अहिल्यानगर ✍️ अहमदनगरमहाराष्ट्रलोणी

लोणी : तालुक्यात वाळू माफियांचा धुमाकूळ . ग्रामस्थांनी ट्रॅक्टर केनी सह दिला पकडून मात्र तलाठी आप्पाचे साटेलोटे ट्रॅक्टर दिला होता सोडून. …महसूल विभागाकडून वाळू माफियावर नियंत्रण ठेवण्यात निष्काळजीपणा. का??? 

शेवटी या प्रकरणाचा ग्रामस्थामध्ये फार मोठ्या प्रमाणात गाजावाजा झाल्यानंतर काल रात्री उशिरा ट्रॅक्टर वाळू उपस्याच्या केणीसोबत पोलीस स्टेशन लोणी येथे जमा करण्यात आल्याचे समजते.आणि सद्या तो लोणी पोलीस स्टेशन च्या ताब्यात आहे...

Updated by ✍️ स्टार वन न्युज मराठी वृत्तसेवा

 16 ऑक्टोबर 2025

  अहिल्यानगर – लोणी 

 

जिल्ह्यात अवैधरित्या वाळू उपसा व चोरीचे प्रकार वाढले आहे. त्याबाबत महसूल विभागाचे अधिकारी तत्परतेने कारवाई करत नसल्याचेही दिसून येत आहे. या वाळू रेती चोरीला आळा घालण्यासाठी आता स्थानिक ग्रामस्थांनी पुढाकार घेतला आहे. वाळू माफियाचा धुमाकूळ असल्याच्या आणि महसूल विभागाकडून त्यावर नियंत्रण ठेवण्यात निष्काळजीपणा झाल्याच्या तक्रारी माध्यमांतून वारंवार प्राप्त होत असताना ही महसूल विभागाकडून वाळू माफियावर नियंत्रण ठेवण्यात निष्काळजीपणा होताना दिसत आहे.. 

 

 ✍️✍️नेमका तालुक्यात हा काय प्रकार सुरू आहे अशी चर्चा सुरु आहे.. तलाठी आप्पा कडे तक्रारी करूही त्याकडून तत्परता दाखवली जात नाही हे गौडबंगाल नेमक काय आहे हे समजत नाही… परंतु 

 

 

पैसे फेको तमाशा देखो असच काहीतरी तालुक्यात वाळू माफियानी सुरू केलं आहे….


    ✒️✒️घटनेची सविस्तर माहिती अशी कि मौजे हनुमंतगाव जेजुरकर वस्ती येथून गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाळू वाहतूक चालू होती या अवैध वाहतुकीचा स्थानिक ग्रामस्थांना फार मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत असल्यामुळे त्यांनी वारंवार या गोष्टीबद्दल प्रशासनाला कल्पना दिली. परंतु सातत्याने पोलीस प्रशासन व महसूल प्रशासनाला माहिती देऊनही त्यांनी एकमेकांकडे बोट दाखवत त्यांना सांगा ते तहसीलदार यांचे काम आहे तथा पोलीस सोबत येत नसल्याने आमच्या जीवाला धोका आहे असे म्हणून सतत टाळाटाळ केली.

      ✍️शेवटी स्थानिक रहिवासियांनी स्वतः पुढे येत या गोष्टीचा बंदोबस्त करावयाचे ठरवले व आज सायंकाळी 7 वाजता वाळूचा ट्रॅक्टर पकडला व प्रशासनाला त्याची माहिती दीली.

    



  •  त्यानंतर सदर हद्दीतील कामगार तलाठी इनामदार व कर्मचारी वाघ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ट्रॅक्टर चा पंचनामा करत विडिओ काढून ट्रॅक्टर ताब्यात घेत कारवाईसाठी लोणी पोलीस स्टेशन येथे नेत असल्याचे सांगितले व ट्रॅक्टर वर स्वतः तलाठी इनामदार हे बसले व ट्रॅक्टर घेऊन तेथून निघून गेले[/highlight]

.

   परंतु प्रत्यक्ष दर्शी यांनी दिलेल्या माहिती नुसार अर्ध्या किलोमीटर च्या अंतरावर गेल्यानंतर चालकाने ट्रॅक्टर रोड बाजूला अंधारात थांबवला व त्यांच्यात 10- 15 मिनिट चर्चा झाली व त्यानंतर अचानक चालकाने ट्रॅक्टर घेऊन पसार झाल्यानंतर आजूबाजूला उपस्थित प्रत्यक्षदर्शी अवाक झाले व काही आर्थिक तडजोड होऊन वाळू वाहतुकीचा ट्रॅक्टर काढून देण्यात आला होता. आणि ट्रॅक्टर आमच्या ताब्यातून पळून नेला असे उत्तर देण्यात आले होते 

  मात्र सकाळी ट्रॅक्टर तहसील आवारात उभा केलेला दिसला परतू ग्रामस्थांनी हा सगळा प्रकार पाहिला 

     ✍️✍️आधीच सातत्याने माहिती देऊनही प्रशासन टाळाटाळ करते अश्यात जसेतसे करून स्थानिकांनी पुढे येत प्रशासनाच्या ताब्यात आरोपी व साधन देऊनही अशा घटना घडत असतील तर सामान्यांनी कायदा आणि सुव्यवस्था यावर विश्वास ठेवावा कि नाही असा प्रश्न तयार झाला आहे

 

✍️✍️✍️शेवटी या प्रकरणाचा ग्रामस्थामध्ये फार मोठ्या प्रमाणात गाजावाजा झाल्यानंतर काल रात्री उशिरा ट्रॅक्टर वाळू उपस्याच्या केणीसोबत पोलीस स्टेशन लोणी येथे जमा करण्यात आल्याचे समजते.आणि सद्या तो लोणी पोलीस स्टेशन च्या ताब्यात आहे…

 

Star One News Marathi

राज्य, जिल्हा, तालुका आणि गावपातळीवरील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्राइम, कृषी, क्रिडा, आरोग्य, अर्थ आदी क्षेत्रांतील घडणाऱ्या घटना, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय घडामोडी https://staronenewsmarathi.in/ या न्यूज पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाइन बातम्यांच्या स्वरूपात तुमच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही २४ तास कटिबद्ध आहोत. तुमची मतं किंवा प्रतिक्रिया द्या. त्याचबरोबर तुम्हाला काही सल्ला द्यायचा असल्यास staronenews7@gmail.com या ईमेलवर जरूर पाठवाव्यात. आमच्यासाठी ही बाब नेहमीच स्वागतार्ह आहे. ⭐ महत्वाची सूचना : या न्यूज वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक /संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो अकोले न्यायालया अंतर्गत मान्य राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!