क्षेत्र ताहाराबाद✍️ राहुरीमहाराष्ट्र

राहुरी ❗प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या ताहाराबादच्या यात्रेला प्रारंभ, सोहळ्यात गावच्या कन्येची रांगोळी मुख्य आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. प्रतिनिधी ✍️ ज्ञानेश्वर माने 📱 +919763613827

Updated by स्टार वन न्युज मराठी ™ ⭐ 

प्रतिनिधी ✍️ ज्ञानेश्वर माने 📱 +919763613827

राहुरी: जिल्ह्यातील प्रतीपंढरपूर म्हणून ओळख असलेल्या श्रीक्षेत्र ताहाराबाद अर्थात थोर संतकवी महिपती महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत दरवर्षी नवमीपासून ते अमावस्यापर्यंत पांडुरंगाची फार मोठी यात्रा भरते. हजारो दिंड्या, लाखो भाविक या पुण्यभूमीमध्ये हजेरी लावतात. साक्षात पंढरीचा पांडुरंग या ठिकाणी पाच दिवस निवास करतात. अशी आख्यायिका आहे. त्याचप्रमाणे भाविक ही मोठ्या प्रमाणात यात्रेत सहभागी होतात.

श्री संत कवी महिपती महाराज पायी पालखी सोहळा श्रीक्षेत्र पंढरपूर येथे श्री पांडुरंगाला मूळ लावून आणण्यासाठी गेलेला होता या पालखी सोहळ्याचे आज श्रीक्षेत्र ताहाराबाद येथे आगमन झाले. पालखी सोहळ्या समवेत आलेल्या पायी परतीचे वारकरी मंडळाचे आणि पालखीचे स्वागत मा. विश्वस्त मंडळ, ग्रामस्थ मंडळाने अत्यंत मोठ्या उत्साहात आणि भक्ती भावाने स्वागत केले त्यानंतर वारकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

⭐ श्रीक्षेत्र ताहराबाद

येथे १९ ते २५ जुलैदरम्यान श्री पांडुरंग महोत्सव (गोपाळकाला) सोहळ्याचे आयोजन करण्यात आहे. १९ जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता श्रीक्षेत्र पंढरपूर येथे पायी पालखी सोहळ्याकरीता गेलेल्या पालखी रथाचे आगमन व स्वागत . २० रोजी सकाळी ७ वाजता भीक्षा कार्यक्रम, अभिषेक, काकडा आरती, नैवेद्य हरिपाठ व गोपाळ काल्यासाठी आलेल्या दिंडीचे स्वागत, २१ रोजी सकाळी काकड, भजन, महाअभिषेक, आरती नैवेद्य नगर प्रदक्षिणा, नाना महाराज गागरे यांचे हरिकीर्तन, दुपारी बारा वाजता मध्यान आरती, व महाप्रसाद (फराळ) वाटप, रात्री सात वाजता उल्हास महाराज सूर्यवंशी (आळंदी) यांचे

व्हिडिओ 👇

हरिकीर्तन, २२ रोजी काकडा भजन, कुळधर्म कार्यक्रम, द्वादशी पारणे, महाप्रसाद, सकाळी दहा वाजता हरिकीर्तन, दुपारी चार वाजता प्रवचन, हरिपाठ, रात्री सात वाजता साई कथाकार विकास महाराज गायकवाड (शिर्डी) यांचे हरिकीर्तन, २३ रोजी काकडा भजन आरती नैवेद्य अभिषेक, नंतर बाळकृष्ण महाराज कांबळे शास्त्री (ताहाराबादकर) यांचे फडकरी काला कीर्तन दुपारी बारा वाजता संगीत भजन, दुपारी तीन वाजता अर्जुन महाराज तनपुरे यांचे गोपाळ काल्याचे हरिकिर्तन व दहीहंडी, २४ रोजी छबीना मिरवणूक, पुजा आरती, शिळा गोपाळकाला, २५ रोजी सकाळी सहा वाजता पाऊल घडीच्या कार्यक्रमाने उत्सवाची सांगता होणार आहे.

