तुकाईवस्ती शाळेचा राज्यभरात झळकलेला यशाचा झेंडा; विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी
तुकाईवस्ती शाळेचा राज्यभरात झळकलेला यशाचा झेंडा; विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी

तुकाईवस्ती शाळेचा राज्यभरात झळकलेला यशाचा झेंडा; विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी
निघोज- 21 एप्रिल
पारनेर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक सेमी इंग्रजी शाळा, तुकाईवस्ती (निघोज) येथील विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उज्ज्वल यश संपादन करत राज्यस्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. विद्यार्थ्यांच्या या दमदार यशामुळे संपूर्ण निघोज परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यामध्ये कु. देवांशी गणेश कवाद (इ. १ ली) हिने ‘लक्षवेध’ परीक्षेत १५० पैकी १४६ गुण मिळवत राज्यात तिसरा क्रमांक पटकावला. तसेच N.S.E परीक्षेत २०० पैकी १७८ गुण मिळवून राज्यात सहावा क्रमांक, ‘मंथन’ परीक्षेत १५० पैकी १३० गुणांसह ११ वा क्रमांक, तर ऑलिंपियाड परीक्षेत २०० पैकी १८४ गुण मिळवत उत्कृष्ट यश मिळवले आहे. देवांशी ही निघोज ग्रामपंचायत सदस्यांची मुलगी असून तिच्या यशामुळे गावाचा मान उंचावला आहे.
कु. अर्नव अदिनाथ कवाद (इ. १ ली) याने ‘लक्षवेध’ परीक्षेत १५० पैकी १२८ गुण मिळवून राज्यात १२ वा क्रमांक पटकावला. तसेच कु. युवराज हरिष वराळ (इ. १ ली) याने ‘लक्षवेध’मध्ये १३८/१५० गुणांसह राज्यात १६ वा क्रमांक, तर N.S.E मध्ये १४२/२०० गुण मिळवत राज्यात १६ वा क्रमांक मिळवला.
इयत्ता दुसरीतील कु. परी नामदेव लंके हिने N.S.E परीक्षेत २०० पैकी १८० गुण मिळवत राज्यात ११ वा क्रमांक मिळवला. तसेच कु. रुद्र नितीन कवाद (इ. १ ली) याने ‘लक्षवेध’मध्ये ११८/१५० गुणांसह राज्यात १७ वा क्रमांक, तर कु. सिया सुधाकर कवाद (इ. १ ली) हिने ११६/१५० गुणांसह राज्यात १८ वा क्रमांक मिळवला.
विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल लोकनेते खासदार डॉ. निलेशजी लंके, मळगंगा ग्रामीण ट्रस्टचे अध्यक्ष श्री. वसंत कवाद, निघोजचे माजी सरपंच श्री. ठकाराम लंके, तुकाई माता विकास ट्रस्टचे अध्यक्ष श्री. भीमाशेठ घुले, मळगंगा ग्रामीण ट्रस्टचे सचिव श्री. शांताराम कळसकर, विद्यमान सदस्य श्री. दिगंबर लागळे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. विलास कवाद, सहसचिव श्री. विश्वास शेटे तसेच गावातील विविध मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून अभिनंदन केले.
याशिवाय बाबासाहेब कवाद, बाबाजी कळसकर, विजुशेठ घुले, सूर्यकांत कवाद, सचिन निचित, माऊली कवाद, अनिल कवाद, नितीन कवाद, सतीश घुले, सुनील घुले, आदिनाथ कवाद, हरिष वराळ, सुधाकर कवाद, नामदेव लंके, योगेश कवाद, सतीश मिसाळ, दिनेश कवाद, गंगाराम इरोळे, दत्ता मिसाळ, निकलेश घोगरे आदी ग्रामस्थांनीही विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव केला.
या यशामागे शाळेतील शिक्षिका सौ. शिंदे मॅडम व सौ. शिर्के मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले असून त्यांच्या परिश्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
तुकाईवस्ती शाळेतील विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशामुळे ग्रामीण भागातील शैक्षणिक गुणवत्ता पुन्हा एकदा अधोरेखित झाली असून इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.



