
Updated by स्टार वन न्युज मराठी!STAR ONE NEWS MARATHI!
२४ फेब्रुवारी २०२६
अकोले –अहिल्यानगर
✍️नाशिक विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरणाने एका महत्त्वाच्या तक्रारीची दखल घेत कर्तव्यात कसुर करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर कडक ताशेरे ओढले आहेत प्राधिकरणाचे अध्यक्ष अशोक भटकर यांनी या प्रकरणाची कसून चौकशी केल्यानंतर दोषीनविरुद्ध विभागीय शिस्तभंगाची कारवाई करण्याच्या आदेश दिले आहेत अकोले जिल्हा अहिल्यानगर (अहमदनगर) येथील तक्रारदार पांडुरंग नानासाहेब पथवे यांनी पोलीस तक्रार प्राधिकरणाकडे धाव घेतली होती..
सौजन्य: जनमत मराठी न्यूज 👇✍️
✍️काय होती तक्रार ....
⭐रामदास नानासाहेब पथवे( तक्रारदार पांडुरंग पथवे यांचा सख्खा भाऊ) यांचा घातपात करून धामणगाव आवारी शिवारातील घोरपडवाडी शिंगवे वस्ती लगत त्याचे प्रेत झाडाच्या दोरीच्या सहाय्याने लटकून ठेवलेले (घातपात करून) परिस्थितीत आढळून आले होते. पीएम करण्यासाठी प्रेत अकोले ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. पीएम नंतर पोलिसांचे विनंतीवरून अंत्यविधी साठी गावी नेऊन अंत्यविधी करण्यात आला.

अकोले पोलीस यांना विनंती करून देखील फिर्याद घेतली गेली नाही नंतर सुमारे दोन महिन्यानंतर पोलीस स्टेशन मध्ये संबंधित फिर्यादी मधे आरोपींची नावे देऊन सुद्धा पोलिसांनी चार करप्टेड API मिथुन घुगे नी कोणतीही दखल न घेता उलट फिर्यादी पांडुरंग पथवे व कुटुंब ला पोलीस स्टेशनला बोलवून त्यांच्याकडून जबाब लिहून घेतले त्यावर साक्षीदार यांच्या बळजबरीने धाक दाखवून सह्या घेण्यात आल्या. त्यांना मोठ्या प्रमाणात मानसीक त्रास देण्यात आला होता.

या प्रकरणांमध्ये मिथुन घुगे नी फिर्यादी तसेच आपल्या घरच्यांना वेळोवेळी पोलीस स्टेशनला बोलावून मासिक त्रास देऊन त्यांच्याकडून आरोपींना मदत होईल असेच जबाब लिहून घेतले.
या प्रकरणांमध्ये रामदास नानासाहेब पथवे चा घातपात झाला असून सुद्धा सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे याने आरोपी यांच्याकडून पैसे घेऊन आत्महत्या चे कलम लावले. घातपात झाला की आत्महत्या केली याबाबत API मिथुन घुगे नी चौकशी करण्याचा साधा त्रास ही घेतला नाही .. कारण मिथुन घुगे ने आरोपी कडून पैसे घेऊन मदत करण्याचा जणू विडाच उचलला होता..
यात आरोपी ना अटक न करता तसेच त्यांची कुठलीही चौकशी न करता उलट आरोपी यांचा अटकपूर्व जामीन कसा होईल या दृष्टीने प्रयत्न केले .
त्यामुळे आरोपी ना दिलासा मिळाला असे गंभीर आरोप मयत चा भाऊ पत्रकार पांडुरंग पथवे याने केले

त्यांनी नाशिक प्राधिकरण कडे तक्रार केल्यानंतर त्याची पडताळणी करण्यात आली त्यात API मिथुन घुगे आणि राम लहामगे दोषी आढळले असून पुढील शिस्तभंग तसेच निलंबनाची कार्यवाही लवकर करण्यात येईल अशी माहिती समजली आहे.
