निघोज येथे हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल
निघोज येथे हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल

निघोज येथे हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल
निघोज – दिनांक 1 एप्रिल
निघोज येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही हनुमान जन्मोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात येणार असून, गुरुवार दि. २ एप्रिल रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामस्थ व पवनपुत्र हनुमान मंडळाच्या वतीने या उत्सवाचे भव्य नियोजन करण्यात आले असून, परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
हनुमान जन्मोत्सवानिमित्त सकाळी लवकर अभिषेकाचा कार्यक्रम पार पडणार आहे. हा अभिषेक मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे कोषाध्यक्ष रामदासशेठ वरखडे, कपिलेश्वर उद्योग समूहाचे अध्यक्ष सोमनाथ महाराज वरखडे, उद्योजक लहूशेठ गागरे, पोपट महाराज देशपांडे, राजेंद्र उनवणे, विलासराव हारदे, ट्रस्टचे विश्वस्त संतोषशेठ रसाळ, संदीप पाटील उद्योग समूहाचे अध्यक्ष आप्पासाहेब वराळ पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य भगवान भालेकर तसेच भगवान श्रीमंदिलकर यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.
यानंतर सामुदायिक हनुमान चालीसा पठणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, भाविक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. सायंकाळी कोमल संगीत रजनीतून भक्तिमय वातावरणाची अनुभूती मिळणार आहे. तसेच कीर्तनकार तुषार महाराज गुंड यांचे प्रेरणादायी कीर्तन हा कार्यक्रमाचा विशेष आकर्षण ठरणार आहे.
दरम्यान, कै. सुमनबाई निवृत्ती उनवणे यांच्या स्मरणार्थ उनवणे परिवाराच्या वतीने तसेच ठेकेदार संतोषशेठ दुतारे, हर्षद ईधाटे आणि संतश्रेष्ठ रामदास बाबा दुसाणे दिंडी सोहळ्याचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब कोल्हे मामा यांच्या सहकार्याने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. हजारो भाविक या महाप्रसादाचा लाभ घेणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने आयोजित या सर्व धार्मिक कार्यक्रमांचा भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन निघोज ग्रामस्थ व पवनपुत्र हनुमान मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. गावात सर्वत्र भक्तीमय वातावरण निर्माण झाले असून, उत्सवाच्या तयारीला अंतिम टप्पा आला आहे.




