
Updated by –स्टार वन न्युज मराठी ™
Published -23 ऑगस्ट 2025
अकोले: तालुक्यातील गणोरे येथील विजय एकनाथ आंबरे यांच्या विवाहित मुलीच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या निष्काळजीपणाचा आरोप गंभीर ठरला आहे. या प्रकरणी विभागीय पोलिस तक्रार प्राधिकरणाने मोठी कारवाई करत तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक मिथुन घुगे यांच्या विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत. पोलिसांनी आरोपींना अप्रत्यक्ष मदत केल्याचा आरोप आंबरे यांनी केला होता.

✒️घटनेनुसार, गणोरे येथील सोनाली विजय आंबरे यांचा मृतदेह १५ सप्टेंबर २०२२ रोजी तिच्या सासरच्या घराजवळील विहिरीत संशयास्पद स्थितीत आढळला. ही आत्महत्या नसून खून असल्याचा संशय तिचे वडील विजय एकनाथ आंबरे यांनी व्यक्त केला होता. त्यांनी अकोले पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली, मात्र पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करण्याऐवजी आत्महत्येचा गुन्हा दाखल केला.
✍️✍️यामुळे संतप्त झालेल्या विजय आंबरे यांनी १६ नोव्हेंबर २०२२ रोजी विभागीय पोलिस तक्रार प्राधिकरण, नाशिक विभाग यांच्याकडे तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक मिथुन घुगे, पोलिस नाईक अजित घुले, पोलिस हेड कॉन्स्टेबल रवींद्र वलवे आणि महेश आहेर यांच्याविरुद्ध तक्रार केली. त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले होते की, पोलीस अधिकाऱ्यांनी घटनेचे गांभीर्य कमी करून सौम्य कलमे लावली. तसेच, तपासामध्ये दिरंगाई करून आरोपींना फरार होण्यास मदत केली असल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला. पोलिसांनी गुन्हा दाखल करताना त्यांनी सांगितल्याप्रमाणे मजकूर लिहिला नाही आणि आरोपींशी संगनमत केले, असा आरोपही त्यांनी केला.
या गंभीर आरोपांची दखल घेत, विभागीय पोलिस तक्रार प्राधिकरण, नाशिक विभागाचे अध्यक्ष ए. ए. भटकर, सदस्य सुनील कडासने आणि अमित डमाळे यांनी प्रकरण क्रमांक १५९/२०२२ नुसार तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक मिथुन घुगे यांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशामुळे अकोले तालुक्यात खळबळ उडाली असून, एका पित्याच्या लढ्याला यश मिळाल्याने या प्रकरणाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
या सर्व केस चे नाशिकचे क्रिमिनल अँड. पवन भगत यांनी काम पाहिले…
API मिथुन घुगे आणि तेव्हा कार्यरत असलेला psi भूषण हांडोरे यांनी मिळून अनेक भयंकर केस मधे आरोपी कडून पैसे घेऊन जामीन करून दिले आहे. अकोले तालुक्यातून अवैध धंदे असेल किंवा खोट्या केस मधे अडकून त्यांच्याकडून पैसे उकळण्याचं काम केले आहे. अकोले तालुक्यात तून खुप मोठी माया जमवण्याचे काम त्यावेळी या दोघांकडून करण्यात आले.
ते ही चौकशीत समोर येईलच





