अहिल्यानगर ✍️ अहमदनगरनिघोजमहाराष्ट्र

निघोजकरांसाठी आनंदाची बातमी! दिड कोटींच्या निधीला मंजुरी; स्वच्छतेचा प्रश्न कायमचा मार्गी लागणार

निघोजकरांसाठी आनंदाची बातमी! दिड कोटींच्या निधीला मंजुरी; स्वच्छतेचा प्रश्न कायमचा मार्गी लागणार

निघोजकरांसाठी आनंदाची बातमी! दिड कोटींच्या निधीला मंजुरी; स्वच्छतेचा प्रश्न कायमचा मार्गी लागणार
निघोज – दिनांक 14 फेब्रुवारी पत्रकार (योगेश खाडे)
निघोज व परिसरातील तब्बल पंचवीस हजार नागरिकांच्या आरोग्याशी निगडीत असलेल्या स्वच्छतेच्या प्रश्नावर आता कायमस्वरूपी तोडगा निघणार आहे. राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि आमदार काशिनाथ दाते यांच्या विशेष प्रयत्नांतून निघोज गावासाठी तब्बल दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून घनकचरा, सांडपाणी व मैलागाळ व्यवस्थापन प्रकल्प साकारला जाणार असून लवकरच कामाला सुरुवात होणार आहे.
हा निधी स्वच्छ भारत मिशन ग्रामीण – टप्पा दोन अंतर्गत मंजूर करण्यात आला आहे. वाढती लोकसंख्या आणि त्यानुसार वाढणारा कचरा व सांडपाण्याचा प्रश्न लक्षात घेता हा प्रकल्प अत्यंत आवश्यक मानला जात होता. ग्रामपंचायतीने विविध स्वच्छता उपक्रम राबवून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला; मात्र कायमस्वरूपी उपाययोजनेसाठी मोठ्या प्रकल्पाची गरज होती.
पाठपुराव्याला यश
निघोज ग्रामपंचायतीकडून सादर करण्यात आलेला प्रस्ताव मान्यवर नेत्यांकडे मांडण्यात आला होता. या प्रस्तावासाठी विखे पाटील आणि दाते यांनी मंत्रालय स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले असून दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
याबाबत माहिती देताना जनसेवा फाउंडेशनचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील वराळ यांनी सांगितले की, “निघोजसारख्या मोठ्या गावासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे. घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाची आधुनिक यंत्रणा उभारल्यास स्वच्छतेचा प्रश्न कायमस्वरूपी सुटेल. नागरिकांच्या आरोग्यासाठी हा टप्पा निर्णायक ठरणार आहे.”
महायुतीचे सहकार्य
या प्रकल्पासाठी तालुक्यातील महायुती पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहकार्य केल्याची माहितीही देण्यात आली. सर्वांच्या संयुक्त प्रयत्नातून निघोजच्या विकासाला गती मिळत असल्याचे स्थानिकांनी सांगितले.
विकासाच्या दिशेने ठोस पाऊल
दीड कोटींच्या निधीतून उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पामुळे निघोजमध्ये आधुनिक कचरा प्रक्रिया, सांडपाणी व्यवस्थापन व मैलागाळ निचरा प्रणाली विकसित होणार आहे. यामुळे गाव अधिक स्वच्छ, सुंदर व आरोग्यदायी बनणार असून पर्यावरण संरक्षणालाही मोठी चालना मिळणार आहे.
निघोजकरांसाठी ही आनंदाची व अभिमानाची बातमी असून, लवकरच कामाला सुरुवात होणार असल्याने गावकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. विकासाच्या वाटेवर निघोज आणखी एक भक्कम पाऊल टाकत आहे.

योगेश खाडे

योगेश खाडे पाटील हे स्टार वन न्युज मराठी चे जुन्नर तालुक्यातील एक अनुभवी पत्रकार आहे ✨ जिथे अन्याय होत असेल तिथे त्यांना मदत करण्याचे काम योगेश खाडे करताना दिसतात

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!