
Updated by ✍️ स्टार वन न्युज मराठी वृत्तसेवा
आष्टी : तालुक्यात सात बाऱ्यावरील बोजा कमी करण्यासाठी शेतकऱ्याकडून ३ हजाराच्या लाचेची मागणी करत अडीच हजार रूपयांची लाच घेताना तालुक्यातील डोईठाण येथील तलाठी अशोक रघुनाथ सुडके वय वर्ष ४८ रा. कोरडगांव ता. पाथर्डी.जि. अहिल्यानगर आणि खाजगी इसम बापूराव रावसाहेब क्षीरसागर वय वर्ष ५४ रा. डोईठाण ता. आष्टी. जि. बीड यांना बुधवारी एसीबीने अटक केली.
आष्टी तालुक्यातील डोईठाण येथील तलाठी (ग्राममहसुल अधिकारी) अशोक सुडके हा सात बाऱ्यावरील वडीलांच्या नावे असलेली बोजाची नोंद कमी करून स्वतःच्या जमीनीचा फेरफार करण्यासाठी तीन हजाराची लाच मागत असल्याची तक्रार शेतकऱ्याने केली होती. या संदर्भात सदरील शेतकऱ्याने बीडच्या एसीबी कार्यालयाला संपर्क साधल्यानंतर एसीबीने तलाठी सुडकेच्या आष्टी येथील कार्यालयात सापळा रचला. त्यानुसार बुधवारी तक्रार दाराकडून अडीज हजाराची लाच घेताना सुडके आणि खाजगी इसम बापूराव क्षीरसागर याच्यावर आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई एसीबीच्या पोलीस अधिक्षक माधुरी कांगणे, अप्पर अधिक्षक सुरेश नाईकनवरे, याच्या मार्गदर्शनाखाली बीड उपअधीक्षक सोपान चिट्टमपल्ले, पोलीस निरीक्षक राहूलकुमार भोळ, पोलीस उपनिरीक्षक समाधान कवडे, सपोउपनी सुरेश सांगळे, मच्छिंद्र बीडकर, पांडूकर काचकुंडे, अनिल शेळके, गणेश म्हेत्रे, अविनाश गवळी, अमोर खरसाडे, प्रदिप सुरवसे, अंबादास पुरी आदींनी केली.
