निघोज -वराळ पतसंस्थेच्या संचालक ,प्रशासक ,ऑडिटर ,चौकशी अधिकारी यांना औरंगाबाद खंडपीठाची नोटीस….. प्रतिनिधी ✍️ योगेश खाडे
वराळ पतसंस्थेच्या संचालक . प्रशासक . ऑडिटर .चौकशी अधिकारी .यांना औरंगाबाद खंडपीठाची नोटीस...

पारनेर दिनाक 10 मे.
निघोज ता.पारनेर येथील सहकारमहर्षी किसनराव वराळ पाटील ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाने इमारत विक्रीतुन आलेले दिड कोटी तसेच नव्याने निर्माण केलेल्या ८० लाखांच्या ठेवी तसेच कर्ज वसुलीतुन आलेले अंदाजे १ कोटी असे ३ कोटी ३० लाख रुपये उपलब्ध फंड झाला असताना सर्व सामान्य ठेवीदारांना ठेवी न देता तत्कालीन चेअरमन रंगनाथ वराळ व त्यांचेच नातेवाईक असलेल्या संचालक मंडळाने सर्व ठेवीदारांना ठेवी समप्रमाणात देणे सहकार खात्याच्या नियमाप्रमाणे क्रमप्राप्त असताना केवळ आपल्या नातेवाईकांना व मर्जीतील लोकांनाच ठेवी देऊन सर्वसामान्य ठेवीदारांना वाऱ्यावर सोडल्यामुळे मनीषा राऊत व इतर ३३ ठेवीदारांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात गुन्हे दाखल करण्या कामी याचिका दाखल केली असता वराळ पतसंस्थेच्या तत्कालीन प्रशासक संचालक ऑडिटर व चौकशी अधिकारी यांना न्यायालयाने १८ जुन पर्यंत आपले म्हणणे सादर करण्याचे आदेश काढले आहे.
चौकट —
१)
चाचणी लेखापरीक्षण अहवालात वराळ पतसंस्थेच्या आर्थिक नुकसानीबाबत स्वतंत्र विशेष अहवाल सादर करण्यात येत आहे असे म्हटले प्रत्यक्षात विशेष लेखापरीक्षक सुनील खर्डे यांनी स्वतंत्र विशेष अहवाल सादर केला नाही तसेच संचालकांचे म्हणणे न घेताच चाचणी लेखापरीक्षण अहवाल सादर केल्याने न्यायालयाने चौकशीचे आदेश दिले.
२)
सन २०२२ -२०२३ मध्ये वराळ पतसंस्थेचे लेखा परीक्षण करणारे लेखापरीक्षक महेंद्र घोडके यांनी नगर शाखेचे दप्तर गहाळ असताना नगर शाखा कँश क्रिडेट खात्यामध्ये १३ लाखाने झालेली घट ,नगर शाखा कँश क्रिडेट खात्यामध्ये ४७ लाख रुपयांनी झालेली वाढ तसेच नगर शाखेत देण्यात आलेले वाहन तारण कर्ज दिले असल्याचे सदर अहवाल सालात म्हटले आहे.
प्रत्यक्षात नगर शाखेचे दप्तर सन 2016 पासून गहाळ असताना कोणती कागदपत्रे पाहुन नगर शाखेत व्यवहार केले गेलेले आहेत याचे स्पष्टीकरण लेखापरीक्षक महेंद्र घोडके देऊ शकले नाहीत.
३)
वसंत चेडे , शिवाजी शिर्के, रामदास भोसले (वराळ पतसंस्था प्रशासक) वराळ पतसंस्थेचे तात्कालीन प्रशासक असताना रंगनाथ वराळ यांचेशी संगनमत करून सहकार खात्याने घालून दिलेल्या अटी व शर्थीचा भंग करून कोट्यवधी रुपयांचे इमारत विक्रीचा घोटाळा केला.
४)
रंगनाथ किसनराव वराळ (तत्कालीन चेअरमन वराळ पतसंस्था) प्रशासकाशी संगनमत करून दिड कोटी रुपयांची इमारत स्वतः अध्यक्ष असलेल्या फार्मसी कॉलेजला मिळवून दिली.प्रत्यक्षात दीड कोटीचा भरणा सहकार खात्याच्या अटी व शर्ती नुसार केला नाही.स्वतच्या मुलींना कर्ज प्रकरणी बेकायदेशीर सुट दिली.मयताच्या नावे रोख व चेकने व्यवहार केले.स्वत अध्यक्ष असलेल्या फार्मसी कॉलेजच्या नावे खोट्या ठेवी निर्माण केल्या आहेत.
५)
राहुल औटी (मँनेजर वराळ पतसंस्था)
गेल्या २ वर्षांपासून संस्थेचा डाटा करप्ट झाला असल्याचे सांगुन सहकार खात्याला दप्तर तपासणीस उपलब्ध करून देत नाहीत.सहकार खाते देखील मंँनेजरला पाठीशी घालत आहे.
संस्थेवर प्रशासक आलेला असताना संस्थेच्या ठेवी कमी जास्त करणे प्रकरणी एकतर्फी निर्णय घेत असुन संस्थेच्या लेटरहेडचा दुरूपयोग करत आहेत.
६)
संचालक मंडळ — वराळ पतसंस्थेचे संचालक म्हणजे फक्त नातेवाईक आहेत म्हणजेच चेअरमन रंगनाथ वराळ यांची पत्नी, मेहुणी, बहीण,भाऊ ,भावाची मुले, बहिणीची मुले व संस्थेचे कर्मचारी व कर्मचाऱ्यांचे नातेवाईक असे संचालक मंडळ आहे.

७)
३४ ठेवीदारांची मागणी कोर्टात दाखल
ईमारत विक्रीतुन आलेले दीड कोटी रुपये तसेच श्रध्दा रुरलच्या ८० लाखांच्या निर्माण केलेल्या ठेवी यातुन सर्व सामान्य ठेवीदाराचे पैसे न देता चेअरमन रंगनाथ वराळ यांनी स्वतःचे नातेवाईकांच्या ठेवी २-३
वेळेस दिल्या.स्वत:च्या मुलीच्या कर्जवसुलीत २३ लाखांची सुट दिली तसेच स्वतःच्या २ मयत भावांना मृत्यू झालेला असतानाही एकाला रोख तर एकाला चेकने पैसे दिले
अशी ठेवीदारांच्या वतीने ॲड मरकड यानी बाजू मांडली
सोबत : उच्च न्यायालयाची ऑर्डर
प्रेस नोट : मनीषा राऊत




