Updated by -star one news marathi
13 एप्रिल 2026
Ashok Kharat and Rupali Chakankar: मोठी बातमी: रुपाली चाकणकरांची बहीण चौकशीसाठी शिर्डी पोलीस ठाण्यात पोहोचली, अशोक खरातविषयी काय बोलणार?
Ashok Kharat and Rupali Chakankar: रुपाली चाकणकर यांच्या बहीण प्रतिभा चाकणकर शिर्डी पोलीस ठाण्यात चौकशीसाठी हजर झाल्या आहेत.
Ashok Kharat and Rupali Chakankar: नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात (Ashok Kharat) याच्या काळ्या साम्राज्याचे धागेदोरे आता राजकीय वर्तुळातील नातेसंबंधांपर्यंत पोहोचले आहेत. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांच्या बहीण प्रतिभा चाकणकर (Pratibha Chakankar) आज शिर्डी पोलीस ठाण्यात (Shirdi Police Station) चौकशीसाठी हजर झाल्या आहेत. समता पतसंस्थेतील संशयास्पद कोट्यवधींच्या व्यवहाराप्रकरणी पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली होती
Ashok Kharat and Rupali Chakankar: राजकीय वर्तुळात खळबळ
यापूर्वीच अशोक खरातशी असलेल्या संबंधांच्या आरोपावरून रुपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आता त्यांच्या सख्ख्या बहिणीचीच पोलीस चौकशी सुरू झाल्याने या प्रकरणाला मोठे राजकीय वळण मिळाले आहे. शिर्डी पोलिसांनी प्रतिभा चाकणकर यांच्या दोन पत्त्यांवर नोटीस धाडली होती, त्यानंतर त्या आज चौकशीसाठी हजर झाल्या आहेत.
Pratibha Chakankar: अशोक खरातविषयी काय बोलणार?

पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणाशी संबंधित 33 खातेदारांचे जबाब नोंदवले आहेत. मात्र, चाकणकर कुटुंबाशी संबंधित असलेल्या या खात्यांमधील मोठी रक्कम पाहता, प्रतिभा चाकणकर यांचा जबाब या संपूर्ण तपासातील सर्वात महत्त्वाचा दुवा मानला जात आहे. प्रतिभा चाकणकर काय जबाब नोंदवणार? अशोक खरातविषयी काय बोलणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.




