
Updated by ✍️ स्टार वन न्युज मराठी वृत्तसेवा
सिन्नर ✍️ ⭐ नळवाडी
💫हिंदू धर्मात आषाढ पौर्णिमेला म्हणजेच गुरुपौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. हा दिवस आपल्या गुरुंबद्दल आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा असतो. महर्षी व्यासमुनींचा जन्म याच दिवशी झाला असे मानले जाते, त्यामुळेच याला व्यासपौर्णिमा असेही म्हणतात.
गुरु हे आपल्या जीवनातील अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरवणारे दीपस्तंभ आहेत. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आपले जीवन घडते आणि आपल्याला योग्य दिशा मिळते. यंदा गुरुपौर्णिमा आज 10 जुलै 2025 रोजी सगळीकडे साजरी केली
. या पवित्र दिवशी आपल्या गुरुंना नमन करून त्यांचे आशीर्वाद घेण्या साठी सिन्नर तालुक्यातील नळवाडी गावातील जागरूक देवस्थान नळराज ऋषी गडावर गुरुपौर्णिमा उत्सव वर्षे पहिलं सर्व भाविकांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली,
तसेच नवीन शेड सत्यनारायण पुजा करण्यात आली परिसरातील महीला तरुण सहकारी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.
⭐⭐या सालाबाद प्रमाणे येणाऱ्या पुढील प्रत्येक वर्षी ही गडावर गुरू पौर्णिमा साजरी करणार आहोत अशी माहिती स्टार चे प्रतिनिधी मारुती मामा दराडे यांनी दिली