निघोज एटीएम फोडण्याचा प्रयत्न उघड; आरोपी पंजाबचा, शिरूर येथून अटक
निघोज एटीएम फोडण्याचा प्रयत्न उघड; आरोपी पंजाबचा, शिरूर येथून अटक

निघोज एटीएम फोडण्याचा प्रयत्न उघड; आरोपी पंजाबचा, शिरूर येथून अटक
निघोज – दिनांक 28 मार्च पत्रकार (योगेश खाडे)
दि. २२ मार्च २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास निघोज येथील स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) एटीएम फोडून पैसे लंपास करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीचा पोलिसांनी पर्दाफाश करत त्याला जेरबंद केले आहे. पोलिसांच्या तत्पर आणि नियोजनबद्ध कारवाईमुळे हा गंभीर गुन्हा अल्पावधीत उघडकीस आला आहे.
याबाबत फिर्यादी संकेत चंद्रशेखर वैद्य (वय ४०, रा. पाथर्डी रोड, इंदिरानगर, नाशिक) यांच्या फिर्यादीवरून अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपीने पहाटेच्या सुमारास चेहरा झाकून लोखंडी हत्याराच्या सहाय्याने एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न करत आत असलेली रक्कम चोरण्याचा प्रयत्न केला होता.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ हालचाल करत तांत्रिक तपास व गोपनीय बातमीदारांच्या मदतीने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल धामणे, कल्याण लगड तसेच पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश बोबडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय जाधव, सारंग साबळे यांनी कसून तपास करत आरोपीचा माग काढला व गुन्ह्याची यशस्वी उकल केली.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव संजय भजन सिंग (वय २२) असे असून तो मूळचा महालेवाला, पोस्ट फतेगड पंजतूर, कोठ इसे खान, तालुका जीरा, जिल्हा फिरोजपूर (पंजाब) येथील आहे. सध्या तो निघोज (ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) येथे वास्तव्यास होता. पोलिसांनी त्याला दि. २७ मार्च २०२६ रोजी शिरूर येथून ताब्यात घेतले.
आरोपीकडून इतर एटीएम चोरी प्रकरणांचाही उलगडा होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून न्यायालयाने आरोपीस दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कळुबर्म, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वामने यांच्या मार्गदर्शनाखाली पारनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांच्या नेतृत्वात पार पडली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक नितीन खंडागळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल धामणे, कल्याण लगड तसेच पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश बोबडे, गणेश डोंगरे, सारंग वाघ आदींचा समावेश होता.
या सर्व अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट समन्वय साधत सदरची कामगिरी यशस्वीरीत्या पार पाडली आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस सब इन्स्पेक्टर शिवाजी कडूस हे करत असून, आरोपीकडून आणखी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या धाडसी कारवाईमुळे निघोज परिसरात पोलिसांबद्दलचा विश्वास अधिक दृढ झाला असून नागरिकांकडून पोलिसांच्या कार्यक्षमतेचे कौतुक होत आहे.




