
Updated by ✍️ स्टार वन न्युज मराठी ✍️
4 सप्टेंबर 2025
सिन्नर ✍️ ऋषी पंचमी निम्मित काल सिन्नर तालुक्यातील जागरूक देवस्थान नळराज ऋषी गडावर भाविक भक्तांनी आरती चे आणि महाप्रसादचे आयोजन खुप छान प्रकारे केले होते.हजारो च्या संख्येने भाविक भक्त गडावर आले गडावर भक्तिमय वातावरणात सगळे भजनात रमून गेलेले होते.

आरती झाल्यानंतर सर्वांनी महाप्रसादाचा आनंद घेतला. गडावर जाण्यासाठी सुधारित रस्ता नसताना गडाखालीच स्वयंपाक करून गडावर ट्रॅक्टर ला दुसरा ट्रॅक्टर जोडून त्यात महाप्रसाद घेऊन जातात . नळराज ऋषीचा तपो गड हे तीर्थ जागरूक असून जिथे ऋषी नि तप केले तेथे भाविकांनी मंदिर उभारले. ऋषी च्या आशीर्वादाने मंदिराला अनेक लोकांनी भरभरून वर्गणी दिली. काही नि साउंड सिस्टीम दिली*.

तसेच सर्व खर्च वजा होऊनही पैसे शिल्लक असून लोक वर्गणी जमा करतात कारण लोकांची या गडावर जास्त श्रध्दा आहे
फोटो 👇👇
भाविकांची अशी श्रद्धा आहे की 100 रुपये वर्गणी दिली तरी आम्हाला 1 लाख रुपये कुठे ना कुठे फायदा होतो त्यामुळे वर्गणी जमा करू नका सांगून ही लोकांचा ओघ कमी होताना दिसत नाही
या गडावर आल्यावर अंगात वेगळीच चेतना निर्माण झाल्याचे आपणाला अनुभवास मिळते
महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी नळराज ऋषी च्या गडावर झेंडा मिरवणूक असते व गडावर फटाके आतषबाजी असते पुर्ण भाविकांचे श्रध्दास्थान म्हणून गड ओळखला जातो
खरंतर नळराज ऋषी गड हा खुप पवित्र असून या गडावर नळराज ऋषी नि तप केल्याचे सांगितले जाते. या ऋषी ची महिमा खूप आहे. अशी आख्यायिका आहे की हे ऋषी तेव्हा नाशिक ला गंगेत अंगोळ करून महादेवाचे दर्शन घेत असेल. नंतर त्यांना तिकडे जाणे शक्य नसल्याने त्यांनी तप साधने च्या मार्गाने नळवाडी गावात गंगा प्रगट केली. तेथे पवित्र तीर्थस्थान निर्माण झाले त्या गंगेला तेथे पातळगंगा म्हणून ओळखले जाते
शिवरात्र असो किंवा श्रावणी सोमवार येते हजारो च्या संख्येने भाविक भक्त दर्शनाला येतात
या गडाची कहाणी वेगळी आहे कारण हा गड दिसताना वरून एक भक्कम असा दगड दिसतो परतू आतून हा डोंगर पूर्ण पोखर (भुसभुशीत ) आहे. आम्ही त्या भुयारात गेलो असता आत दोन तीन रस्ते दिसले. तेथीलच स्थानिक मुलांनी सांगितले की आम्ही डोंगराच्या एका बाजूने गुहे मध्ये शिरलो तर दुसऱ्या बाजूने निघततो आणि ते खरे ही झाले.. मुलानी त्याचे प्रात्याशिक ही करून दाखवले
या गडाची माहिमी काही वेगळीच आहे शेवटी ऋषी च्या पावनपदपर्श ने पवित्र झालेले हे पाताळगंगा तीर्थ आणि पाताळेश्र्वर महादेव मुळे नळवाडी गावाला वेगळेच महत्व लाभले आहे . या परिसरात आल्यावर अंगात वेगळीच ऊर्जा संचारते.
येथील भाविक भक्त दर गुरुवारी गडावर आरतीला जातात. परतू तेथे एक चमत्कार असा पहावयास मिळतो की दर गुरुवारी आरतीला आलेल्या भाविकांना भेटण्यासाठी काही कोल्हे गडावर येतात. यामागील काय रहस्य आहे हे ऋषीलाच माहित …
लवकरच नळराज ऋषी वर आरतीची रचना सुध्दा करण्यात येणार आहे तेव्हा ज्या भाविकांना शक्य असेल त्यांनी आवश्यक एक दिवस गडाला भेट दया दर गुरुवारी रात्री 9 आरती व स्नेह भोजन असतं
तेव्हा सगळ्यांनी गडावर दर्शनाला यावे असे आवाहन भाविकांच्या वतीने करण्यात येत आहे

प्रतिनिधी नाशिक ✍️
संपादक ✍️ सचिन रेवगडे
📱+919623968773










