महाराष्ट्र

निघोज–अळकुटी जिल्हा परिषद गटात लोकसेवेचा आदर्श; वारीत वारकऱ्यांच्या आरोग्यासाठी नित्यसेवा

निघोज–अळकुटी जिल्हा परिषद गटात लोकसेवेचा आदर्श; वारीत वारकऱ्यांच्या आरोग्यासाठी नित्यसेवा

निघोज–अळकुटी जिल्हा परिषद गटात लोकसेवेचा आदर्श; वारीत वारकऱ्यांच्या आरोग्यासाठी नित्यसेवा
निघोज दिनांक 2 डिसेंबर – योगेश खाडे (पत्रकार). निघोज–अळकुटी जिल्हा परिषद गटाचे अभ्यासू व सेवाभावी नेतृत्व करणारे डॉ. भास्करराव शिरोळे आणि निघोज पंचायत समिती गणाचे कर्तव्यदक्ष सदस्य ठकाराम लंके हे विकास व समाजसेवेचा समतोल साधत निघोज परिसरात नवा आदर्श निर्माण करीत आहेत. विशेष म्हणजे डॉ. भास्करराव शिरोळे हे अळकुटी गावचे रहिवाशी असूनही संपूर्ण निघोज–अळकुटी गटातील जनतेसाठी ते सातत्याने कार्यरत आहेत.
ग्रामीण विकासाच्या दृष्टीने रस्ते, पाणीपुरवठा, वीज, शिक्षण व आरोग्य यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर लक्ष केंद्रीत करत असतानाच त्यांनी सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्यही तितक्याच ताकदीने हाती घेतले आहे. लोकप्रतिनिधी म्हणून केवळ निधी आणणे एवढ्यापुरते न राहता प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी उपस्थित राहून जनतेच्या समस्या सोडविण्यावर त्यांचा भर आहे.
डॉ. भास्करराव शिरोळे यांच्या नित्यसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या श्रद्धेचा कळस असलेल्या आळंदी वारी व पंढरीच्या वारीत दरवर्षी हजारो वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार सेवा पुरविली जाते. अनवाणी चालणाऱ्या वारकऱ्यांच्या पायांवरील जखमा, फोड, सूज, ताप, रक्तदाब, मधुमेह अशा विविध आजारांची तपासणी करून तातडीने उपचार केले जातात. या सेवेमुळे वारकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत असून नित्यसेवा प्रतिष्ठानचे कार्य वाखाणले जात आहे.
या उपक्रमासाठी पंचायत समिती सदस्य ठकाराम लंके यांचे सक्रिय सहकार्य लाभत असून प्रशासनाशी समन्वय साधून सेवा अधिक प्रभावीपणे राबविली जात आहे. विकासकामांसोबत मानवी सेवेला प्राधान्य देणारी ही जोडी आज निघोज–अळकुटी गटातील जनतेच्या विश्वासाचे केंद्र बनली आहे.
अळकुटीचे सुपुत्र असलेले डॉ. भास्करराव शिरोळे यांनी आपल्या कार्यातून “सेवा हाच खरा धर्म” हा संदेश देत निघोज–अळकुटी जिल्हा परिषद गटात विकासासोबतच सामाजिक सलोखा, सेवाभाव व आपुलकीची भावना अधिक दृढ केली आहे. त्यांच्या या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

योगेश खाडे

योगेश खाडे पाटील हे स्टार वन न्युज मराठी चे जुन्नर तालुक्यातील एक अनुभवी पत्रकार आहे ✨ जिथे अन्याय होत असेल तिथे त्यांना मदत करण्याचे काम योगेश खाडे करताना दिसतात

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!