अहिल्यानगर ✍️ अहमदनगरनिघोजमहाराष्ट्र
निघोज येथे शिवबा संघटना व ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती सोहळा उत्साहात महाकाल तांडव सांस्कृतिक कार्यक्रमाने निघोजकरांची मने जिंकली
निघोज येथे शिवबा संघटना व ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती सोहळा उत्साहात महाकाल तांडव सांस्कृतिक कार्यक्रमाने निघोजकरांची मने जिंकली

- निघोज येथे शिवबा संघटना व ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती सोहळा उत्साहात
महाकाल तांडव सांस्कृतिक कार्यक्रमाने निघोजकरांची मने जिंकली
निघोज- दिनांक 20 फेब्रुवारी पत्रकार (योगेश खाडे)
निघोज येथे शिवबा संघटना व ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती सोहळा अत्यंत उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. सकाळी लवकर शिवनेरी किल्ला येथून शिवभक्तांनी आणलेल्या पवित्र शिवज्योतीचे गावात आगमन होताच ढोल-ताशांच्या गजरात व जल्लोषात तिचे स्वागत करण्यात आले. गावभर ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
सायंकाळी सहानंतर भव्य ‘महाकाल तांडव’ या सांस्कृतिक कार्यक्रमाला प्रारंभ झाला. जवळपास तीन तास रंगलेल्या या नेत्रदीपक मिरवणुकीत मळगंगा मंदिरासमोर, ग्रामपंचायत चौक व निघोज बसस्थानक या ठिकाणी शिवशंकराच्या महात्म्यावर आधारित नृत्याविष्कार सादर करण्यात आले. कलाकारांची आकर्षक वेशभूषा, अंगावर शहारे आणणाऱ्या अग्निज्वाला, तसेच महाकाय हत्तीची प्रतिकृती यामुळे उपस्थितांना प्रत्यक्ष कैलास पर्वतावर शिवशंकराच्या सान्निध्यात आल्याचा भास होत होता. निघोजकरांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत टाळ्यांच्या कडकडाटात कलाकारांचे स्वागत केले.
कार्यक्रमाची सांगता शिव-पार्वती विवाह सोहळ्याच्या प्रभावी सादरीकरणाने झाली. त्यानंतर विरोनीका लामखडे, ईश्वरी पवार, शर्वरी काळे, अधिरा लंके, शिव लंके या बालशिवभक्तांनी छत्रपती शिवाजी महाराजांवरील आपले विचार मांडत उपस्थितांची मने जिंकली. शेवटी महाप्रसादाचे वितरण करून सोहळ्याची सांगता करण्यात आली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवबा संघटनेचे अध्यक्ष अनिल शेटे, शिवव्याख्याते प्रा. अॅड. ज्ञानेश्वर कवाद, आदर्श कलाशिक्षक प्रा. ज्ञानेश्वर कवडे, पदाधिकारी बबनशेठ तनपुरे, राजुभाऊ लाळगे, पारनेर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष बाबाजी वाघमारे, उपाध्यक्ष भास्करराव कवाद, बाळासाहेब भंडारी, रोहिदास लामखडे, राजू लंके, राहुल शेटे, गणेश लामखडे, शिवाजीराव लंके, निखिल वरखडे, शैलेश लामखडे, यश शेटे, मच्छिंद्र लाळगे, लहु गागरे, वसंत वरखडे, निलेश वरखडे, श्रीकांत लामखडे, विशाल लामखडे, आप्पा वराळ, अशोक ढवळे आदींसह शेकडो शिवभक्तांनी परिश्रम घेतले. निघोज ग्रामपंचायत व ग्रामस्थांचे विशेष सहकार्य लाभले. पारनेरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन भांडवलकर व निघोज पोलिस प्रशासनानेही कार्यक्रमास उपस्थित राहून आनंद घेतला.




