निघोज | दिनांक 2 फेब्रुवारी | पत्रकार : योगेश खाडे शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी जिल्हा परिषद गटाची निवडणूक सध्या चांगलीच चर्चेत आली
निघोज | दिनांक 2 फेब्रुवारी | पत्रकार : योगेश खाडे शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी जिल्हा परिषद गटाची निवडणूक सध्या चांगलीच चर्चेत आली

निघोज | दिनांक 2 फेब्रुवारी | पत्रकार : योगेश खाडे
शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी जिल्हा परिषद गटाची निवडणूक सध्या चांगलीच चर्चेत आली असून, येत्या दिनांक 7 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत चौरंगी लढत पाहायला मिळत असली तरी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा पवार गट) चे उमेदवार दामू अण्णा घोडे यांचे पारडे सध्या जड असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे.
टाकळी हाजी गटात विविध पक्षांचे उमेदवार आपली ताकद आजमावत असले, तरी दामू अण्णा घोडे यांनी गेल्या काळात केलेली विकासकामे, सामान्य जनतेशी असलेला थेट संपर्क आणि प्रश्न सोडविण्याची भूमिका यामुळे मतदारांमध्ये त्यांच्याविषयी विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकरी, युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांपर्यंत त्यांनी पोहोचवलेला विकासाचा अजेंडा प्रभावी ठरत असल्याचे दिसून येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार गट) ची मजबूत संघटना, कार्यकर्त्यांचे जाळे आणि अनुभवी नेत्यांचे मार्गदर्शन यामुळे प्रचाराला अधिक गती मिळाली आहे. गावोगावी बैठका, पदयात्रा आणि थेट मतदार संवादातून दामू अण्णा घोडे यांनी निवडणूक प्रचारात आघाडी घेतल्याचे राजकीय जाणकार सांगत आहेत.
दरम्यान, दिनांक 7 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीनंतर दिनांक 9 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे टाकळी हाजी गटासह संपूर्ण शिरूर तालुक्याचे लक्ष या निकालाकडे लागले आहे.
चौरंगी लढत असली तरी, सध्याच्या वातावरणात टाकळी हाजी जिल्हा परिषद गटात दामू अण्णा घोडे यांचे पारडे जड असल्याची चर्चा असून, निकालाच्या दिवशी मतदारांचा कौल नेमका कुणाच्या बाजूने लागतो याकडे सर्वांचे लक्ष केंद्रीत झाले आहे.




