E-Paperमुंबई बॉम्बस्फोट

Sadhvi Pragya Thakur :Malegaon Blast Case Verdict: मालेगाव स्फोटातून प्रज्ञासिंह यांच्यासह सर्व आरोपी निर्दोष , भावूक झालेल्या साध्वी प्रज्ञा सिंहची पहिली प्रतिक्रिया

Sadhvi Pragya Thakur : आज हिंदुत्वाचा विजय झाल्याची भावना भाजपच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी दिली. कोर्टाच्या निकालानंतर साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना भावना अनावर झाल्या.

Published by ✍️ स्टार वन न्युज मराठी ™ 

संपादक ✍️ सचिन रेवगडे 

31 July 2025

मुंबई _ update 

  Sadhvi Pragya Thakur : आज हिंदुत्वाचा विजय झाल्याची भावना भाजपच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी दिली. कोर्टाच्या निकालानंतर साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना भावना अनावर झाल्या.

मुंबई : 2008 मध्ये झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात निर्दोष मुक्तता झाल्यानंतर या प्रकरणातील आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणामुळे माझा अपमान झाला, वारंवार संघर्ष करावा लागला. आज हिंदुत्वाचा विजय झाल्याची भावना भाजपच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी दिली. कोर्टाच्या निकालानंतर साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना भावना अनावर झाल्या. मालेगावमधील भिकू चौकात एका दचाकीवर बॉम्ब ठेवण्यात आला होता. ही दुचाकी साध्वी प्रज्ञा सिंह यांची होती. मालेगाव बॉम्बस्फोटाचा निकाल 17 वर्षांनी समोर आला.

   मालेगाव स्फोटातून निर्दोष मुक्तता, भावूक झालेल्या साध्वी प्रज्ञा सिंहची पहिली प्रतिक्रिया 

मुंबई : 2008 मध्ये झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात निर्दोष मुक्तता झाल्यानंतर या प्रकरणातील आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणामुळे माझा अपमान झाला, वारंवार संघर्ष करावा लागला. आज हिंदुत्वाचा विजय झाल्याची भावना भाजपच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी दिली. कोर्टाच्या निकालानंतर साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना भावना अनावर झाल्या. मालेगावमधील भिकू चौकात एका दचाकीवर बॉम्ब ठेवण्यात आला होता. ही दुचाकी साध्वी प्रज्ञा सिंह यांची होती. मालेगाव बॉम्बस्फोटाचा निकाल 17 वर्षांनी समोर आला.

29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगावातील भिकू चौकात एका दुचाकीत बॉम्बस्फोट झाला. यात 6 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर तपासाची सूत्रे दहशतवादविरोधी पथकाकडे (ATS) सोपवण्यात आली. एटीएसने आपल्या तपासाची चक्रे वेगाने फिरवत साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर आणि इतर आरोपींना अटक केली होती. एनआयए विशेष कोर्टाने आज साध्वी यांची निर्दोष सुटका केली. साध्वी प्रज्ञा सिंह यांनी म्हटले की, माझा अपमान झाला, वारंवार संघर्ष करावा लागला. मी संन्यासी आहे म्हणून जिवंत असल्याची भावना साध्वी प्रज्ञा सिंह यांनी व्यक्त केली. माझं आयुष्य उद्धवस्त करण्यात आलं. आजच्या निकालानंतर हिंदुत्वाचा विजय झाला. दोषी नसताना कलंकित करण्यात आल्याची भावना साध्वी प्रज्ञा सिंह यांनी व्यक्त केली.

✍️✍️महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने मालेगाव स्फोटाचा तपास सुरू केल्यानंतर स्फोटात वापरण्यात आलेली दुचाकी ही साध्वी प्रज्ञा यांची असल्याची माहिती समोर आली. साध्वी प्रज्ञा यांचा एक कॉल रेकोर्डही एटीएसला सापडला. त्यात साध्वी प्रज्ञा यांनी फक्त 6 जणच ठार झाले, असे म्हटले. एटीएसला आणखी काही पुरावे सापडले होते. त्याआधारे साध्वी प्रज्ञा यांना अटक करण्यात आली. स्फोटात वापरेली दुचाकी आपण विकली होती, त्याच्याशी आपला काही संबंध नसल्याचा दावा साध्वी यांनी केला होता. आज कोर्टाने आपल्या निकालात साध्वी प्रज्ञा यांच्यावरील आरोपांसाठी सबळ पुरावे नसल्याचे सांगितले.

स्टार वन न्युज मराठी वृत्तसेवा ✍️ 

Star One News Marathi

राज्य, जिल्हा, तालुका आणि गावपातळीवरील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्राइम, कृषी, क्रिडा, आरोग्य, अर्थ आदी क्षेत्रांतील घडणाऱ्या घटना, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय घडामोडी https://staronenewsmarathi.in/ या न्यूज पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाइन बातम्यांच्या स्वरूपात तुमच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही २४ तास कटिबद्ध आहोत. तुमची मतं किंवा प्रतिक्रिया द्या. त्याचबरोबर तुम्हाला काही सल्ला द्यायचा असल्यास staronenews7@gmail.com या ईमेलवर जरूर पाठवाव्यात. आमच्यासाठी ही बाब नेहमीच स्वागतार्ह आहे. ⭐ महत्वाची सूचना : या न्यूज वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक /संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो अकोले न्यायालया अंतर्गत मान्य राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!