अकोले

अकोले:वीरगावात दहशत माजवणारा बिबट्या अखेर जेरबंद; हिवरगाव, गणोरे, डोंगरगाव पंचक्रोशीत बिबट्यांची दहशत,अन्य बिबटे पकडण्याचे नागरिकांची वनविभागाकडे मागणी

Updated by। स्टार वन न्यूज नेटवर्क

20 जानेवारी 2025

अहिल्यानगर –अकोले

अकोले तालुक्यातील वीरगाव परिसरात रविवार, दि. 18 रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास एका बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या बिबट्याने परिसरात मोठी दहशत निर्माण केली होती.

बिबट्या पिंजऱ्यात अडकल्याची माहिती शेतजमिनीचे मालक भरत वाकचौरे आणि शेजारी ज्ञानेश्वर वाकचौरे यांनी तात्काळ वन कर्मचारी बाळासाहेब थोरात यांना दिली. 

परिसरात दहशत पसरवणारा हाच तो बिबट्या आहे का, हे पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी

गर्दी केली होती. 

तर वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाल्यानंतर परिसरात तनावपूर्ण परिस्थिती पाहायला मिळत होती बिबट्या जेरबंद केल्याच्या ठिकाणी मोठ्या संख्येने ग्रामस्थ जमले होते या ठिकाणी परिस्थिती तणावपूर्ण दिसून येत होती वन कर्मचारी बाळासाहेब थोरात यांनी गर्दीवर नियंत्रण मिळवत बिबट्याला पिंजऱ्यासह देवठाण येथील वनविभागाच्या नर्सरीमध्ये हलवले आहे. 

गेली दोन वर्षापासून वीरगाव, हिवरगाव,देवठाण तसेच गणोरे पंचक्रोशीत अनेक बिबटे दिवसा ही फिरताना दिसत आहे. सोबत त्याची पिल्ले ही नागरकिना दिसून आले आहे. या आधी एवढे बिबटे परिसरात दिसत नव्हते परंतु याला जबाबदार वनविभागाच असून एकदा परिसरात पकडले बिबटे हे शेजारील गावात नेऊन सोडण्याचा फंडा हे वन विभाग राबवताना दिसत आहे.

 

सिन्नर तालुक्यातील निराळे, घोटेवाडी परिसरातिल लोकांनी त्याच्या गावात केव्हा बिबट्या पाहिलेला नव्हता परंतु आता चार ते पाच बिबटे सोबतच फिरताना दिसतात. एवढे बिबटे एकदम आले कसे तर ते बिबटे हे वनविभागाने आमच्या परिसरात आणून सोडले असल्याचा आरोप नागरिक करत आहे.

अजूनही नरभक्षक बिबटे रात्र दिवसा फिरताना नागरिकांना दिसत आहे त्यामुळे वनविभागाने लवकरात लवकर बाकी बिबटे ही पकडावे अन्यथा नागरिकांना आंदोलन करण्याची वेळ येऊ शकते हे वन विभागाने लक्षात ठेवावे.

 

✍️वीरगाव परिसरात बिबट्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून सध्या ऊस तोडणीचा हंगाम सुरू असल्याने उसाचे क्षेत्र वेगाने कमी होत आहे.

निवारा नष्ट झाल्याने बिबटे आता उघड्यावर फिरताना दिसत असून मानवी वस्तीला धोका निर्माण झाला आहे. पकडलेल्या बिबट्याव्यतिरिक्त अजूनही काही बिबटे या भागात सक्रिय असण्याची दाट शक्यता आहे.या पार्श्वभूमीवर वन विभागाने परिसरात अधिक पिंजरे लावून बिबट्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी मागणी अण्णासाहेब थोरात यांनी केली आहे.

अण्णासाहेब थोरात 📍👇 सामाजिक कार्यकर्ते

 

संपादक सचिन रेवगडे ✍️ 📱+919623968773

 

Star One News Marathi

राज्य, जिल्हा, तालुका आणि गावपातळीवरील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्राइम, कृषी, क्रिडा, आरोग्य, अर्थ आदी क्षेत्रांतील घडणाऱ्या घटना, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय घडामोडी https://staronenewsmarathi.in/ या न्यूज पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाइन बातम्यांच्या स्वरूपात तुमच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही २४ तास कटिबद्ध आहोत. तुमची मतं किंवा प्रतिक्रिया द्या. त्याचबरोबर तुम्हाला काही सल्ला द्यायचा असल्यास staronenews7@gmail.com या ईमेलवर जरूर पाठवाव्यात. आमच्यासाठी ही बाब नेहमीच स्वागतार्ह आहे. ⭐ महत्वाची सूचना : या न्यूज वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक /संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो अकोले न्यायालया अंतर्गत मान्य राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!