महाराष्ट्र

कै. स्वर्गीय शांताराम (मामा) भाऊ लंके यांच्या प्रथम पुण्यस्मरण सप्ताहाच्या सातव्या दिवशी निघोज येथे कीर्तनरूपी सेवेने अवघा परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.

कै. स्वर्गीय शांताराम (मामा) भाऊ लंके यांच्या प्रथम पुण्यस्मरण सप्ताहाच्या सातव्या दिवशी निघोज येथे कीर्तनरूपी सेवेने अवघा परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.

निघोज – 24 डिसेंबर (योगेश खाडे)
कै. स्वर्गीय शांताराम (मामा) भाऊ लंके यांच्या प्रथम पुण्यस्मरण सप्ताहाच्या सातव्या दिवशी निघोज येथे कीर्तनरूपी सेवेने अवघा परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. ह.भ.प. विशाल महाराज खोले यांच्या मधुर, रसाळ व प्रभावी वाणीतील कीर्तनाने उपस्थित भाविक अक्षरशः मंत्रमुग्ध झाले. संतवाणीचा गजर, नामस्मरणाची तल्लीनता आणि भावशुद्ध सेवेचे वातावरण यामुळे हा दिवस पुण्यस्मरण सप्ताहातील अत्यंत भावपूर्ण पर्व ठरला.
“देवा आता ऐसे करी उपकार, देहाचा विसर पाडी मज…”
या संत तुकाराम महाराजांच्या अभंगातून महाराजांनी देहभानाचा त्याग, आत्मिक शुद्धी आणि ईश्वरचरणी निष्ठा यांचे मर्म उलगडले. भय, चिंता, लाज, काम, क्रोध यांसारख्या मानवी दुर्गुणांपासून मुक्त होण्यासाठी नामस्मरण, संतसंग आणि सेवा हाच खरा मार्ग असल्याचा संदेश त्यांनी उपस्थितांच्या मनात ठसवला.
“आवडे ही चिंता राखी पाया पाशी…”
या अभंगाच्या आधारे महाराजांनी मन, बुद्धी व वृत्ती ईश्वरचरणी अर्पण केल्यास जीवन सुखमय होते, हे अत्यंत सोप्या भाषेत समजावून सांगितले. “तुका म्हणे नको वर पांग देवा, नामो की संतसंग तेही” या संतवचनातून सांसारिक वरदानांपेक्षा नामभक्ती व संतसंग श्रेष्ठ असल्याचे त्यांनी प्रभावी उदाहरणांतून मांडले.
हा संपूर्ण पुण्यस्मरण सप्ताह मच्छिंद्रशेठ लंके यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कन्हैया उद्योग समूहाचे संचालक बबन मामा लंके यांच्या संयोजनातून अत्यंत शिस्तबद्ध, श्रद्धा व भक्तिभावाने आयोजित करण्यात आला आहे. कै. शांताराम (मामा) भाऊ लंके यांच्या धार्मिक, सामाजिक व सेवाभावी कार्याची आठवण जागवणारा हा सप्ताह निघोज परिसरात अध्यात्मिक वातावरण निर्माण करणारा ठरला आहे.
सातव्या दिवसाचे कीर्तन भाविकांच्या अंतःकरणात दीर्घकाळ रुंजी घालणारे ठरले. कीर्तनानंतर भाविकांनी समाधान व्यक्त करत आयोजकांचे मनःपूर्वक कौतुक केले.

योगेश खाडे

योगेश खाडे पाटील हे स्टार वन न्युज मराठी चे जुन्नर तालुक्यातील एक अनुभवी पत्रकार आहे ✨ जिथे अन्याय होत असेल तिथे त्यांना मदत करण्याचे काम योगेश खाडे करताना दिसतात

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!