
Published by स्टार वन न्युज मराठी ™ अकोले
संपादक ✒️सचिन रेवगडे 📱+919623968773
9 जुलै 2025
"शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा!"
अहिल्यनगर – ब्राम्हणवाडा (ता. अकोले)
✍️✍️
भारतीय बौद्धजन विकास समिती (पिंपरी-चिंचवड/मावळ/पुणे) यांच्या अंतर्गत कार्यरत अनोखे अभिवादन वही-पेन संकलन व वितरण समिती (महाराष्ट्र) यांच्यातर्फे दिनांक ०६ जुलै २०२५, रविवार रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वितरण उपक्रम संपन्न झाला.
माननीय समाजसेवक गौतमजी शिंदे यांच्या विशेष मागणीवरून मू. पो. ब्राम्हणवाडा (ता. अकोले) येथील मातोश्री लक्ष्मीबाई संगारे प्राथमिक आश्रम शाळा व प्राथमिक केंद्र शाळा ब्राम्हणवाडा येथे विद्यार्थ्यांना वही-पेनचे मोफत वाटप करण्यात आले.
फोटो गॅलरी 👇
या उपक्रमासाठी समितीच्या वतीने अध्यक्ष प्रमोद गायकवाड, आयु. रामदास इंगळे, अनिताताई इंगळे, उर्मिलाताई सोनवण, आशाताई शिंदे, उत्तमजी मोरवेकर, राजेंद्र वाघमारे, संजय सोनकांबळे यांची विशेष उपस्थिती लाभली.
फोटो गॅलरी 👇
कार्यक्रम प्रसंगी आश्रम शाळेचे सचिव संगारे साहेब, संस्थेचे माजी अध्यक्ष साळुंखे, ब्राम्हणवाडा विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन पोपटराव हांडे, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, नालंदा जनसेवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी,गावातील मान्यवर, पत्रकार बांधव, तसेच गौतमजी शिंदे यांनी कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात मोलाचे योगदान दिले.
शाळकरी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलवणारा हा उपक्रम अत्यंत प्रसन्न आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला.
— अध्यक्ष, प्रमोद गायकवाड (मो. ७७४५०५२५६५)
अनोखे अभिवादन वही पेन संकलन व वितरण समिती (महाराष्ट्र)