ढवळे वस्तीला अखेर दिलासा; नवीन डीपीचे जल्लोषात उद्घाटन सुजित पाटील झावरे यांच्या हस्ते सोहळा संपन्न – वीज समस्येवर कायमस्वरूपी तोडगा
ढवळे वस्तीला अखेर दिलासा; नवीन डीपीचे जल्लोषात उद्घाटन सुजित पाटील झावरे यांच्या हस्ते सोहळा संपन्न – वीज समस्येवर कायमस्वरूपी तोडगा

ढवळे वस्तीला अखेर दिलासा; नवीन डीपीचे जल्लोषात उद्घाटन
सुजित पाटील झावरे यांच्या हस्ते सोहळा संपन्न – वीज समस्येवर कायमस्वरूपी तोडगा
निघोज – दिनाक 24 एप्रिल
ढवळे वस्ती परिसरातील नागरिकांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या वीज समस्येला अखेर दिलासा मिळाला असून, नव्याने उभारण्यात आलेल्या डीपी (डिस्ट्रिब्युशन पॉईंट) चे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. सुजित पाटील झावरे यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. या उपक्रमामुळे परिसरातील वीजपुरवठा अधिक सक्षम, सुरळीत व स्थिर होणार असल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.
कार्यक्रमास माजी सरपंच श्री ठकाराम लंके, मळगंगा ट्रस्टचे विश्वस्त श्री रमेश अण्णा ढवळे, श्री मंगेश वराळ, पैलवान सुभाष वराळ, मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे व्यवस्थापक महेश ढवळे विलास वराळ, श्री संदीप वराळ, श्री राहुल वराळ, श्री किसनराव थोरात, श्री नाथाशेठ ढवळे, श्री राजू ढवळे, श्री सुखदेव ढवळे, श्री शहाजी ढवळे श्री महेंद्र पांढरकर, श्री दत्तात्रय ढवळे आदी मान्यवरांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वीज प्रश्नांवर ठोस उपाययोजना :
ढवळे वस्तीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून कमी दाबाचा वीजपुरवठा, वारंवार खंडित होणारी लाईट आणि वाढत्या वापरामुळे निर्माण होणाऱ्या अडचणींचा नागरिकांना सामना करावा लागत होता. शेतीपंप, घरगुती वापर तसेच लघुउद्योग यांना याचा मोठा फटका बसत होता. या पार्श्वभूमीवर नवीन डीपी उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्याची अंमलबजावणी पूर्ण झाल्याने आता वीजपुरवठा अधिक सुरळीत होणार आहे.
ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद :
डीपीच्या उद्घाटनानंतर ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत, “आता वारंवार जाणारी वीज आणि कमी दाबाचा त्रास कमी होईल,” अशी भावना व्यक्त केली. या कामामुळे भविष्यातील वाढत्या वीज गरजाही पूर्ण होतील, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.
विकासाच्या दिशेने टाकलेले पाऊल :
ढवळे वस्तीच्या विकासासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असून, पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणाच्या दृष्टीने हे एक सकारात्मक पाऊल मानले जात आहे. वीजपुरवठा सक्षम झाल्यास शेती, उद्योग व दैनंदिन जीवन अधिक सुलभ होणार आहे.
कार्यक्रमाच्या शेवटी श्री गौतम ढवळे यांनी उपस्थित मान्यवर व ग्रामस्थांचे आभार मानले. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण व शिस्तबद्ध वातावरणात पार पडला.




