakankar: रुपाली चाकणकर यांच्या बहीण प्रतिभा चाकणकर शिर्डी पोलीस ठाण्यात चौकशीसाठी हजर ..

Updated by -star one news marathi 

13 एप्रिल 2026

Ashok Kharat and Rupali Chakankar: मोठी बातमी: रुपाली चाकणकरांची बहीण चौकशीसाठी शिर्डी पोलीस ठाण्यात पोहोचली, अशोक खरातविषयी काय बोलणार?

Ashok Kharat and Rupali Chakankar: रुपाली चाकणकर यांच्या बहीण प्रतिभा चाकणकर शिर्डी पोलीस ठाण्यात चौकशीसाठी हजर झाल्या आहेत.

Ashok Kharat and Rupali Chakankar: नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात (Ashok Kharat) याच्या काळ्या साम्राज्याचे धागेदोरे आता राजकीय वर्तुळातील नातेसंबंधांपर्यंत पोहोचले आहेत. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांच्या बहीण प्रतिभा चाकणकर (Pratibha Chakankar) आज शिर्डी पोलीस ठाण्यात (Shirdi Police Station) चौकशीसाठी हजर झाल्या आहेत. समता पतसंस्थेतील संशयास्पद कोट्यवधींच्या व्यवहाराप्रकरणी पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली होती

Ashok Kharat and Rupali Chakankar: राजकीय वर्तुळात खळबळ

यापूर्वीच अशोक खरातशी असलेल्या संबंधांच्या आरोपावरून रुपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आता त्यांच्या सख्ख्या बहिणीचीच पोलीस चौकशी सुरू झाल्याने या प्रकरणाला मोठे राजकीय वळण मिळाले आहे. शिर्डी पोलिसांनी प्रतिभा चाकणकर यांच्या दोन पत्त्यांवर नोटीस धाडली होती, त्यानंतर त्या आज चौकशीसाठी हजर झाल्या आहेत.

Pratibha Chakankar: अशोक खरातविषयी काय बोलणार?


पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणाशी संबंधित 33 खातेदारांचे जबाब नोंदवले आहेत. मात्र, चाकणकर कुटुंबाशी संबंधित असलेल्या या खात्यांमधील मोठी रक्कम पाहता, प्रतिभा चाकणकर यांचा जबाब या संपूर्ण तपासातील सर्वात महत्त्वाचा दुवा मानला जात आहे. प्रतिभा चाकणकर काय जबाब नोंदवणार? अशोक खरातविषयी काय बोलणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

 

Star One News Marathi

राज्य, जिल्हा, तालुका आणि गावपातळीवरील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्राइम, कृषी, क्रिडा, आरोग्य, अर्थ आदी क्षेत्रांतील घडणाऱ्या घटना, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय घडामोडी https://staronenewsmarathi.in/ या न्यूज पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाइन बातम्यांच्या स्वरूपात तुमच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही २४ तास कटिबद्ध आहोत. तुमची मतं किंवा प्रतिक्रिया द्या. त्याचबरोबर तुम्हाला काही सल्ला द्यायचा असल्यास staronenews7@gmail.com या ईमेलवर जरूर पाठवाव्यात. आमच्यासाठी ही बाब नेहमीच स्वागतार्ह आहे. ⭐ महत्वाची सूचना : या न्यूज वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक /संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो अकोले न्यायालया अंतर्गत मान्य राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!