✍️या प्रकरणात तक्रारदार पांडुरंग पथवे याने Api मिथुन घुगे कडे संशय व्यक्त केला होता की ज्ञानेश्वर दादाभाऊ मधे , शैला ज्ञानेश्वर मधे ,शुक्लेश्वर काशिनाथ आवरी, संदीप ज्ञानबा आवारी यांच्यात आणि माझ्या भावांमध्ये पैसे चे व्यवहार होते त्या व्यवहारामुळे माझ्या भावाचा खून यांनी केला आहे. यावर चौकशी करून तसे कलमे लावण्यात यावे परंतु API मिथुन घुगे नि आरोपी कडून पैसे घेऊन त्यांना मदत केल्याचा आरोप तक्रारदार आणि मयत च्या घरच्यांनी केला होता.
✍️✍️यात तत्कालीन API मिथुन घुगे, पोलिस नाईक अजित घुले , पोलिस नाईक राम लहामगे सध्या नेमणूक (आश्वी पोलिस स्टेशन)
यांना यात आरोपी करण्यात आले होते.
प्रथमदर्शी हा घातपात दिसून येत होता. जर आत्महत्या केली होती तर मयताचे पाय हे पूर्ण जमिनीला टेकलेले दिसत होते. फाशी लागण्याचे कारण दिसत नसून हा घातपात आहे असे शेजारील लोकाचे ही मत होते. परंतु मिथुन घुगे आणि अकोले पोलिस नी याकडे कानाडोळा केला असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
घटनास्थळ पंचनामे फोटो मधे पण ते स्पष्ट दिसत होत की पाय जमीनिला टेकलेले आहे..
यात तक्रारदार यांचे एडवोकेट पवन सोमनाथ भगत यांनी जोरदार युक्तिवाद करत पंचनामे फोटो सादर करण्यास सांगितले. त्यावर पोलिस अजित घुले यांनी जबाब दिला की मी पंचनामे फोटो हे api मिथुन घुगे यांचा कडे दिले होते.
तसा पंचनामा नोंदी ही घेण्यात आल्याचे अजित घुले नि जबाबात सांगितले आहे.
त्यावर Api मिथुन घुगे यांचे कडे पंचनामा तसेच फोटो मागणी केली असता त्यांनी ते फोटो कुठे आहे सांगता येणार नसल्या बाबतचे उत्तर दिले..
👇सुनावणी अंती
या प्रकरणात एडवोकेट पवन सोमनाथ भगत यांनी बाजू मांडली या अर्जावर सुनावणी करताना प्राधिकरणाने पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. प्राधिकरणांनी दिलेल्या आदेशानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे सहाय्यक पोलीस निरीक्षक अकोले पोलीस ठाणे व श्री पोलीस नाईक राम बक्कल नंबर 54 अकोले पोलीस ठाणे या दोघांनी आपल्या विहित कर्तव्यात कसुरी केल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट होत असल्याचे प्राधिकरणाने आपल्या निर्णयात नमूद केले आहे
त्यांच्या विरुद्ध शिस्तभंगाची कार्यवाही करण्याची शिफारस करण्यात आली आहे याच प्रकरणातील दुसऱ्या जबाबदार पोलीस नाईक घुले यांच्याविरुद्ध मात्र कोणतेही प्रतिकूल पुरावे न मिळाल्याने त्यांचे प्राथमिक कारवाई योग्य रीतीने पार पडल्याचे मानून त्यांना या कारवाईतून वगळण्यात आले आहे
दोषीं ज्या ठिकाणी कार्यरत आहे त्यांच्या वरिष्ठांना या प्रकरणाची गांभीर्य निष्कर्ष कळवण्यात यावे आणि दोषी वर शिस्तभंगाची कार्यवाही करण्याची शिफारस करण्यात यावी असा नाशिक प्राधिकरणाने आपल्या आदेशात उल्लेख केला आहे..
अकोले तालुक्याला लाभलेला करफ्टेड Api चे कारणाने 👇
अकोले पोलिस स्टेशन येथे भले भले पोलिस निरीक्षकांना अकोले चा क्राइम रोखण्यात यश आले नाही अशा महत्त्वाच्या पदावर त्यांचा जागेवर सहायक पोलीस निरीक्षक Api मिथुन घुगे ला चार्ज देण्यात आला होता. त्याकाळात api मिथुन घुगे असेल PSI भूषण हांडोरे असेल यांनी अनेक खोटे गुन्हे दाखल करून अनेक निरपराध लोकांवर अन्याय केला होता. फक्त पैसे घेणे हाच धंदा त्या वेळेस सुरू होता..
