अहिल्यानगर ✍️ अहमदनगरनिघोजमहाराष्ट्र

निघोजमध्ये रमजान ईदचा उत्साह; बंधुभावाचा सुंदर संदेश शनिवारी सकाळी १० वाजता ईदगाह मैदानात नमाज पठण; ‘ईद मुबारक’च्या शुभेच्छांची देवाणघेवाण

निघोजमध्ये रमजान ईदचा उत्साह; बंधुभावाचा सुंदर संदेश शनिवारी सकाळी १० वाजता ईदगाह मैदानात नमाज पठण; ‘ईद मुबारक’च्या शुभेच्छांची देवाणघेवाण

निघोजमध्ये रमजान ईदचा उत्साह; बंधुभावाचा सुंदर संदेश
शनिवारी सकाळी १० वाजता ईदगाह मैदानात नमाज पठण; ‘ईद मुबारक’च्या शुभेच्छांची देवाणघेवाण
निघोज / प्रतिनिधी :
पवित्र रमजान महिन्याची सांगता होताच आनंद, समाधान आणि बंधुभावाचा संदेश देणारा रमजान ईदचा सण निघोज येथे अत्यंत उत्साहात व धार्मिक वातावरणात साजरा करण्यात आला. शनिवारी सकाळी १० वाजता निघोज येथील ईदगाह मैदानात मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने एकत्र येत सामूहिक नमाज पठण करण्यात आले.
ईदच्या निमित्ताने पहाटेपासूनच गावात आनंदाचे वातावरण पसरले होते. नवीन वस्त्र परिधान करून लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वजण ईदगाह मैदानाकडे उत्साहाने दाखल झाले. नमाज अदा केल्यानंतर एकमेकांना आलिंगन देत ‘ईद मुबारक’च्या शुभेच्छा देण्यात आल्या. या प्रसंगी समाजात प्रेम, आपुलकी आणि एकतेची भावना अधिक दृढ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
यावेळी हारूनभाई तांबोळी, इम्तियाज मोमिन, रफिक सय्यद, रफिक हवालदार, असीम हवालदार, हाजी युनूसभाई तांबोळी, सुलतान सय्यद, मौलाना तसेच सर्व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी मौलाना यांनी मार्गदर्शन करताना ईदचा खरा संदेश अधोरेखित केला. समाजात शांतता, बंधुभाव आणि परस्पर सहकार्य टिकवून ठेवणे हीच ईदची खरी शिकवण असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच गरजूंना मदत करण्याचे महत्त्वही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
निघोजमध्ये उत्साहपूर्ण आणि शांततेत पार पडलेला रमजान ईद सण समाजातील ऐक्य आणि सद्भावनेचा प्रेरणादायी संदेश देऊन गेला.

योगेश खाडे

योगेश खाडे पाटील हे स्टार वन न्युज मराठी चे जुन्नर तालुक्यातील एक अनुभवी पत्रकार आहे ✨ जिथे अन्याय होत असेल तिथे त्यांना मदत करण्याचे काम योगेश खाडे करताना दिसतात

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!