बीड

बीड ✍️ऑनलाइन जुगार गेम,ड्रीम 11 मध्ये हरला,  आधी SP कार्यालयात बॅटरी चोरल्या, आता दुचाकी चोरताना सापडला.✒️ASI बनला चोर

 

Updated byस्टार वन न्युज मराठी ™ ✍️

9 जुलै 2025

✒️बीडमध्ये पोलीस कर्मचारीच चोर झाल्याचा प्रकार समोर आला आहे. ड्रीम 11, रमी ॲपमध्ये पैसे बुडाल्यामुळं लोकांकडून घेतलेले कर्ज फेडण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्याने चोरी केली आहे

Beed Crime News : बीडमध्ये पोलीस कर्मचारीच चोर झाल्याचा प्रकार समोर आला आहे. ड्रीम 11, रमी ॲपमध्ये पैसे बुडाल्यामुळं लोकांकडून घेतलेले कर्ज फेडण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्याने चोरी केली आहे. यापूर्वी देखील या पोलिसाने थेट पोलीस अधीक्षक कार्यालयातूनच 58 बॅटऱ्यांची चोरी केली होती. अमित मधुकर सुतार असं त्याचं नाव असून ते बीडच्या पोलीस दलात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते. 

  • दोन साथीदारांसह सात दुचाकींची चोरी 

2024 मध्ये इन्वर्टरसाठी लागणाऱ्या 10 बॅटऱ्या चोरल्याप्रकरणी त्याच्या विरोधात बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या घटनेला वर्ष उलटत नाही, तोच सुतार याने आणखी एक कारनामा करत दोन साथीदारांसह सात दुचाकींची चोरी केली आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून या चोरट्या पोलिसाला जेरबंद करण्यात आलं आहे. 

  • बॅटरींची चोरी केल्यानंतर अमित सुतार यांचं केलं होतं निलंबन 

✍️पोलीस अधीक्षक कार्यालयातून बॅटरींची चोरी केल्यानंतर पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी अमित सुतार याचे निलंबन केले होते. तो सध्या जामिनावर बाहेर होता. परंतू, अमित सुतारला ऑनलाइन जुगार, दारु, गेम खेळण्याचा छंद होता. यात त्याने हजारो रुपये गुंतवले होते. काही लोकांकडून कर्जही घेतले हे पैसे परत करण्यासाठी अखेर चोरीचा मार्ग अवलंबवा होता. दरम्यान पोलीसच चोर बनल्याने या प्रकाराची जिल्हाभरात चर्चा सुरु आहे. 

Star One News Marathi

राज्य, जिल्हा, तालुका आणि गावपातळीवरील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्राइम, कृषी, क्रिडा, आरोग्य, अर्थ आदी क्षेत्रांतील घडणाऱ्या घटना, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय घडामोडी https://staronenewsmarathi.in/ या न्यूज पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाइन बातम्यांच्या स्वरूपात तुमच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही २४ तास कटिबद्ध आहोत. तुमची मतं किंवा प्रतिक्रिया द्या. त्याचबरोबर तुम्हाला काही सल्ला द्यायचा असल्यास staronenews7@gmail.com या ईमेलवर जरूर पाठवाव्यात. आमच्यासाठी ही बाब नेहमीच स्वागतार्ह आहे. ⭐ महत्वाची सूचना : या न्यूज वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक /संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो अकोले न्यायालया अंतर्गत मान्य राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!