E-Paperअहिल्यानगर ✍️ अहमदनगरअहिल्यानगर- राहुरी -मुसळवाडीदेश

ता.राहुरी- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुसळवाडी शाळेत मातृ – पितृ पूजन दिवस उत्साहात संपन्न. 🌍 प्रतिनिधी ✍️ ज्ञानेश्वर माने -9763613827

संबंधित कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती आशा साळे मॅडम, श्रीमती शामल सोनवणे मॅडम, श्रीमती पल्लवी अंधारे मॅडम व श्री सतीश अंधारे सर यांनी परिश्रम घेतले.

Updated by स्टार वन न्युज मराठी ™ 

अहिल्यानगर ✍️ राहुरी – मुसळवाडी 

प्रतिनिधी
ज्ञानेश्वर माने -9763613827

  आज दिनांक 21 फेब्रुवारी 2026 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मुसळवाडी शाळेमध्ये सर्व विद्यार्थी व पालक यांच्या उपस्थितीत मातृ-पितृ पूजन दिवसाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आई-वडिलांप्रती असलेले आपले प्रेम, संस्कार, ममता, सहानुभूती व जिव्हाळा यांचा उत्कृष्ट मेळ घालून आज जिल्हा परिषद शाळा, मुसळवाडी या ठिकाणी आपल्या मातापित्यांचे पूजनाचा कार्यक्रम श्री योग वेदांत सेवा समिती, राहुरी यांच्यामार्फत श्री संदीप चोथे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता.

सदरील कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुसळवाडी शाळेतील विद्यार्थी व त्यांचे पालक तसेच अनेक इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे विद्यार्थी व पालक ही यावेळी कार्यक्रम साठी उपस्थित होते. यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या मातापित्यांचे विधिवत पूजन केले. त्यांचे शुभआशीर्वाद घेतले तसेच त्यांना 7 प्रदक्षिणा घातल्या. असा हा संस्कार आणि अध्यात्माचा कार्यक्रम अतिशय आनंदी व खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पडला. यावेळी उपस्थित पालकांनी कार्यक्रमाबद्दल अत्यंत हृदयस्पर्शी अशा भावना व्यक्त केल्या. 

फोटो गॅलरी बघण्यासाठी येथे क्लिक करा

 👇👇👇👇👇

 👇

  या कार्यक्रमासाठी मुसळवाडी गावचे अध्यात्मिक वैभव माननीय ह. भ. प. श्री सोमनाथ महाराज माने, ह. भ. प. श्री दत्तात्रेय महाराज सजगुरे , ह. भ. प. श्री गणेश महाराज सजगुरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले व शाळेच्या उत्कृष्ट कार्याचे कौतुक केले.

व्हिडिओ 👇 

  • ✍️  तसेच यावेळी मुसळवाडी गावच्या सरपंच सौ कुसुमताई खरात, श्री दगडू भुजाडी, सौ जयश्रीताई लोहकरे त्याचप्रमाणे शाळेचे पालक श्री संजय धुमाळ, श्री रामदास शेरकर, श्री रोहन भुजाडी, श्री बालू सावंत, श्री राहुल लालझरे व फोटोग्राफर व पत्रकार श्री ज्ञानेश्वर माने व मोठ्या संख्येने महिला यावेळी उपस्थित होत्या.

यावेळी संबंधित कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती आशा साळे मॅडम, श्रीमती शामल सोनवणे मॅडम, श्रीमती पल्लवी अंधारे मॅडम व श्री सतीश अंधारे सर यांनी परिश्रम घेतले…

फोटो गॅलरी 

👇
संपादक ✍️ सचिन रेवगडे 📱 +919623968773

Star One News Marathi

राज्य, जिल्हा, तालुका आणि गावपातळीवरील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्राइम, कृषी, क्रिडा, आरोग्य, अर्थ आदी क्षेत्रांतील घडणाऱ्या घटना, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय घडामोडी https://staronenewsmarathi.in/ या न्यूज पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाइन बातम्यांच्या स्वरूपात तुमच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही २४ तास कटिबद्ध आहोत. तुमची मतं किंवा प्रतिक्रिया द्या. त्याचबरोबर तुम्हाला काही सल्ला द्यायचा असल्यास staronenews7@gmail.com या ईमेलवर जरूर पाठवाव्यात. आमच्यासाठी ही बाब नेहमीच स्वागतार्ह आहे. ⭐ महत्वाची सूचना : या न्यूज वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक /संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो अकोले न्यायालया अंतर्गत मान्य राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!