अहिल्यानगर ✍️ अहमदनगरनिघोजमहाराष्ट्र

लोकनाथ चषक स्पर्धेचा अंतिम दिवस आज जल्लोषात साजरा होत असून सायंकाळी ठीक सहा वाजता लाखो रुपयांच्या बक्षिसांच्या वितरणासह भव्य समारंभ पार पडणार आहे.

लोकनाथ चषक स्पर्धेचा अंतिम दिवस आज जल्लोषात साजरा होत असून सायंकाळी ठीक सहा वाजता लाखो रुपयांच्या बक्षिसांच्या वितरणासह भव्य समारंभ पार पडणार आहे.

  1. निघोज, दि. १४ फेब्रुवारी (योगेश खाडे)
    लोकनाथ चषक स्पर्धेचा अंतिम दिवस आज जल्लोषात साजरा होत असून सायंकाळी ठीक चार वाजता लाखो रुपयांच्या बक्षिसांच्या वितरणासह भव्य समारंभ पार पडणार आहे. तालुक्यातील क्रीडाप्रेमींसाठी हा सोहळा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार असून अंतिम सामन्याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.
    या दिमाखदार सोहळ्यास भोसरीचे आमदार महेश दादा लांडगे, अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम भैय्या जगताप, जुन्नरचे आमदार शरददादा सोनवणे, जळगाव शहरचे आमदार राजू मामा भोळे, शिवसेना सचिव (शिंदे गट) राम रेपाळे, पारनेर तालुका शिवसेनाप्रमुख (शिंदे गट) सुजित पाटील झावरे, अहिल्यानगर ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष शिवसेना (शिंदे गट) खंडुजी भुकन, तसेच पारनेर तालुका युवा सेना अध्यक्ष सुभाषराव वराळ यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
    चुरशीचा अंतिम सामना
    स्पर्धेतील अंतिम सामना अत्यंत अटीतटीचा होण्याची चिन्हे आहेत. दोन्ही संघांनी दमदार कामगिरी करत अंतिम फेरी गाठली असून फलंदाज-गोलंदाजांच्या टक्करमुळे मैदानावर रोमांचक वातावरण निर्माण झाले आहे. प्रेक्षकांची मोठी गर्दी उसळण्याची शक्यता आयोजकांनी व्यक्त केली आहे.
    लाखोंची बक्षीसे – स्पर्धेचा उंचावलेला दर्जा
    यंदा स्पर्धेसाठी लाखो रुपयांची बक्षिसे जाहीर करण्यात आल्याने खेळाडूंमध्ये विशेष उत्साह संचारला आहे. विजेत्या संघाला आकर्षक रोख पारितोषिक व चषक प्रदान करण्यात येणार असून उपविजेत्या संघालाही मानाचा सन्मान दिला जाणार आहे. मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आदी विविध गटांतील खेळाडूंनाही मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.

योगेश खाडे

योगेश खाडे पाटील हे स्टार वन न्युज मराठी चे जुन्नर तालुक्यातील एक अनुभवी पत्रकार आहे ✨ जिथे अन्याय होत असेल तिथे त्यांना मदत करण्याचे काम योगेश खाडे करताना दिसतात

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!