30 जून 2026.
पारनेर : तालुक्यातील देवीभोयरे येथील पारनेर सहकारी साखर कारखाना विक्री प्रकरणातील कथित घोटाळ्याच्या तपासाला आता न्यायालयीन देखरेखीखाली गती मिळणार आहे. पारनेर येथील प्रथमवर्ग न्यायाधीश मुबीन शेख यांनी या प्रकरणाचा पुढील तपास न्यायालयाच्या निगराणीत करण्याचे आदेश दिले आहेत.
या प्रकरणात वर्षभरापूर्वी पारनेर न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य सहकारी बँकेचे अधिकारी, क्रांती शुगर कंपनीचे संचालक तसेच तत्कालीन तलाठी यांच्यासह संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, गुन्हा दाखल होऊन दीड वर्षाचा कालावधी उलटूनही तपासात अपेक्षित प्रगती झालेली नसल्याचा दावा कारखाना बचाव समितीने न्यायालयात केला.
तसेच, आरोपींचे अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळले असतानाही अद्याप अटक झालेली नसल्याचे आणि प्रकरणातील महत्त्वाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला नसल्याचे फिर्यादी पक्षाने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

कारखाना विक्रीशी संबंधित मूळ कागदपत्रांमध्ये फेरफार करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोपही करण्यात आला असून, संबंधित दप्तर पारनेर तहसील कार्यालयाने जप्त करून सुरक्षित ठेवले असल्याचे सांगण्यात आले. याशिवाय, तपासासाठी देण्यात आलेल्या साक्षीदारांचे जबाब अद्याप नोंदवले नसल्याची माहिती न्यायालयात मांडण्यात आली.
या सर्व बाबींची दखल घेत पारनेर न्यायालयाने पोलिसांकडून आतापर्यंत झालेल्या तपासाचा अहवाल मागवला असून, यापुढे दर पंधरा दिवसांनी तपासाच्या प्रगतीचा अहवाल न्यायालयात सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
तपासाच्या आदेशांचे पालन न केल्यास न्यायालयीन अवमानाच्या प्रक्रियेला सामोरे जावे लागू शकते, असा इशाराही न्यायालयाने दिला आहे.
या प्रकरणात कारखाना बचाव समितीच्या वतीने ॲड रामदास घावटे आणि ॲड उन्मेश चौधरी यांनी बाजू मांडली.
एक निष्ठ राहण्यासाठी आई नेक आणि बाप एक असावा लागतो 😱
दरम्यान, न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे आता तपास पारदर्शक आणि निष्पक्ष पद्धतीने होईल, असा विश्वास कारखाना बचाव समितीचे सदस्य बबनराव कवाद आणि साहेबराव मोरे यांनी व्यक्त केला आहे.



+919623968773
