महाराष्ट्रमुंबई

मुंबई -केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना ‘छावा ब्रिगेड’तर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती भेट; चितळी स्टेशन येथील संभाजी महाराज जयंतीचे आमंत्रण

यावेळी बोलताना छावा ब्रिगेडच्या प्रतिनिधींनी सांगितले की, महापुरुषांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि सामाजिक ऐक्य टिकवून ठेवण्यासाठी रामदास आठवले यांचे मार्गदर्शन नेहमीच प्रेरणादायी ठरते. ना. आठवले यांनी देखील या प्रेमाबद्दल आणि सन्मानाबद्दल छावा ब्रिगेडचे आभार मानले. यावेळी छावा ब्रिगेड संस्थापक अध्यक्ष विश्वनाथ  वाघ साहेब  RPI जिल्हा उप अध्यक्ष योगेश बनसोडे ,राजू शिंदे आदि मोठ्या संखेने छावा ब्रिगेड कार्यकर्ते उपस्थित होते

मुंबई-  १२ मे २०२६ – स्टार वन न्यूज मराठी 

केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांच्या दिल्लीतील ‘संविधान’ या शासकीय निवासस्थानाचे नुकतेच नूतनीकरण करण्यात आले. या नूतनीकरणानंतर आयोजित करण्यात आलेल्या गृहप्रवेश सोहळ्याप्रसंगी ‘छावा ब्रिगेड’ च्या वतीने आठवले साहेब यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

   या मंगलप्रसंगी छावा ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी ना. रामदास आठवले यांना छत्रपती शिवाजी महाराज यांची अत्यंत देखणी आणि भव्य मूर्ती भेट देऊन त्यांचा सन्मान केला. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी “जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम” च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता.


छत्रपती संभाजी महाराज जयंतीचे निमंत्रण

केवळ शुभेच्छा देऊनच न थांबता, छावा ब्रिगेडच्या वतीने आगामी १४ मे रोजी साजरी होणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती उत्सवाचे औचित्य साधून ना. आठवले यांना प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याचे आग्रहाचे निमंत्रण देण्यात आले.

       यावेळी बोलताना छावा ब्रिगेडच्या प्रतिनिधींनी सांगितले की, महापुरुषांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि सामाजिक ऐक्य टिकवून ठेवण्यासाठी रामदास आठवले यांचे मार्गदर्शन नेहमीच प्रेरणादायी ठरते. ना. आठवले यांनी देखील या प्रेमाबद्दल आणि सन्मानाबद्दल छावा ब्रिगेडचे आभार मानले. यावेळी छावा ब्रिगेड संस्थापक अध्यक्ष विश्वनाथ

 वाघ साहेब  RPI जिल्हा उप अध्यक्ष योगेश बनसोडे ,राजू शिंदे आदि मोठ्या संखेने छावा ब्रिगेड कार्यकर्ते उपस्थित होते

        🚩 जय जिजाऊ | जय शिवराय | जय शंभुराजे | जय छावा ब्रिगेड | जय भीम 🚩

Star One News Marathi

राज्य, जिल्हा, तालुका आणि गावपातळीवरील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्राइम, कृषी, क्रिडा, आरोग्य, अर्थ आदी क्षेत्रांतील घडणाऱ्या घटना, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय घडामोडी https://staronenewsmarathi.in/ या न्यूज पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाइन बातम्यांच्या स्वरूपात तुमच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही २४ तास कटिबद्ध आहोत. तुमची मतं किंवा प्रतिक्रिया द्या. त्याचबरोबर तुम्हाला काही सल्ला द्यायचा असल्यास staronenews7@gmail.com या ईमेलवर जरूर पाठवाव्यात. आमच्यासाठी ही बाब नेहमीच स्वागतार्ह आहे. ⭐ महत्वाची सूचना : या न्यूज वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक /संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो अकोले न्यायालया अंतर्गत मान्य राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!