
“लग्न न करणं हा पर्याय आहे… पण लग्न टाळत राहणं ही येणाऱ्या काळाची गंभीर चूक ठरू शकते.”
प्रतिनिधी ✍️ दुर्गेश रमेश गायकवाड
सोमवार, दि. ०२ फेब्रुवारी , २०२६
- आजची पिढी खूप विचार करते. ती लगेच निर्णय घेत नाही हे चांगलं आहे.
- पण अलीकडे एक वेगळीच गोष्ट दिसते विचार इतका वाढला की निर्णय होत नाही.
- लग्नाचा विषय निघाला आपल्यासमोर यादी पुढे येते
- योग्य शिक्षण,
- उच्च पगार,
- स्वतःचे घर,
- शहर पुणे-मुंबईच,
- दिसणं ठरावीक असावं,
- करिअर पूर्ण सेटल,
- भविष्याची पूर्ण खात्री…
- आणि ही सगळी “पूर्णता” येईपर्यंत
- वय मात्र निघून जातं.
- तरुणपणाला वाटतं “आपल्याला कोणाची गरज नाही.” स्वतःचा पैसा आहे, स्वातंत्र्य आहे, मित्र आहेत, आहेत. पण आयुष्य एकसारखं राहत नाही.
एक वेळ जेव्हा मित्र आपल्या कुटुंबात गुंततात, आई-वडील, थकतात, त्यांना आरोग्य साथ देत नाही. आणि घरात शांतता बोचायला लागते. तेव्हा जाणवतं एकटेपण हे स्वातंत्र्य नसतं, ते रिकामेपण असतं.
पालकांसाठी हा प्रश्न गंभीर आहे. पालकांसाठीही हा प्रश्न गंभीर आहे.
मुलांचं लग्न झालं की
पालकांची एक मोठी जबाबदारी संपते.
ते स्वतःच्या निवृत्तिचा विचार करू शकतात.
- पण जेव्हा मुलं-मुली वय ओलांडूनही अविवाहित राहतात, तेव्हा पालक स्वतःच्या वृद्धत्वाची चिंताच दडवून ठेवतात.
- “आपण गेल्यावर याचं काय होईल?” हा प्रश्न त्यांना शांत झोपू देत नाही.
-
लग्न म्हणजे फक्त सुखाची हमी नाही…
-
पण दु:ख सोबत वाटून घेण्याची ताकद आहे. कोणतंही वैवाहिक आयुष्य फक्त आनंदाचं नसतं. मतभेद असतात, विरोध असतात, विरोध असतात. पण ते एकट्यान झेल्याचे नसतात.
-
सोबत असतात. दोन माणसं एकत्र उभी राहतात, तिथे दुःखही सुसह्य होतं. ही साथ पैसा, प्रॉपर्टी किंवा गाडी कधीच देऊ शकत नाही.
- आज आपण कल्पनांचा संसार उभा करतो…
- पण वास्तवात उतरत आहे.
- बायोडेता म्हणजे परफेक्ट प्रोफाईल , काहीही तडजोड नको,
- “आपण बेस्टच मिळवणार ” हा हट्ट वाढतो. पण आयुष्य कधीच परफेक्ट नसतं.
-
समज, संवाद आणि जुळवून घेणं यातून संसार उभा राहतो , अटींमधून नाही. लोकसंख्या वृद्ध होत चालली आहे… हे फक्त घरगुती नाही, तर राष्ट्रीय वास्तव आहे.
-
जपानसारख्या देशांमध्ये वृद्धांची संख्या वाढतेय, तरुण कमी होतायत, एकाकी आयुष्य वाढतंय. आपणही त्याच वाटेवर आहोत.
-
आजचा पैसा, आजचं आरोग्य, आजचं यश उद्या तसंच असेल याची कोणतीच खात्री नाही. शेवटी एक कठोर पण प्रश्न ज्या तडजोडी आपल्याला ४५–५० नंतर कराव्याचच लागणार आहेत, संपूर्ण तारुण्य पणाला लावण खरंच शहाणपणाचं आहे का?
-
वेळ गेल्यावर पर्याय कमी होतात समज वाढते. पण वेळ परत येत नाही. म्हणूनच…
- लग्न नको असेल तर तो जाणीवपूर्वक घेतलेला निर्णय असावा.
- पण “नंतर बघू” म्हणत वय निघून जाणं हा निर्णय नसतो.
-
अपेक्षा ठेवा, पण दुराग्रह नको. स्वप्नां ठेवा, वास्तवाशी नातं तोडू नका. संवाद वाढवा, भीती कमी करा, आणि योग्य वेळी आयुष्याची साथ निवडा. कारण काळ निघून गेल्यावर त्याच्याशी वाद घालता येत नाही. आणि नंतर पश्चाताप कोणाचेही आयुष्य बदलत नाही.

