Uncategorized

निघोज स्पोर्ट्स ॲकॅडमी खेळाडू विकासासाठी सक्षम –वसंत कवाद सर ✍️प्रतिनिधी– योगेश खाडे

निघोज स्पोर्ट्स ॲकॅडमी खेळाडू विकासासाठी सक्षम वसंत कवाद सर

Updated by स्टार वन न्युज मराठी ™ 
निघोज / प्रतिनिधी

🌍मोबाईलपेक्षा विद्यार्थी खेळाच्यमाध्यमातून सक्षम झाला पाहिजे यासाठी बाबासाहेब कवाद ग्रामविकास सेवाभावी संस्था संचलित लहान मुलांच्या शाळा परिसरातील जागेत निघोज स्पोर्ट्स ॲकॅडमी सुरू केली असल्याची माहिती संस्थेचे सचिव वसंत कवाद सर यांनी दिली आहे. या ॲकॅडमीचे उद्घाटन शुक्रवार दि.१६ रोजी माजी सरपंच चंद्रकांत लामखडे, वसंत ढवण, मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे उपाध्यक्ष अमृताशेठ रसाळ , ट्रस्टचे कोषाध्यक्ष रामदासशेठ वरखडे, बाबासाहेब कवाद ग्रामविकास सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष शांताराम कळसकर, उपाध्यक्ष प्रकाशशेठ कवाद, संगीता कवाद, माजी सरपंच ठकारामशेठ लंके, ज्येष्ठ पत्रकार दत्तात्रय उनवणे, बाबासाहेब कवाद निघोज नागरी सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष नामदेवराव थोरात , पारनेर तालुका प्रेस फोटोग्राफर संघटनेचे ज्येष्ठ मार्गदर्शक संतोषशेठ पंदारे, आपली माती आपली माणसं या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रुपेश ढवण, प्रशांत लोळगे, रमेशशेठ लंके, सोसायटीचे चेअरमन सुनिल वराळ, ज्येष्ठ मार्गदर्शक ॲड. बाळासाहेब लामखडे, राजूकाका देशपांडे, प्राचार्य डायस सर , मनिषा एरंडे,
आदींच्या उपस्थितीत व विविध स्पर्धांचे उद्घाटन करुण करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती देवीचे व संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब कवाद यांच्या प्रतिमेचे पूजन करुण पुष्पहार अर्पण करण्यात आला.

या स्पोर्ट्स ॲकॅडमीत क्रिकेट , कब्बडी, कॅरम,बुद्धीबळ यासाठी प्रशिक्षित शिक्षक असून विद्यार्थ्यांकडून कमी फी घेऊन विद्यार्थी विविध खेळात प्राविण्य कसे मिळवतील यासाठी प्रयत्न करणार आहे अशी माहिती कवाद सर यांनी दिली आहे. बाबासाहेब कवाद ग्रामविकास सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष शांताराम कळसकर यावेळी म्हणाले इंग्रजी शाळा हे संस्थापक बाबासाहेब कवाद यांचे स्वप्न होते. यामध्ये मराठी, इंग्रजी शिक्षण याबरोबरच विविध खेळांचे प्रशिक्षण मिळत आहे. शाळेची फी सर्वसामान्य जनतेला परवडेल अशीच आहे. स्व.कवाद यांनी पन्नास वर्षे सामाजिक कामांच्या माध्यमातून तालुक्यासाठी योगदान दिले आहे. त्यांचेच अनुकरण करीत संस्था पदाधिकारी व निघोज ग्रामीण संस्था परिवारातील सदस्य निस्वार्थीपणे व पारदर्शकपणे काम करीत आहेत. म्हणून संस्था परिवारातील सर्व संस्थांचा विकास होताना या संस्थांचा फायदा सर्वसामान्य जनतेला कसा होईल यासाठी सर्व पदाधिकारी व सदस्य प्रयत्नशील आहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य डायस सर यांनी केले शेवटी संस्थेचे उपाध्यक्ष प्रकाशशेठ कवाद यांनी आभार मानले.
चौकट – यावेळी या शाळेच्या विद्यार्थ्यांनी इंग्रजी गाण्यावर नृत्य करुण उपस्थीतांचे मनोरंजन केले. तसेच कब्बडी स्पर्धा उदघाटन करुण मुलींच्या दोन्ही संघाने उत्कृष्ट खिलाडू वृत्ती दाखवून उपस्थीतांना कब्बडी स्पर्धा किती महत्त्वपूर्ण आहे याची माहिती दिली. क्रिकेट ग्रांऊंडचे उद्घाटन करताना संस्थेचे अध्यक्ष शांताराम कळसकर, उपाध्यक्ष प्रकाशशेठ कवाद, सचिव वसंत कवाद सर,माजी सरपंच ठकारामशेठ लंके,आपली माती आपली माणसं या सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रुपेश ढवण यांनी उत्कृष्ट क्रिकेट खेळत व्यायामाच्या दृष्टीने क्रिकेट खेळ किती महत्वाचा आहे हे दाखवून दिले. धावण्याच्या स्पर्धेचे नियोजन करीत व्यवस्थापक समीतीच्या अध्यक्षा संगीता कवाद यांनी उत्कृष्ट नियोजन केले.
चौकट.
आजकाल शारीरिक व्यायामाचा अभाव कमी होत चालला आहे. मोबाईल युगात विद्यार्थी असो की त्यांचे पालक यांचे सर्वस्वी लक्ष मोबाईलने केंद्रीत केले आहे. विद्यार्थ्यांना व्यायामाचे तसेच खेळाचे महत्त्व समजण्यासाठी निघोज स्पोर्ट्स ॲकॅडमीचा चांगला उपयोग होणार आहे. निघोज व परिसरात चांगले खेळाडू तयार होण्याचा मुख्य उद्देश आहे.‌
प्रकाशशेठ कवाद
( उपाध्यक्ष बाबासाहेब कवाद ग्रामविकास सेवाभावी संस्था)

योगेश खाडे

योगेश खाडे पाटील हे स्टार वन न्युज मराठी चे जुन्नर तालुक्यातील एक अनुभवी पत्रकार आहे ✨ जिथे अन्याय होत असेल तिथे त्यांना मदत करण्याचे काम योगेश खाडे करताना दिसतात

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!