अकोले :छत्रपती शिवाजी विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन समारंभगणोरे रयत शिक्षण संस्था

गणोरे ✍️छत्रपती शिवाजी विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन समारंभ उत्साहात :प्रमुख पाहुणे म्हणून संगमनेर ग्रामीण पोलिस स्टेशन API मा.विकास काळे साहेब यांचे विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन. 🌍संपादक ✍️ सचिन रेवगडे +919623968773

पेज वाचक 30 लाख 17 हजार
पेज वाचक 30 लाख 17 हजार

Updated by स्टार वन न्युज मराठी ™ 

संपादक ✍️ सचिन रेवगडे

16 फेब्रुवारी 2026.

अकोले ✍️ अहिल्यानगर

गणोरे ता. अकोले येथील रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी विद्यालयात इयत्ता दहावी मार्च 2026 च्या विद्यार्थांसाठी शुभचिंतन समारंभाचे आयोजन करण्यात आले. होते. यावेळी अतिशय उत्साहात विद्यार्थांसाठी परीक्षेला जाता जाता मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थितीत शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विवेकानंद पतसंस्थेचे चेअरमन मा. लालुशेठ दळवी (अखिल भारतीय मराठा महासंघ) हे होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून संगमनेर ग्रामीण पोलिस स्टेशन चे सहायक पोलिस निरीक्षक मा. विकास काळे साहेब हे होते. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून व्याख्याते व साहित्यिक मा. संजयजी गोर्डे हे उपस्थित होते.     

यावेळी मा. प्रमुख वक्ते मा. संजयजी गोर्डे यांनी आपल्या मनोगतामधून विद्यार्थांना मेहनत व चिकाटी ने कोणत्याही प्रकारचा ताणतणाव न घेता परीक्षेला कसे सामोरे जावे याविषयी विनोदी शैलीमध्ये विविध उदाहरणे देऊन मार्गदर्शन केले. यावेळी मा. संजयजी गोर्डे यांनी विद्यार्थ्यांनी काही गोष्टी आत्मसाद कराव्या जसे. आणि आपले ध्येय हे उरी बाळगून ते पूर्ण करण्यासाठी धावावे.

 

तसेच आपण देवाकडे 50 टक्के मार्क मिळावे म्हणून प्रार्थना करतो आणि देव ते मार्क्स आपल्याला देतो. या मागे सायकॉलॉजी आहे जो आपण विचार करतो ती गोष्ट पूर्ण होतेच..

 

त्याच प्रमाणे विद्यार्थ्यांनि आपल्या घरी मोठ्या पुष्ट्या वर मार्कर पेन ने. मला 90 टक्के पडायचे आहे अशा मोठ्या अक्षरात लिहून आपण येता जाता आपले लक्ष जाईल अशा ठिकाणी ते अटकून ठेवावे. जेणे करून तीच गोष्ट आपल्या मनात बिंबली जाईल आणे तेवढेच मार्क्स आपल्याला पडतील. ही अंधश्रद्धा नसून सायकॉलॉजी इफेक्ट आहे.

अशा सोप्या आणि विनोदी शैलीत विद्यार्थ्यांना अनमोल असे मार्गदर्शन केले.

        कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सहायक पोलिस निरीक्षक मा. विकास काळे साहेब यांनी देखील परीक्षेनंतर यशस्वी होण्याच्या विविध वाटा याविषयी सविस्तर माहिती दिली. अपयश आल्यानंतर खचू न जाता जीवनाला सामोरे कसे जावे याचे मार्गदर्शन केले. ज्याला जे क्षेत्र निवडायचे त्याने त्यावर भर द्या मला पण दहावी बारावी 50 टक्के च्या आतच मला मार्क्स होते. अस नाही की सगळ्यांना 90 टक्के मार्क्स पडतील तेव्हा स्पर्धा परीक्षा असतात कोणाला तलाठी होता येईल पोलिस होता येईल ग्राम सेवक होता येत. तेव्हा ज्याला ज्या क्षेत्रात आवड त्यावर फोकस करा.. अशा शब्दात API काळे साहेबांनी मुलांना मार्गदर्शन केले.

व्हिडिओ.   

👇👇

   कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.रावसाहेब उर्फ लालुशेठ दळवी साहेब (अखिल भारतीय मराठा महासंघ) यांनी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. विद्यालयाचे मुख्याध्यापक यांनी देखील विद्यार्थांना शुभेच्छा दिल्या. 

 

    मा. संजयजी गोर्डे सर मार्गदर्शन करताना     

  • यावेळी व्यासपीठावर ,रावसाहेब उर्फ लालू शेठ दळवी 
  • संतोष आंबरे (सरपंच गणोरे ग्रामपंचायत )
  • संत नामदेव किसन आंबरे (माजी पंचायत समिती सदस्य)
  • भाऊसाहेब आंबरे (हरिदत्त कॉम्प्युटर )
  • योगेश शेठ आंबरे (डाळिंब व कांदा व्यापारी कृषी उत्पन्न बाजार समिती संगमनेर )
  • जगन्नाथ आहेर (पत्रकार गणोरे )
  • सचिन रेवगडे ( स्टार वन न्युज मराठी पत्रकार )
  • राजेंद्र आंबरे( मा. अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गणोरे )

   अशोक गंगाधर आहेर (विविध सहकारी सोसायटी चेअरमन व तंटामुक्ती अध्यक्ष गणोरे) उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी आर्यन आंबरे व वैष्णवी पोपेरे यांनी केले.प्रास्ताविक डॉ. मंगेश कडलग यांनी केले. आभार श्री भांगरे आर. डी यांनी मानले.

 

 

पेज वाचक 30 लाख 17 हजार

Star One News Marathi

राज्य, जिल्हा, तालुका आणि गावपातळीवरील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्राइम, कृषी, क्रिडा, आरोग्य, अर्थ आदी क्षेत्रांतील घडणाऱ्या घटना, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय घडामोडी https://staronenewsmarathi.in/ या न्यूज पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाइन बातम्यांच्या स्वरूपात तुमच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही २४ तास कटिबद्ध आहोत. तुमची मतं किंवा प्रतिक्रिया द्या. त्याचबरोबर तुम्हाला काही सल्ला द्यायचा असल्यास staronenews7@gmail.com या ईमेलवर जरूर पाठवाव्यात. आमच्यासाठी ही बाब नेहमीच स्वागतार्ह आहे. ⭐ महत्वाची सूचना : या न्यूज वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक /संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो अकोले न्यायालया अंतर्गत मान्य राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!