१२ मे २०२६

+919623968773
चितळी (अहिल्यानगर):
महाराष्ट्राच्या मातीला संघर्षाचा आणि स्वाभिमानाचा मोठा वारसा लाभला आहे. हाच वारसा जपत, ‘छावा ब्रिगेड’ महाराष्ट्र राज्य ही संघटना आज सामान्यांच्या गळ्यातील ताईत बनली आहे. केवळ घोषणाबाजी न करता प्रत्यक्ष कृतीतून गरिबांच्या मदतीला धावून जाणे आणि जिथे जिथे अन्याय होतो, तिथे अन्यायाविरुद्ध ढाल बनून उभे राहणे, हीच या संघटनेची खरी ओळख निर्माण झाली आहे.

छत्रपती संभाजी महाराज जयंतीचा भव्य सोहळा येत्या गुरुवारी, १४ मे २०२६ रोजी सायंकाळी ६.०० वाजता चितळी स्टेशन (ता. राहाता) येथे छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. ‘छावा ब्रिगेड’ आयोजित या कार्यक्रमात महाराष्ट्रातील दिग्गज नेते आणि समाजसेवक उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमाचे उद्घाटन मा.ना.श्री. राधाकृष्ण विखे पाटील साहेब (मंत्री, जलसंपदा तथा पालकमंत्री) आणि मा.ना. रामदासजी आठवले साहेब (केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री) यांच्या शुभहस्ते होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षपद मा.खा.श्री. भाऊसाहेब वाकचौरे साहेब भूषवणार असून, मा.आ.श्री. विवेकभैया कोल्हे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
संघटनेचे कार्य: गरिबाला साथ अन्यायाला लाथ छावा ब्रिगेड ही संघटना केवळ उत्सव साजरे करण्यापुरती मर्यादित नसून, वर्षभर सामाजिक कार्याचा धडाका लावत असते. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. विश्वनाथ पांडुरंग वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली ही संघटना खालील मुद्द्यांवर ठामपणे उभी आहे:
अन्यायाविरुद्ध लढा: समाजातील पीडित आणि शोषित घटकांवर जेव्हा जेव्हा अन्याय होतो, तेव्हा छावा ब्रिगेडचे कार्यकर्ते कायदेशीर आणि सामाजिक स्तरावर आक्रमकपणे लढा देतात. गरिबांची साथ: आरोग्य, शिक्षण किंवा वैयक्तिक संकट असो, गरिबांना मदतीचा हात देण्यात ही संघटना नेहमीच आघाडीवर असते.शिव-शंभू विचारांचा वारसा: छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचे विचार तरुणांमध्ये रुजवण्याचे कार्य ही संघटना अविरत करत आहे.
एकजुटीचा संकल्प
या उत्सवाच्या निमित्ताने ‘छावा ब्रिगेड’चे सर्व पदाधिकारी, ज्यात प्रदेशाध्यक्ष श्री. राजेश रखमाजी शिंदे, प्रदेश सरचिटणीस श्री. बाळासाहेब पा. वाघ, श्री गणेश तोरमल प्रदेश कार्य अध्यक्ष , श्री सचिन रेवगडे पत्रकार तथा प्रदेश संपर्क प्रमुख आणि स्थानिक नेते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. या भव्य सोहळ्याला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
“जिथे अन्याय, तिथे छावा” हे ब्रीदवाक्य घेऊन धावणारी ही संघटना महाराष्ट्राच्या सामाजिक क्षेत्रात एक नवा आदर्श निर्माण करत आहे