
- अहिल्यानगरमधील श्रीरामपूर अन् संगमनेरमध्ये मध्यंतरी ड्रग्जचे प्रकरण चांगलेच गाजत होते. श्रीरामपूरमधील एमआयडीसीतील एका गोदामातून पोलिसांनी 14 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले होते. या ड्रग्ज प्रकरणाचे पुढे धागेदोरे तेलंगणापर्यंत निघाली. हे जप्त केलेले ड्रग्जदेखील स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात होते.
Updated by –STAR ONE NEWS MARATHI
अहिल्यानगर | स्टार वन न्युज मराठी वृत्तसेवा ✍️

✍️21 जानेवारी 2026
मेफेड्रोन अर्थात एमडी या अंमली पदार्थाची बेकायदेशिर विक्री करताना पुणे पोलिसांनी शिरुरमध्ये एका गॅरेजमालकाला पकडले. मात्र, त्याला एक किलोहून अधिक वजनाचा हा अंमलीपदार्थ नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असणाऱ्या पोलिस शामसुंदर गुजर याने विकल्याची धक्कादायक बाब समोर आली. पुणे पोलिसांनी या खाकी वर्दीतल्या शामसुंदर विश्वनाथ गुजर (बक्कल नं. 2205) या ड्रग्जमाफीयाला पहाटे चार वाजता बेड्या ठोकल्या आणि त्याची रवानगी कोठडीत केली. विशेष म्हणजे गुजर याने हा अंमलीपदार्थ गुन्हे शाखेचे निरीक्षक आणि पोलिस अधीक्षक यांच्या कस्टडीत असणाऱ्या जप्त मुद्देमालातून चोरला आणि त्याची परस्पर विक्री केली. हे करताना त्याने तितक्याच वजनाचा मैदा त्या अंमलीपदार्थामध्ये टाकला असल्याची कबुलीही दिली. पुणे पोलिसांनी हे सारे उघड केले असताना नगरच्या गुन्हे शाखेसह अनेक अधिकाऱ्यांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
अहिल्यानगर ..
याबाबतची अधिक माहिती अशी की, पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) व शिरूर पोलीस ठाण्याच्या पथकाने केलेल्या संयुक्त कारवाईत शिरूर शहरात 1 किलोहून अधिक मेफेड्रोन (एमडी) अंमली पदार्थासह गॅरेज चालकाला अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आरोपीचा अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असणाऱ्या शाम गुजर या पोलीस कर्मचाऱ्याशी निकट संबंध असल्याची गंभीर माहिती समोर आल्याने पोलीस खात्यातच खळबळ उडाली.
पुणे जिल्ह्यात अंमली पदार्थविरोधात कठोर कारवाईचे आदेश पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी दिले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शिरूर परिसरात गस्त घालत असताना अंमली पदार्थांची बेकायदेशीर विक्री होणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार, शिरूर शहरातील डंबेनाला परिसरात राहणारा गॅरेज चालक शादाब रियाज शेख (वय 41) हा बाबुरावनगर परिसरातील मोकळ्या मैदानात एमडी विक्रीसाठी येणार होता. उपविभागीय पोलीस अधिकारी शिरूर विभाग यांची परवानगी घेऊन 18 जानेवारी रोजी मध्यरात्री छापा टाकण्यात ताब्यातून 1 किलो 52 ग्रॅम आला. छाप्यात आरोपीच्या वजनाचा मेफेड्रोन (एमडी) व एक दुचाकी असा सुमारे 2 कोटी 10 लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, अटक करण्यात आलेल्या शादाब शेखचा नगरच्या एलसीबीमधील शाम गुजर याच्याशी थेट संबंध असल्याचे उघड झाले. ड्रग्स तस्करीसारख्या गंभीर गुन्ह्यात पोलीस दलातीलच कर्मचारी संशयाच्या भोवऱ्यात सापडल्याने अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. शाम गुजर याचे आरोपीशी असलेले आर्थिक व संपर्कातील व्यवहार, तसेच ड्रग्स नेटवर्कमधील सहभाग याबाबत सखोल तपास सुरू असल्याचे पुणे पोलिसांनी सांगितले.
