अहिल्यानगर ✍️ अहमदनगरनिघोजपारनेर:कै.अजितदादा पवार साहेब यांच्या स्मृती प्रित्यर्थ खासदार डॉ.निलेशजी लंके यांच्या संकल्पनेतून ‘कृषी गंगा’ भव्य राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाला पारनेरमध्ये दिमाखदार प्रारंभमहाराष्ट्र

पारनेर:कै.अजितदादा पवार साहेब यांच्या स्मृती प्रित्यर्थ खासदार डॉ.निलेशजी लंके यांच्या संकल्पनेतून ‘कृषी गंगा’ भव्य राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाला पारनेरमध्ये दिमाखदार प्रारंभ

Updated by स्टार वन न्युज मराठी वृत्तसेवा ™ 
20 फेब्रुवारी 2026
स्टार वन न्युज मराठी ™ 
निघोज/पारनेर-दिनांक १९ फेब्रुवारी पत्रकार(योगेश खाडे) शेतकऱ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान, सुधारित बियाणे, सेंद्रिय शेती, कृषीपूरक उद्योग आणि आधुनिक उपकरणांची माहिती एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून देणारे ‘कृषी गंगा’ भव्य राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन १९ ते २३ फेब्रुवारीदरम्यान कृषी उत्पन्न बाजार समिती शेजारी, पारनेर येथे मोठ्या उत्साहात सुरू झाले आहे.

  कै. अजित दादा पवार साहेब यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित या प्रदर्शनाला राज्यभरातून शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.

या उपक्रमाची संकल्पना खासदार डॉ. निलेशजी लंके साहेब यांनी मांडली असून शेतकरी सक्षमीकरणाचा व्यापक विचार त्यामागे आहे. उद्घाटन सोहळ्यापासून ते दैनंदिन कार्यक्रमांपर्यंत सर्वच बाबतीत उत्कृष्ट नियोजन पाहायला मिळत आहे.

कार्यकर्त्यांचे नियोजन ठरले यशस्वी

प्रदर्शनाच्या यशामागे कार्यकर्त्यांची अथक मेहनत आणि शिस्तबद्ध नियोजन महत्त्वाचे ठरले आहे. वाहनतळ व्यवस्था, स्टॉल्सची मांडणी, मार्गदर्शन कक्ष, पिण्याच्या पाण्याची सोय, स्वच्छता, सुरक्षा व्यवस्था आणि पाहुण्यांचे स्वागत या सर्व बाबी अत्यंत सुरळीतपणे पार पडत आहेत. प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र पथके नियुक्त करण्यात आली असून शेतकऱ्यांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी विशेष दक्षता घेतली जात आहे. या उत्कृष्ट नियोजनाबद्दल उपस्थित मान्यवरांनी आणि शेतकरी बांधवांनी कार्यकर्त्यांचे मनापासून कौतुक केले.
अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मेजवानी
प्रदर्शनात ट्रॅक्टर, शेती अवजारे, ड्रोन तंत्रज्ञान, ठिबक व तुषार सिंचन प्रणाली, सेंद्रिय शेती उत्पादने, पशुपालन व मत्स्यपालन विषयक स्टॉल्स, तसेच कृषी प्रक्रिया उद्योगांची माहिती देणारे शेकडो स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. तज्ज्ञांचे मार्गदर्शन सत्र, परिसंवाद आणि प्रात्यक्षिकांमुळे शेतकऱ्यांना प्रत्यक्ष ज्ञान मिळत आहे.
ग्रामीण अर्थचक्राला गती
दररोज हजारो शेतकरी प्रदर्शनाला भेट देत असल्याने पारनेर परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक व्यापार-उद्योगालाही या निमित्ताने मोठी चालना मिळाली आहे.
शेतकरी प्रगतीचा संकल्प दृढ
खासदार डॉ. निलेशजी लंके साहेब यांनी “शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे आणि त्यांना स्वावलंबी बनवणे हा आमचा ध्यास आहे,” असे सांगत कै. अजित दादा पवार साहेब यांच्या स्मृतींना अभिवादन केले.
२३ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणाऱ्या या ‘कृषी गंगा’ प्रदर्शनाला शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आधुनिक शेतीच्या नवदिशांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
प्रतिनिधी योगेश खाडे 

योगेश खाडे

योगेश खाडे पाटील हे स्टार वन न्युज मराठी चे जुन्नर तालुक्यातील एक अनुभवी पत्रकार आहे ✨ जिथे अन्याय होत असेल तिथे त्यांना मदत करण्याचे काम योगेश खाडे करताना दिसतात

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!