
Updated by –स्टार वन न्युज मराठी वृत्तसेवा ✍️
17 नोव्हेंबर 2024
✍️ गणोरे ✍️ अहिल्यानगर
अकोले पोलिस स्टेशन येथे मयत जगन्नाथ कानवडे यांचा मुलगा संकेत कानवडे याने 28. (ऑक्टोबर) फिर्याद दाखल केल्या नंतर. आरोपी यांनी संगमनेर येथील कोर्टात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला.
त्यात पाच आरोपी चा जामीन मंजूर झाला तर दोन आरोपी संदीप आणि शेखर वाकचौरे चां जामीन अर्ज फेटाळण्यात आला
तेव्हा पासून अकोले पोलिस हे आरोपी च्या शोधत आहे. परंतु आरोपी सापडून येत नव्हते.
त्यातच पाच आरोपी चा जामीन जेव्हा ठेवला तेव्हा आरोपी चा जामीन होऊ नाही या मुळे फिर्यादी यांच्या कडून एक वकील ही देण्यात आला.
परंतू तो वकील ही फोडण्यात आला व आरोपी नि जामीन करून घेतला असा आरोप मयत जगन्नाथ कानवडे चे नातेवाईक करत होते
आज 20 दिवस होऊनही एक ही आरोपी अकोले पोलिस ना मिळून आला नाही शेवटी मयत जगन्नाथ कानवडे च्या नातेवाईकांचा संयम सुटला आणि तीस ते चाळीस नातेवाईक यांनी थेट गणोरे येतील डॉक्टर रेवण वाकचौरे चे हॉस्पिटल गाठले व तिथेच ठिय्या आंदोलन सुरू केले.

त्या नंतर तेथे काही पत्रकार आले पत्रकार आल्यानंतर त्यांनी पोलिस ना खबर दिली अकोले पोलिस निरीक्षक बोरसे साहेब तसेच psi खांडबहाले साहेब यांनी नातेवाईकांना विनवणी केली की तुमचे जे काही म्हणणे आहे अकोले पोलिस स्टेशन येथे द्या मग आम्ही पुढील कार्यवाही करू
✍️परंतु नातेवाईक ऐकायला तयार नव्हते त्यांचे एकच म्हणणे होते की डॉक्टर रेवण ला यात आरोपी करा
👇हे ठिय्या आंदोलन सुरू असतानाच नातेवाईक यांना माहिती भेटली की आरोपी संदीप आणि शेखर वाकचौरे हे घरीच आहे त्यामुळे रेवण वाकचौरे च्या हॉस्पिटल समोर बसलेले नातेवाईकांनी थेठ आरोपी संदीप आणि शेखर वाकचौरे चे घर गाठले.परंतु आरोपी च्या घरच्यांनी घरासमोरील गेट आणि घराचे दरवाजे लाऊन घेतले
मयत ज

गन्नाथ कानवडे च्या नातेवाईक यांची एकच मागणी होती आरोपी घरात असेल तर त्यांना बाहेर पाठवा परंतु कोणी ही घराबाहेर येत नव्हते.
त्यातच तिथे आरोपी संदीप च्या घरचे प्लास्टर चे काम सुरू दिसले
त्या कामावर मयत जगन्नाथ कानवडे यांचे चोरून ठेवलेले समान चां वापर सुरू असल्याचे त्यांना दिसले
परिणामी मयत कानवडे च्या नातेवाईक यांचा संयम सुटत चालला होता
त्या नंतर psi खांडबहाले. तसचे त्यांची टीम त्याठिकाणी हजर झाली तेव्हा आरोपी च्या घरच्यांनी गेट उघडला त्यानंतर मयत कानवडे यांचे नातेवाईक आणि पोलिस नि सर्व बंगल्याची झाडा झडती घेतली परिणामी आरोपी मिळून आले नाही
नातेवाईक यांचे म्हणणे होते की आरोपी घरातच होते त्यांना पळून लावण्यांत आले.