अनेक गंभीर प्रकरणामध्ये api मिथुन घुगे आणि psi हांडोरे यांनी पैसे घेऊन आरोपी ना मदत केली आहे
आरोपी चे चार्जशीट लवकर कोर्टामध्ये दाखल करण्यासाठी यांचे रेट ठरलेले होते पर चार्जशीट 50 हजार रुपये प्रमाणे रेट फिक्स करण्यात आले होते..
✍️बलात्कारातील आरोपी चे मेडिकल न येण्यासाठी 5 ते 6 लाख रुपये रेट ठरलेले होते.
✍️खुनातील आरोपी ची केस सिद्ध होऊ न देण्यासाठी चार्जशीट मध्ये फेरफार प्रकरणात तीन ते चार लाख रेट ठरलेले होते..
✍️अशा करप्टेड पोलिस अधिकारी मुळे बाकी प्रामाणिक पोलिसांचे आणि पोलिस डिपार्टमेंट चे नाव खराब होत चाले आहे..
अजूनही बरेच गोरगरिब घरातील मुले पोलिस आहे अधिकारी आहे परंतु ते अजूनही प्रामाणिक आहे परंतु अशा लाच घेऊ पोलिसांमुळे त्यांना ही शरमेने मान खाली घालावी लागते
एक प्रकरण असे ही आहे की एका पत्रकाराला किडन्याप करून जेल मध्ये ठेवले होते कारण त्याच्याकडे मिथुन घुगे आणि psi हांडोरे चे काळे धंदे सुरू ठेवण्यासंदर्भात हफ्ते घेण्याचे पुरावे होते..
त्या प्रकरणात कुठ लेही अटक वॉरंट नाही. नाcrpc 41 प्रमाणे नोटीस बजावणी केली.. जी नोटीस दाखवली त्याचे आरोपी च्या स्वतः खोट्या सह्या केल्या.
खोटे पंचनामे दाखवून फिर्यादी चे जावई मंच म्हणून दाखवण्यात आले.. आरोपी समवेत पंचनामा झाला नसताना ही आरोपी समवेत पंचनामा मधे उल्लेख करण्यात आला.. परंतु त्या पंचनाम्याचे फोटो व्हिडिओ नाही..
त्यात मिथुन घुगे आणि psi हांडोरे नि आरोपी विरोधात खोटे पुरावे अकोले पोलिस स्टेशन येथे स्वतःच्या लॅपटॉप मध्ये बनून ते चार्जशीट मध्ये ही दाखल केले .
. आरोपी चे अकोले येथील सरकारी हॉस्पिटल मध्ये अटक पूर्व मेडिकल दाखविले ते ही खोटे.. बनवले.. त्यात आरोपी चा खोटा अंगठा दाखवण्यात आला आहे.. ते पुढे कोर्टात सिद्ध होईलच
असे अनेक धक्कादायक पुरावे मिथुन घुगे psi हांडोरे विरोधात लवकरच बाहेर निघणार आहे..
थोड्याच दिवसात कायद्याचे रक्षक कसे. भक्षक आहे हे निघणार असून.
api मिथुन घुगे ला या आधी सुद्धा नाशिक प्राधिकरणाने दणका दिला आहे..
आता पुन्हा त्याच्यावर कार्यवाही होणार असल्याने तक्रारदार याला दिलासा मिळाला असल्याचे दिसून आले आहे..
API मिथुन घुगे आणि राम लहामगे यांच्यावर कठोर अशी कार्यवाही करावी.. त्यांना कायमचे सेवेतून निलंबित करून त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावे. तसेच त्यांचा संपत्ती ची चौकशी करावी या मागणी साठी मी लवकरच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे जाऊन तक्रार करणार आहे..
.✍️ तक्रारदार ( मयताचा भाऊ)✍️. पांडुरंग नानासाहेब पथवे
हे ही वाचा
👇 यावर क्लिक करा
प्राधिकरणाचे अध्यक्ष अशोक भटकर सदस्य सुनील कडाने आणि अमित उमराळे यांच्या खंडपीठाने हा महत्वपूर्ण निकाल दिला त्याच्या वतीने एडवोकेट पवन सोमनाथ भगत यांनी केलेला पाठपुरावा यशस्वी ठरला असून यामुळे पोलीस दलातील प्रतिमा मलिन झाल्याचे दिसून आले आहे….





