क्षेत्र कुंड येथे स्वच्छतेसाठी पुढाकार; मळगंगा मंदिर परिसरात कचराकुंड्यांची भेट मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टकडून पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार
क्षेत्र कुंड येथे स्वच्छतेसाठी पुढाकार; मळगंगा मंदिर परिसरात कचराकुंड्यांची भेट मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टकडून पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार व

क्षेत्र कुंड येथे स्वच्छतेसाठी पुढाकार; मळगंगा मंदिर परिसरात कचराकुंड्यांची भेट
मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टकडून पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार
निघोज-दिनांक 21 फेब्रुवारी पत्रकार (योगेश खाडे)
पर्यटनस्थळ म्हणून ओळख असलेल्या श्री क्षेत्र कुंड येथील मळगंगा मंदिर परिसर स्वच्छ व सुंदर राहावा या उद्देशाने बाबासाहेब कवाद निघोज नागरी सहकारी पतसंस्था यांच्या वतीने कचराकुंड्या सप्रेम भेट देण्यात आल्या. या उपक्रमामुळे भाविक व पर्यटकांना स्वच्छ वातावरणाचा लाभ होणार असून परिसर स्वच्छतेबाबत सकारात्मक संदेशही देण्यात आला आहे.
या सामाजिक बांधिलकीच्या कार्याबद्दल श्री मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट तर्फे पतसंस्थेचे संचालक श्री भिवाशेठ रसाळ व व्यवस्थापक श्री दत्तात्रय लंके यांचा सन्मान करण्यात आला. ट्रस्टचे माजी संघटक ॲड. श्री बाळासाहेब लामखडे यांच्या हस्ते हा सन्मान पार पडला.
यावेळी बोलताना मान्यवरांनी सांगितले की, श्री क्षेत्र कुंड हे धार्मिक व पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण असून येथे दररोज मोठ्या संख्येने भाविक व पर्यटक भेट देतात. अशा ठिकाणी स्वच्छता राखणे ही सर्वांचीच सामूहिक जबाबदारी आहे. पतसंस्थेने दिलेल्या कचरा कुंड्यांमुळे मंदिर परिसरातील कचरा व्यवस्थापन अधिक सुलभ होणार आहे.
सन्मान प्रसंगी मळगंगा ट्रस्टचे कार्याध्यक्ष श्री वसंतराव कवाद, सचिव श्री शांताराम कळसकर, विश्वस्त श्री शंकरराव लामखडे, पतसंस्थेचे संचालक श्री बाबाजी कळसकर तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात स्वच्छतेचा संकल्प करण्यात आला असून, भाविकांनीही परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन करण्यात आले.
या उपक्रमामुळे श्री क्षेत्र कुंड परिसर अधिक स्वच्छ, सुंदर व पर्यटकांना आकर्षित करणारा ठरेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.




