Updated by स्टार वन न्युज मराठी ™
2 एप्रिल 2026
मुंबई/संगमनेरः राज्याच्या राजकीय वर्तुळात आणि प्रशासकीय गोटात खळबळ उडवून देणारी एक घटना समोर आली आहे. मुख्यमंत्र्यांचा बनावट सल्लागार असल्याचे सांगून मंत्रालयात आणि विधिमंडळ परिसरात वावरणाऱ्या संगमनेरच्या तोतयाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. दत्तात्रय गुंजाळ असे या अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्यासह एकूण ७ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेरचा रहिवासी असलेल्या दत्तात्रय गुंजाळने चक्क मुख्यमंत्र्यांचे नाव वापरून अनेकांना गंडा घातल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत ५ जणांना अटक केली असून, २ आरोपी अद्याप फरार आहेत.
महत्त्वाचे मुद्देः
मंत्रालयात वावरः आरोपी थेट विधिमंडळ आणि मंत्रालयासारख्या अतिसंरक्षित ठिकाणी बनावट ओळख सांगून वावरत होता.
७ जणांवर गुन्हाः या मोठ्या रॅकेटमध्ये गुंजाळसह ७ जणांचा समावेश आहे; ५ जण पोलिसांच्या ताब्यात.
तपासाचे चक्र वेगानेः या तोतयागिरीच्या माध्यमातून आरोपीने कोणाची फसवणूक केली आहे का? आणि त्याचे धागेदोरे कोठपर्यंत आहेत, याचा पोलीस कसून तपास करत आहेत.