दहा किलो अंमलीपदार्थ गायब, सापडला फक्त एक किलो![ /highlight]
नगरच्या पोलिसांनी 25 किलो एमडी जप्त केला असताना त्यात दहा किलो मैदा मिक्स करुन दहा किलो एमडी बाजारात विकण्याचे धाडस शाम गुजर याने केले. त्यातील 1 किलो एमडी शिरुरमध्ये विकताना पकडण्यात आले. उर्वरीत जवळपास 9 किलो एमडी त्याने कोठे लपून ठेवले की कोणाला विकले हे अद्याप समोर आलेले नाही. दहा किलो एमडीची बाजारातील किंमत जवळपास 25 कोटी रुपये आहे. नऊ किलो एमडी अद्यापही पोलिसांना सापडून आले नसल्याने त्याने हे कोणाला विकले याचा शोध पोलिसांना घ्यावा लागणार आहे
[highlight color="orange"]अनेक ठिकाणी दोन नंबर धंदे सुरू करून हफ्ते घेण्याचे प्रताप
शाम गुजर हा नगरच्या एलसीबीमध्ये येण्याआधी पारनेर पोलिस ठाण्यात नियुक्तीस होता. तिथे असताना त्याचे मावा, गुटखा विक्रेत्यांशी संबंध आले. गुटख्यांच्या अवैध तस्करीची रॅकेट त्याने चालवले. याशिवाय पारनेर- शिरुरमधील अनेक अवैध व्यावसायीकांशी त्याचे सुत जुळले होते. याबाबत अनेक तक्रारीही झाल्या. कायम वादग्रस्त राहिलेल्या गुजर याची पारनेरमधून बदली व्हावी असे निवेदनही गेले. मात्र, त्याला एलसीबीची बक्षिसी मिळाली. गुन्हे शाखेत नियुक्ती मिळाल्यानंतर गुजर याचे धाडस वाढले आणि त्याने थेट पोलिस अधीक्षकांच्या कस्टडीत असणाऱ्या सुपारे 25 कोटी रुपयांच्या मेफेड्रोनवर डल्ला मारला.
शाम गुजर याच्या धाडसामागे वरिष्ठांबाबत निर्माण झाली शंका!
नगर मुख्यालयातील जप्त मुद्देमालांची कस्टडी पोलिस अधीक्षक आणि गुन्हे शाखेच्या निरीक्षकांकडे आहे. त्यांच्याच या कस्टडीत दोन महिन्यांपूवि झालेल्या कारवाईत जवळपास 25 किलो एमडी अर्थात मेफेड्रोनचा साठा जप्त करुन ठेवण्यात आला होता. या कस्टडीतील मुद्देमालाला पोलिस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता. मग असे असतानाही शाम गुजर याने त्या कस्टडीत प्रवेश कसा केला? प्रवेश केल्यानंतर त्या 25 किलोपैकी 10 किलो एमडी काढताना त्याला कोणीच कसे अडवले नाही? शंका येऊ नये म्हणून गुजर याने त्यात दहा किलो मैदा मिक्स केला तरीही कोणीही त्याला अडवले कसे नाही? त्याने हा 10 किलोचा मुद्देमाल थेट शिरुरपर्यंत नेला कसा? त्याला पोलिस दलातील वरिष्ठांसह अन्य कोणत्या सहकाऱ्याचे पाठबळ मिळाले याचा शोध घेण्याची गरज आहे. ज्यांनी आता याच्या खोलात जाऊन तपास केला पाहिजे अशी सारीच मंडळी यात आरोपीच्या र्पिजऱ्यात आली असल्याने न्याय मिळणार की प्रकरण दाबले जाणार हे लवकरच समोर येईल.
✍️✍️ शेखने घेतलं श्यामसुंदरचं नाव
पुणे ग्रामीण पोलिसांनी शादाब रियाज शेख याच्याकडे केलेल्या चौकशीनंतर अहिल्यानगर पोलिस दलातील श्यामसुंदर गुजर याचे नाव समोर आलं. यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांनी काल सायंकाळी अहिल्यानगर पोलिस अधीक्षक कार्यालयात येत, श्यामसुंदर गुजर याला ताब्यात घेतलं. चौकशीनंतर त्याला अटक करण्यात आली आहे.
पोलिस अधीक्षक माहिती घेण्यात गुंतले
✍️श्यामसुंदर गुजर याला अटक केल्यानंतर अहिल्यानगर पोलिस दलात खळबळ उडाली आहे. पोलिस अधीक्षक आणि स्थानिक गु्न्हे शाखा पोलिस निरीक्षकांच्या नाकाखाली डिचून हा कारभार सुरू होता, त्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना तोंड फुटलं आहे. यासंदर्भात पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्याशी संपर्क साधला असता, सर्व प्रकरणाची माहिती घेऊन, सायंकाळी बोलणार आहे, असे सांगितले.
श्रीरामपूरमधील ड्रग्ज प्रकरण पुन्हा चर्चेत
अहिल्यानगरमधील श्रीरामपूर अन् संगमनेरमध्ये मध्यंतरी ड्रग्जचे प्रकरण चांगलेच गाजत होते. श्रीरामपूरमधील एमआयडीसीतील एका गोदामातून पोलिसांनी 14 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले होते. या ड्रग्ज प्रकरणाचे पुढे धागेदोरे तेलंगणापर्यंत निघाली. हे जप्त केलेले ड्रग्जदेखील स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात होते.





