Uncategorized
Trending

अकोले येथे रविवार दिनांक २२ फेब्रुवारी २०२६ रोजी विधीसेवा महाशिबीर व शासकीय योजनांच्या महामेळाव्याचे आयोजन, 🌍प्रतिनिधी ✍️ आशिष उंबरडे . 📱 97657 77938

Updated by स्टार वन न्युज मराठी ™ 

16 फेब्रुवारी 2026

अहिल्यानगर ✍️ अकोले 

मा. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली, मा. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे निर्देशान्वये मा. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अहमदनगर व तालुका विथी सेवा समिती, अकोले तसेच जिल्हा प्रशासन, तालुका प्रशासन व विविध शासकीय विभागांच्या संयुक्त विदयमाने आणि अकोले व राजूर तालुका वकील संघाच्या सहकार्याने अकोले तालुक्यात राहत असणा-या नागरिकांसाठी रविवार दिनांक २२ फेब्रुवारी २०२६ रोजी आय.टी.आय. मैदान, ता. अकोले, जि. अहमदनगर येथे विधी सेवा महाशिबीर व शासकीय योजनांचा महामेळावा आयोजित करण्यात येणार आहे.

 

✍️या महामेळाव्यात विधी सेवा प्राधिकरणा मार्फत राबविण्यात येणा-या विविध विधी सेवा आणि केंद्र व राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिली जाणार आहे. शेतकरी, महिला, युवक, विदयार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच दिव्यांग बांधवांसाठी असलेल्या योजनांबाबत मार्गदर्शन करण्यात येईल. तसेच पात्र लाभार्थ्यांची नोंदणी, अर्ज स्वीकृती आणि तात्काळ मंजुरी प्रक्रियेबाबतही सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

  सदर महामेळाव्यात विधी सेवा समिती, महसूल, पंचायत समिती, समाजकल्याण, कृषी, महिला व बालविकास, आरोग्य, कौशल्य विकास, उदयोग विभाग, दिव्यांग विभाग आदी विविध विभागांचे स्टॉल उभारण्यात येणार आहेत. तज्ज्ञ अधिकारी व कर्मचारी नागरिकांच्या शंकांचे निरसन करतील.

 

 

अकोले तालुकयातील नागरिकांचे शासन दरबारी काही अर्ज / प्रकरणे प्रलंबित असतील तर त्या बाबतची माहिती तालुका विधी सेवा समिती, अकोले न्यायालय यांना त्वरित देण्यात यावी आणि महाशिबीर व महामेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मा. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अहमदनगर

 

 आणि तालुका विधी सेवा समिती, अकोले यांनी केले आहे.

 

संपादक ✍️ सचिन रेवगडे 9623968773

Star One News Marathi

राज्य, जिल्हा, तालुका आणि गावपातळीवरील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्राइम, कृषी, क्रिडा, आरोग्य, अर्थ आदी क्षेत्रांतील घडणाऱ्या घटना, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय घडामोडी https://staronenewsmarathi.in/ या न्यूज पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाइन बातम्यांच्या स्वरूपात तुमच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही २४ तास कटिबद्ध आहोत. तुमची मतं किंवा प्रतिक्रिया द्या. त्याचबरोबर तुम्हाला काही सल्ला द्यायचा असल्यास staronenews7@gmail.com या ईमेलवर जरूर पाठवाव्यात. आमच्यासाठी ही बाब नेहमीच स्वागतार्ह आहे. ⭐ महत्वाची सूचना : या न्यूज वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक /संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो अकोले न्यायालया अंतर्गत मान्य राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!