अहिल्यानगर ✍️ अहमदनगरनिघोजमहाराष्ट्र

निघोजमध्ये ‘लोकनाथ चषक’चा दणदणीत जल्लोष शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या थरारक अंतिम सामन्यात रिया इलेव्हनचा मानाचा तुरा

निघोजमध्ये ‘लोकनाथ चषक’चा दणदणीत जल्लोष शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या थरारक अंतिम सामन्यात रिया इलेव्हनचा मानाचा तुरा

निघोजमध्ये ‘लोकनाथ चषक’चा दणदणीत जल्लोष
शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या थरारक अंतिम सामन्यात रिया इलेव्हनचा मानाचा तुरा
निघोज – दिनांक 15 फेब्रुवारी पत्रकार (योगेश खाडे)
निघोज नगरीत रंगलेल्या ‘लोकनाथ चषका’ने यंदा क्रीडाप्रेमींसाठी अविस्मरणीय क्षणांची मेजवानीच दिली. रिया इलेव्हन निघोज आणि पैलवान साम्राज्य टाकळी ढोकेश्वर यांच्यात झालेला अंतिम सामना अक्षरशः शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला. तुफान जल्लोष, घोषणांचा गजर आणि प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात रिया इलेव्हन निघोज संघाने विजेतेपद पटकावत मैदान गाजवले.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या भव्य स्पर्धेचे नियोजन अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित पाटील झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली धर्मरक्षक प्रतिष्ठानने केले होते. त्यांच्या सूचनांनुसार संपूर्ण स्पर्धा शिस्तबद्ध, नियोजनबद्ध आणि भव्य स्वरूपात पार पडली.
अंतिम सामना : उत्कंठेचा कळस
दोन्ही संघांनी सुरुवातीपासूनच आक्रमक आणि जिगरबाज खेळ सादर केला. चौकार-षटकारांची आतषबाजी आणि गोलंदाजांची भेदक मारा यामुळे सामना क्षणोक्षणी रंगत गेला. शेवटच्या षटकात विजयासाठी आवश्यक धावांचे समीकरण तंग झाले होते. प्रेक्षकांच्या टाळ्यांचा कडकडाट सुरू असतानाच अखेरच्या चेंडूवर घेतलेल्या निर्णायक धावेने रिया इलेव्हन निघोजने विजयावर शिक्कामोर्तब केले आणि मैदानात आनंदाचा स्फोट झाला.
मान्यवरांच्या उपस्थितीत दिमाखदार सोहळा
बक्षीस वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांच्या हस्ते विजेत्या संघाला चषक प्रदान करण्यात आला. यावेळी माजी उपाध्यक्ष सुजित पाटील झावरे, शिवसेना (शिंदे गट) ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष खंडूजी भुकन, पारनेर तालुका युवा सेना अध्यक्ष सुभाष वराळ, नितीन दादा शेळके, पंकज दादा कारखिले, पारनेर पोलीस स्टेशनचे पीआय खेडकर साहेब व त्यांचे सहकारी, मुंबईतील उद्योजक गणेशजी बोंबले तसेच पुण्यातील उद्योजक अमोलभाऊ भोगावत आदी मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांनी विजेत्या संघाचे अभिनंदन करत युवा खेळाडूंना प्रोत्साहनपर संदेश दिला.

योगेश खाडे

योगेश खाडे पाटील हे स्टार वन न्युज मराठी चे जुन्नर तालुक्यातील एक अनुभवी पत्रकार आहे ✨ जिथे अन्याय होत असेल तिथे त्यांना मदत करण्याचे काम योगेश खाडे करताना दिसतात

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!