HSRP number plat .Marathi news महाराष्ट्र. स्टार वन न्युज मराठी वृत्तसेवा महाराष्ट्र Star one news Marathiमहाराष्ट्रमुंबई

HSRP Number Plate : हाय सिक्युरिटी नंबर प्लेट; 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ (पहा RTO पत्रक) वाहनधारकांना मोठा दिलासा, पण ‘या’ तारखेनंतर होणार कडक कारवाई✍️

] 🇮🇳राज्यभरात वाहनांची सुरक्षा आणि ओळख प्रमाणित करण्यासाठी HSRP बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, अनेक वाहनधारकांनी अद्याप या नियमाची पूर्तता केलेली नाही. वाहनधारकांची ही उदासीनता आणि तांत्रिक अडचणी लक्षात घेता, शासनाने पुन्हा एकदा मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.

Updated by स्टार वन न्युज मराठी ™ 

🇮🇳 15 ऑगस्ट 2025

छत्रपती संभाजीनगर : हाय सिक्युरिटी नंबर प्लेट (HSRP)बसवण्यासाठी अखेर मुदतवाढ देण्यात आली असून, आता 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानंतर मात्र 1 डिसेंबर पासून कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती आरटीओ कार्यालयाच्या वतीने देण्यात आली. आता वाहनधारकांना ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंतची सवलत मिळाली असली तरी, ही शेवटची संधी असल्याचे स्पष्ट संकेत प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (RTO) दिले आहेत.


हे हि वाचा 👇🫢

शेतकऱ्याचा पैशांसाठी छळ; पैठण तहसील कार्यालयात एसीबीची कारवाई,तलाठी अक्षय बिनीवाले व कोतवाल सोमनाथ राघू कोल्हे अटक.* *स्टार न्युज 


 

🇮🇳राज्यभरात वाहनांची सुरक्षा आणि ओळख प्रमाणित करण्यासाठी HSRP बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, अनेक वाहनधारकांनी अद्याप या नियमाची पूर्तता केलेली नाही. वाहनधारकांची ही उदासीनता आणि तांत्रिक अडचणी लक्षात घेता, शासनाने पुन्हा एकदा मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सुमारे 7 लाखापेक्षा ही जास्त वाहनधारकांनी हाय सिक्युरिटी नंबर पलेट्साठी नोंदणीही केली नव्हती. आतापर्यंत तीन वेळा मुदतवाढ दिली असून 30 तारीख ही चौथी वेळ मुदतवाढ राहणार आहे. यानंतर मात्र मुदतवाढ मिळणार नसून 1 डिसेंबर पासून कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती आरटीओ कार्यालयाच्या वतीने देण्यात आली.

   १ डिसेंबर २०२५ पासून HSRP नसलेल्या वाहनांवर कडक कारवाईची मोहीम हाती घेतली जाणार आहे. या मोहिमेअंतर्गत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई केली जाईल असेही विभागाने काढलेल्‍या परिपत्रकात म्‍हटले आहे.

Star One News Marathi

राज्य, जिल्हा, तालुका आणि गावपातळीवरील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्राइम, कृषी, क्रिडा, आरोग्य, अर्थ आदी क्षेत्रांतील घडणाऱ्या घटना, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय घडामोडी https://staronenewsmarathi.in/ या न्यूज पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाइन बातम्यांच्या स्वरूपात तुमच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही २४ तास कटिबद्ध आहोत. तुमची मतं किंवा प्रतिक्रिया द्या. त्याचबरोबर तुम्हाला काही सल्ला द्यायचा असल्यास staronenews7@gmail.com या ईमेलवर जरूर पाठवाव्यात. आमच्यासाठी ही बाब नेहमीच स्वागतार्ह आहे. ⭐ महत्वाची सूचना : या न्यूज वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक /संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो अकोले न्यायालया अंतर्गत मान्य राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!