E-PaperSBI BANK 🏦टॉप न्यूज़महाराष्ट्र

SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून ‘या’ सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम,. स्टार वन न्युज मराठी

आतापर्यंत पूर्णपणे मोफत असलेली ऑनलाइन IMPS (इंस्टंट मनी पेमेंट सर्व्हिस) ट्रान्सफर सेवा आता सशुल्क होणार आहे. या निर्णयामुळे ग्राहकांना ऑनलाइन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी काही प्रमाणात शुल्क भरावे लागेल.

Updated by ⭐ ✒️ स्टार वन न्युज मराठी ™ 

 

SBI 🏧 🏦 गेल्या काही दिवसांपासून बँका ग्राहकांना एकामागून एक धक्के देत आहे. आधी खाजगी क्षेत्रातील ICICI आणि HDFC बँकेने खात्यात किमान रक्कम मर्यादा वाढवली आहे. यानंतर आता देशातील सर्वात मोठी बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), १५ ऑगस्ट २०२५ पासून आपल्या ग्राहकांना मोठा धक्का देणार आहे

आतापर्यंत पूर्णपणे मोफत असलेली ऑनलाइन IMPS (इंस्टंट मनी पेमेंट सर्व्हिस) ट्रान्सफर सेवा आता सशुल्क होणार आहे. या निर्णयामुळे ग्राहकांना ऑनलाइन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी काही प्रमाणात शुल्क भरावे लागेल.

IMPS म्हणजे काय?

 


IMPS ही एक अशी सेवा आहे, ज्याद्वारे तुम्ही २४ तास आणि ३६५ दिवस त्वरित एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे पाठवू शकता. या सेवेचा वापर मोबाइल बँकिंग, इंटरनेट बँकिंग किंवा UPI द्वारे केला जातो. एका वेळी जास्तीत जास्त ५ लाख रुपये IMPS द्वारे पाठवता येतात.

 

ऑनलाइन IMPS व्यवहारांवर किती शुल्क लागेल?

SBI ने ऑनलाइन IMPS व्यवहारांसाठी (इंटरनेट बँकिंग, मोबाइल बँकिंग, UPI) नवीन शुल्क रचना जाहीर केली आहे, जी खालीलप्रमाणे आहे:

 

२५,००० रुपयांपर्यंत : कोणतेही शुल्क नाही.

२५,००१ ते १ लाख रुपये : ₹ २ + GST रुपये

१ लाख ते २ लाख रुपये : ६ + GST रुपये

२ लाख ते ५ लाख रुपये: १० + GST रुपये

याआधी, या सर्व व्यवहारांवर कोणतेही शुल्क नव्हते. त्यामुळे, आता ग्राहकांना ठराविक रकमेपेक्षा जास्त पैसे पाठवताना हे शुल्क भरावे लागेल.

 

या ग्राहकांना दिलासा

ज्या ग्राहकांचे विशेष पगार खाते आहे, जसे की सरकारी किंवा खाजगी कंपन्यांमधील कर्मचारी, त्यांना मात्र या शुल्कातून सूट देण्यात आली आहे. DSP, CGSP, PSP, RSP, CSP, SGSP, ICSP, आणि SUSP अशा खात्यांवर अजूनही IMPS शुल्क आकारले जाणार नाही.

 

शाखांमधील व्यवहारांवर कोणतेही बदल नाहीत

जर तुम्ही बँकेच्या शाखेत जाऊन IMPS ट्रान्सफर करत असाल, तर त्यासाठीचे शुल्क पूर्वीप्रमाणेच लागू राहील. शाखेतील व्यवहारांसाठी शुल्क २ ते २० रुपये + GST पर्यंत असू शकते, जे ट्रान्सफरच्या रकमेवर अवलंबून असते..

 

HDFC बँकेनंतर आता SBI नेही हे शुल्क लागू केल्यामुळे, इतर खाजगी आणि सार्वजनिक बँकाही असेच नियम लागू करण्याची शक्यता आहे. इतर बँकांमध्ये कॅनरा बँक आणि PNB (पंजाब नॅशनल बँक) मध्येही IMPS ट्रान्सफरवर शुल्क आकारले जाते, पण त्यांच्या शुल्काची रचना SBI पेक्षा थोडी वेगळी आहे.

 

Star One News Marathi

राज्य, जिल्हा, तालुका आणि गावपातळीवरील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्राइम, कृषी, क्रिडा, आरोग्य, अर्थ आदी क्षेत्रांतील घडणाऱ्या घटना, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय घडामोडी https://staronenewsmarathi.in/ या न्यूज पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाइन बातम्यांच्या स्वरूपात तुमच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही २४ तास कटिबद्ध आहोत. तुमची मतं किंवा प्रतिक्रिया द्या. त्याचबरोबर तुम्हाला काही सल्ला द्यायचा असल्यास staronenews7@gmail.com या ईमेलवर जरूर पाठवाव्यात. आमच्यासाठी ही बाब नेहमीच स्वागतार्ह आहे. ⭐ महत्वाची सूचना : या न्यूज वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक /संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो अकोले न्यायालया अंतर्गत मान्य राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!