त्याठिकाणी फिल्मी राडा झाल्याचे दिसून आले
तसचे याठिकाणी सुरू असलेले काम तसेच अन्य ठिकाणी सुरू असलेले काम बंद ठेवण्यात यावे कारण आमच्या माणसांकडून काम करून घेऊन त्यांची बिले मिळणे बाकी असून जो पर्यंत केस निकाल लागत नाही तोपर्यंत कामे बंद ठेवत असेल आणि आरोपींना लवकरात लवकर अटक करणार असेल तरच आम्ही येथून जाऊ असा पवित्रा मयत कडील नातेवाईकांनी घेतला होता
त्यानंतर PSI खांडबहाले साहेब यांनी आश्वासन दिले कामे बंद राहतील आरोपींना आम्ही लवकरात लवकर अटक करून त्यानंतर नातेवाईक यांनी तेथून 💊 डॉक्टर रेवण च्या हॉस्पिटल येथे दाखल झाले
PSI खांडबहाले साहेब यांनी डॉक्टर रेवण ला संपर्क केला असता मी उद्या येणार आहे असे उत्तर आले त्यानंतर नातेवाईक बोलले की तो उद्या येऊ परवा येऊ आम्ही तो समोर येत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही आम्ही हॉस्पिटल समोरच झोपू असा पवित्रा नातेवाईक यांनी घेतला …
पत्रकार यांनी त्यांना काही प्रश्न विचारले की तुमचे येते येण्याचे नियोजन काय तसेच तुम्ही या आधी डॉक्टर रेवण चे नाव का नाही फिर्याद मध्ये दाखल केले
त्यावर त्यांनी सांगितले की आमचा माणूस गेला होता आमच्या मनावरील घाव अजून ही तसेच आहे संकेत तेव्हा आजारी झाला आणि हॉस्पिटल मध्ये ऍडमिट होता फिर्याद पण देतानी तो त्या मानसिकतेत नव्हता
परंतु काही कॉल रेकॉर्डिंग संभाषण च्या आधारे काही बाबी या लेट समोर आल्या तसेच डॉक्टर रेवन च्या घटना घडल्या त्यादिवशी काही संशयास्पद बाबी समोर आल्यामुळे आम्ही डॉक्टर रेवण ला यात आरोपी करा असे पोलीस कडे मागणी करतो यात सात जण जेवढे आत्महत्येस दोषी आहे तेवढेच हा रेवण वाकचौरे सुद्धा दोषी आहे असे नातेवाईक यांनी आरोप केला.
लवकरात लवकर कार्यवाही झाली पाहिजे
यासाठी आम्ही मोठे आंदोलन तथा आमरण उपोषण करू अशी भूमिका नातेवाईक यांनी घेतली.
मयत जगन्नाथ कानवडे यांना कोण कोण त्रास देत होत हे काही कॉल रेकॉर्डिंग मुळे समोर आल्याचे चित्र दिसत आहे त्या रेकॉर्डिंग आमच्याकडे आहे आम्ही त्या पोलिस स्टेशन ला दिल्या असून त्यावर सखोल तपास करून कार्यवाही झाली पाहिजे अशी भूमिका नातेवाईक यांनी घेतली
डॉ.रेवणनाथ वाकचौरे यांच्यासह अभिजित शिंदे,निखिल दीक्षित यांना आरोपी करण्याची मागणी नातेवाईक यांनी केली
परिणामी 👇
अकोले पोलिस तसेच psi खांडबहाले साहेब नि आश्वासन दिले की आम्ही आरोपींना लवकरात लवकर अटक करू आम्हाला डॉक्टर रेवण विरोधात जे माहित आहे तो जबाब आम्हाला द्या
मग आम्ही त्यावर तपास करून बाकी लोकांना यात सह आरोपी करू असे आश्वासन पोलिसांकडून देण्यात आले
त्यानंतर सगळे नातेवाईक हे अकोले पोलिस स्टेशन येथे जमा झाले त्यानंतर रेवण वाकचौरे विरोधात पुरवणी जबाब दिल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे
या पुढे काय कार्यवाही होते या कडे सगळ्याचे लक्ष लागले आहे …




