अहिल्यानगर ✍️ अहमदनगरनिघोजमहाराष्ट्र
सत्ता असो वा नसो सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी कार्यरत. सत्तेत येण्याचे खासदार नीलेश लंके यांचे संकेत.
सत्ता असो वा नसो सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी कार्यरत. सत्तेत येण्याचे खासदार नीलेश लंके यांचे संकेत.

- सत्ता असो वा नसो सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी कार्यरत.
सत्तेत येण्याचे खासदार नीलेश लंके यांचे संकेत.
निघोज / प्रतिनिधी
सत्ता असो वा नसो आपण आजपर्यंत सर्वसामान्य जनतेच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी कार्यरत राहीलो असून लवकरच सत्तेत येऊन विरोधकांना आऊट करण्याचा ईशारा खासदार नीलेश लंके यांनी निघोज येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन कार्यक्रमात दिला आहे. निघोज येथील लाळगे मळा, तनपुरे वस्ती,काळे वस्ती,लामखडे वरखडे वस्ती, शिवडी परिसर तसेच शिरसुले येथील जवळपास पाच कोटी रुपयांच्या कामांचे भूमिपूजन व उद्घाटन खासदार लंके यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते. यावेळी बाजार समितीचे सभापती किसनराव रासकर, माजी पंचायत समिती सदस्य डॉ.भास्करराव शिरोळे, मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे अध्यक्ष वसंत कवाद सर, उपाध्यक्ष अमृताशेठ रसाळ,
माजी सरपंच ठकारामशेठ लंके, मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे सहसचिव विश्वासराव शेटे आदी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खासदार लंके यावेळी म्हणाले निघोज आणी परिसरात गेली चार ते पाच वर्षात तीस कोटी रुपयांची विकासकामे केली असून निघोजकरांनी प्रत्येक निवडणुकीत आपल्यावर मनापासून प्रेम केले असून यापुढे सुध्दा हेच प्रेम निघोजकरांचे आपल्यावर राहाणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या भागातील विजेचा,आरोग्याचा, जलसिंचन योजना असो किंवा शाळांची विकासकामे असोत जनतेच्या मुलभूत गरजा व सुविधा उपलब्ध करण्यासाठी आपण सदैव कार्यरत असून मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट विकासासाठी जगप्रसिद्ध रांजणखळगे विकासासाठी निधी अभ्यासिका ईमारत, कार्यालयीन सुविधा, वाचनालय यासाठी जसा निधी उपलब्ध केला व कामे पुर्णत्वास केली आहेत तशाप्रकारे देवी वर्गणीसाठी सुसज्ज सभागृह आपण मंदीरासमोर देणार असून याबाबतची जागा उपलब्ध आणी प्रस्ताव संबंधित पदाधिकाऱ्यांनी देण्याची सुचना खासदार लंके यांनी केली आहे. राज्यातील किल्याच्या संवर्धनासाठी आपण एक वर्षापूर्वी मोहीम हाती घेतली होती. हा वर्षपुर्तीचा शिवसोहळा कार्यक्रम लवकरच रायगडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत घेणार आहोत. तसेच दि.८ मार्च ते दि.११ मार्च दरम्यान महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येणार असून प्रत्येक आजारावरील निदान व तपासणी मोफत असणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामपंचायत सदस्य दिगंबर लाळगे यांनी केले शेवटी मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे सहसचिव विश्वासराव शेटे यांनी आभार मानले.