व्हिडिओ ✍️

❗❗

✍️या सोहळ्यात गावच्या कन्येची रांगोळी मुख्य आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. पेशाने शिक्षिका असलेल्या अश्विनी झावरे जाधव यांची देवस्थानमधील मुख्य

गाभाऱ्यातील रांगोळी सेवा गेल्या सात ते आठ वर्षांपासून सुरू आहे. दरवर्षी वेळात वेळ काढून यात्रा उत्सवाच्या प्रारंभी प्रतिपंढरपूर ताहाराबाद येथे दाखल होऊन व्यक्तिचित्र रांगोळीची काढण्याची सेवा बजावली.

 

   ✍️✍️महिपती महाराजांच्या सभामंडपामध्ये काढलेल्या रांगोळीमध्ये प्रथम विठुरायाचे दर्शन होते. तर भगवान विष्णूचा अवतार विठुरायाचे निः स्सिम भक्त जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज आणि संत कवी महिपती महाराज यांचे बोलके आणि हुबेहूब व्यक्तीचित्र स्वरूपाची सुरेख रांगोळी तब्बल सहा ते सात तासांचे अथक परिश्रम घेत पूर्ण केली. ही रांगोळी भाविकांचे लक्ष वेधून घेणारी ठरत आहे 

सौ अश्विनीताई राजेंद्र जाधव यांनी मंदिरात रांगोळी रेखाटली त्याबद्दल संस्थानचे अध्यक्ष राजेंद्र पाटील साबळे व मठाधिपती महंत अर्जुन महाराज तनपुरे यांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला

महाराजांची अख्यायिका

✍️पंढरपूर येथे आषाढी एकादशीला घोड्यावर बसून महाराज निघालेले असतानाच बारागाव नांदूर येथील वेशीमध्ये ते पडले. महिपती महाराज यांची पंढरपूर यात्रा खंडित झाली. महाराज यांनी आपल्या भक्तामार्फत विठ्ठल चरणी चिठ्ठी पाठविली. आपला परमभक्त भेटीला न आल्याचे पाहून प्रत्यक्ष पांडुरंगच ताहाराबाद येथे वारकर्‍यासमवेत आषाढ वद्य नवमीला अवतरल्याची आख्यायिका आहे. पांडुरंगाने महाराजांना दर्शन देत घरी स्नेहभोजन केले. द्वादशीला ग्रामस्थांनी पांडुरंगाला पुरणपोळीचा नैवद्य केला. सातव्या दिवशी अमवास्येच्या पहाटे पांडूरंगांनी पंढरपूरला प्रस्थान केल्याचे सांगितले जाते.

वयाच्या 75 व्या वर्षी 1790 साली श्रावण वद्य द्वादशीला श्री क्षेत्र ताहाराबाद येथे संत महिपती महाराज यांनी आपले देह ठेवल्यानंतर आषाढ वद्य नवमी ते अमावस्या हे सात दिवस पांडूरंगाने श्री क्षेत्र ताहराबाद येथे वास्तव्य केल्याची अख्यायिका राज्यात चर्चिले जाती. तेव्हापासून पांडुरंग उत्सवाची परंपरा संत महिपती महाराज भाविक भक्तांनी जोपासली आहे.

Star One News Marathi

राज्य, जिल्हा, तालुका आणि गावपातळीवरील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्राइम, कृषी, क्रिडा, आरोग्य, अर्थ आदी क्षेत्रांतील घडणाऱ्या घटना, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय घडामोडी https://staronenewsmarathi.in/ या न्यूज पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाइन बातम्यांच्या स्वरूपात तुमच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही २४ तास कटिबद्ध आहोत. तुमची मतं किंवा प्रतिक्रिया द्या. त्याचबरोबर तुम्हाला काही सल्ला द्यायचा असल्यास staronenews7@gmail.com या ईमेलवर जरूर पाठवाव्यात. आमच्यासाठी ही बाब नेहमीच स्वागतार्ह आहे. ⭐ महत्वाची सूचना : या न्यूज वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक /संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो अकोले न्यायालया अंतर्गत मान्य राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!